Advertisement

बॉलीवूड

बिग बीच्या पायाच्या बोटाला झाली दुखापत, ही युक्ती वापरत शूटिंग केलं पूर्ण

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Oct 12, 2021
बिग बीच्या पायाच्या बोटाला झाली दुखापत, ही युक्ती वापरत शूटिंग केलं पूर्ण

Advertisement

बॉलीवूडचे महानायक वयाच्या ऐशींव्या वर्षीदेखील तितक्याच मेहनत आणि उत्साहाने काम करत असताना दिसतात. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे आणि विनम्रपणे आपलं प्रोफेशनल आयुष्य जगलं आहे. सध्या ते कौन बनेगा करोडपतीच्या तेराव्या सेशनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. मात्र ते जेव्हा केबीसीच्या सेटवर पोहचले तेव्हा त्यांनी सूटवर साधी चप्पल घातली होती. याचं कारण त्यांच्या पायावर पट्टी बांधलेली होती. त्यांच्या पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना ही वेशभूषा करावी लागली होती. बिग बीनां निर्मात्यांनी दिलेल्या वेळेत शो पूर्ण करायचा आहे याचसाठी पायाला दुखापत झालेली असतातानी ते घरी आराम न करता शोच्या शूटिंगसेटवर येत आहेत.

Bigg Boss Marathi: आदिश वैद्यचा पहिल्याच दिवशी जयबरोबर ‘राडा’

बिग बीच्या पायाला दुखापत

अमिताभ बच्चन सध्या सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहेत. ते स्वतःचा ब्लॉंग चालवतात, कविता लिहीतात आणि बऱ्याचदा सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत असतात. बिग बीने नुकतंच त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावरून शो मस्ट गो ऑन याची प्रचिती येत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे पायाचे फोटो आणि त्याबद्दल माहिती दिली आहे. बिग बीने शेअर केलं आहे की, पायाचे बोट जखमी झाले आहे, त्यावर फ्रॅक्चर केलं आहे आणि असह्य वेदना जाणवत आहेत. वाईट याचं वाटत आहे की ते अशा ठिकाणी आहे की तिथे प्लास्टर करता येणार नाही. कारण यावर अजूनही संशोधन झालेले नाही. त्यामुळे मग मीच एक युक्ती लढवली आहे. सामान्य भाषेत याला बडी टेपिंग असं म्हणतात. कारण त्यामुळे या तुटलेल्या बोटाला सहारा मिळत आहे. असे आता चार ते पाच आठवडे टेप करावे लागणार. 

Bigg Boss 15: या सीझनमध्ये मास्टरमाईंड ठरतोय करण कुंद्रा

असं असावं कामावरील प्रेम

अमिताभ बच्चन यांची पोस्ट वाचून अनेक चाहते भावूक झाले आहेत. एवढंच नाही तर या वयातही इतक्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महानायकाचे कौतुक सर्वत्र होत आहे. अमिताभ बच्चन यांचे व्हायरल झालेले फोटो पाहून या वयात काम करण्याच्या बिग बीच्या उत्साहाबद्दल चाहते अक्षरशः थक्क झाले आहेत.  पायाला एवढी दुखापत होऊनही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या शूटिंगचे एकही शेड्यूल वाया घालवले नाही. ते प्रत्येक दिवशी त्याच उत्साहात सेटवर हजर होते. 

अभिनेत्री रकुलप्रीतने निवडला आयुष्याचा जोडीदार, केले सोशल मीडियावर जाहीर