Advertisement

बॉलीवूड

दुर्गापूजा करताना अभिनेत्री काजोल अचानक लागली रडायला, का झाली इतकी भावूक

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Oct 13, 2021
दुर्गापूजा करताना अभिनेत्री काजोल अचानक लागली रडायला, का झाली इतकी भावूक

Advertisement

बॉलीवूड अभिनेत्री काजोलचे अनेक चाहते आहेत. काजोलचा दिलखेचक अंदाज आणि बिनधास्तपणा सर्वांना नेहमीच आवडतो. काजोल एक कुटुंबवत्सल व्यक्ती आहे. ती नवरा, मुलं, बहीण आणि आईची काळजी घेताना दिसते. एवढंच नाही तर आयुष्यात कितीही बिझी असली तरी काजोल नवरात्रीमध्ये दूर्गापूजेसाठी आवर्जून उपस्थित असते.  तिच्या नातेवाईकांसोबत ती दरवर्षी मोठ्या उत्साहात दूर्गापूजेचा उत्सव साजरा करते. या वर्षी देखील मुंबईतील एका दूर्गापूजा पंडालमध्ये मातेचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी ती हजर होती. मात्र या वर्षी पूजेदरम्यान ती अचानक भावूक झाली तिचा पूजेदरम्यान रडताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

‘ती’ आणि ‘ती’ पण आहे रीना मधुकरच्या आयुष्यातील आदिशक्ती

काय आहे हा व्हिडिओ

काजोल मुंबईतील या दूर्गापूजेच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. काजोलची आई तनूजा या मराठी आणि वडील बंगाली कुटुंबातील असल्यामुळे दुर्गापूजेदरम्यान काजोलचे अनेक जवळचे नातेवाईक जमा होतात. असेच एक काका समोर आल्यावर काजोलला तिचे अश्रू आवरणं कठीण झालं. तिने तिच्या काकांना घट्ट मिठी मारली आणि ती ढसाढसा रडू लागली. ज्यामुळे काजोलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काजोलचे ते काका तिला बऱ्याच दिवसांनी प्रत्यक्षात भेटले होते. शिवाय कोरोनाच्या काळात ते कोविड पॉझिटिव्ह झाले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सूरु असताना त्यांना कोणालाही भेटता आले नाही. त्यांना उपचारादरम्यान खूप त्रास झाला होता. आता जरी ते पूर्ण बरे झाले असले तरी तेव्हा काजोलला त्यांना भेटता आलं नाही आणि आता अचानक त्यांची भेट झाली त्यामुळे काजोल भावूक झाली होती. काजोलचं तिच्या कुटुंबावर आणि नातेवाईकांवर खूप प्रेम आहे. दुर्गापूजेदरम्यान ती ज्या आपुलकीने सर्वांची चौकशी करत होती यावरून ते दिसून येत होतं.

बिग बीच्या पायाच्या बोटाला झाली दुखापत, ही युक्ती वापरत शूटिंग केलं पूर्ण

पूजेसाठी काजोलचा खास पारंपरिक लुक

काजोल दरवर्षी दुर्गापूजेच्या उत्सवात सहभागी होते. या वर्षी सप्तमीसाठी तिने लाल रंगाची डिझायनर साडी नेसली होती. गळ्यात ट्रेडिशनल आणि हेव्ही डिझाईनचा नेकसेट आणि हातात हिरव्या रंगाचा चुडा असा तिचा लुक होता. काजोलने या लुकसाठी केसांचा ट्रेडिशनल बन ट्राय केला होता. त्यामुळे ती अगदी साध्या पण दिलखेचक अंदाजामध्ये दुर्गापूजेदरम्यान वावरताना दिसत होती. 

अभिनेत्री रकुलप्रीतने निवडला आयुष्याचा जोडीदार, केले सोशल मीडियावर जाहीर

हेही वाचा –

Happy Dussehra Wishes In Marathi