Advertisement

मनोरंजन

अभिनेत्री रकुलप्रीतने निवडला आयुष्याचा जोडीदार, केले सोशल मीडियावर जाहीर

Dipali NaphadeDipali Naphade  |  Oct 10, 2021
ATTACHMENT DETAILS rakul-preet-singh-makes-her-relationship-official-with-jackky-bhagnani

Advertisement

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रकुलप्रीत सिंहने (Rakulpreet Singh) 10 ऑक्टोबर रोजी आपला 31 वा वाढदिवस साजरा केला. पण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रकुलप्रीतने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देत आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबाबत सांगितले आहे. या दिवसाचा शुभमुहूर्त साधत रकुलने अभिनेता – निर्माता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) सह असणारे आपले प्रेमाचे नाते अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून जाहीर केले आहे. जॅकीसह आपला फोटो पोस्ट करत रकुलने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. तर हे नातं जाहीर करताना रकुल आणि जॅकी दोघांनाही अत्यंत भावनिक आणि प्रेमाची पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

जॅकीच्या रूपाने सर्वात मोठं गिफ्ट मिळालं – रकुल

रकुलप्रीतने आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत जॅकीवरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. रकुलने जॅकीसह आपला फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये आपलं प्रेम व्यक्त केलं आहे, ‘खूप धन्यवाद, माझ्यासाठी तू यावर्षीचे सर्वात मोठं गिफ्ट आहे. माझ्या आयुष्यात रंग भरण्याबद्दल धन्यवाद, मला सतत हसविण्याबद्दल धन्यवाद, तू जसा आहेस तसा असण्यासाठी धन्यवाद. आयुष्यात आता अजून एकत्र क्षण घालवून स्मरणात ठेवायचे आहेत जॅकी’ असे कॅप्शन देत आपले प्रेम रकुलने व्यक्त केले तर जॅकीनेही रकुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. ‘तुझ्याशिवाय कोणताच दिवस हा दिवस वाटत नाही. कोणत्याही खाण्यामध्ये तुझ्याशिवाय मजा येत नाही. माझ्यासाठी जग असणाऱ्या अशा सर्वात सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझा दिवस तुझ्या हसण्याप्रमाणे आणि सुंदरतेप्रमाणेच चांगला जावो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा’ असं लिहून हार्ट इमोजी पोस्ट करत जॅकीने आपले प्रेम व्यक्त केले आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : विकास झाला मुलाच्या आठवणीत भावूक

अभिनंदनाचा वर्षाव 

रकुलप्रीतने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेच जॅकीने पोस्ट केले असून दोघांवरही अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. आयुषमान खुराणा, टायगर श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिस, भूमी पेडणेकर, सरगुन मेहता, तारा सुतारिया यांनी अभिनंदन करत रकुल आणि जॅकीला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. तर दोघांचीही जोडी अप्रतिम दिसत असून दोघांनी खूप सुखात राहावे अशा प्रतिक्रिया त्यांचे चाहतेही सोशल मीडियावर त्यांना देत आहेत. रकुलप्रीत आणि जॅकी नक्की एकमेकांना कुठे भेटले आणि ही लव्ह स्टोरी कधी घडली हेदेखील जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. तर आता हे दोघे नक्की कधी लग्न करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss 15: हा स्पर्धक घेतो सर्वाधिक मानधन, थक्क व्हाल

रकुलप्रीत कामात व्यग्र 

नुकताच रकुलप्रीतने अक्षयकुमारसहित एका चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. तर आयुषमान खुराणासह ‘डॉक्टर जी’, जॉन अब्राहमसह ‘अटॅक’, अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यासह ‘मेडे’ आणि सिद्धार्थ मल्होत्रासह ‘थँक गॉड’ या चित्रपटात रकुलप्रीत लवकरच दिसणार आहे. कामात सध्या रकुलप्रीत व्यग्र असून जॅकी अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात व्यग्र आहे. अक्षय कुमारसह रकुलप्रीतचा चित्रपट जॅकी भगनानी निर्मित असून इथे त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली असेल असा अंदाज आता चाहते लावत आहेत. दरम्यान या दोघांना भरभरून शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या जात आहेत आणि आता लवकरच यांचे लग्नही होईल अशी अपेक्षाही केली जात आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : जय-स्नेहामध्ये ‘कुछ तो गडबड है’

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक