ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Good News: करण पटेल आणि अंकितावर झाली ‘मेहर’, सोशल मीडियावर केले जाहीर

Good News: करण पटेल आणि अंकितावर झाली ‘मेहर’, सोशल मीडियावर केले जाहीर

‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून घराघरात पोहचलेलं नाव म्हणजे करण पटेल. करणचा चाहता वर्ग जबरदस्त आहे. काही दिवसांंपूर्वी करणची बायको अभिनेत्री अंकिता भार्गव गरोदर असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. कपिल शर्मा पाठोपाठ आता करणच्या घरीही नन्ही परी आली असून 14 डिसेंबरला अंकिताने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. अंकिता आणि करणने ही गोष्ट जाहीर केली नव्हती. अंकिताचं पहिलं बाळ मिसकॅरेज झाल्यानंतर दुसऱ्या वेळी या दोघांनीही खूपच काळजी घेत ही गोष्ट जाहीर न करण्याचं ठरवलं होतं. पण आता डिलिव्हरीनंतर अंकिता आणि करणचा जवळचा मित्र विकास कलंत्री आणि त्याची बायको पूजा त्यांना भेटायला पोहचले होते. त्यांनी या दोघांच्या मुलीचं नावही सोशल मीडियावर सांगितलं आहे. प्रियांकाने सोशल मीडियावर करणबरोबर एक फोटो पोस्ट करत यावेळी करणच्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. विकासने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आई अंकिता भार्गव आणि बाबा करण पटेलचं मनापासून अभिनंदन. मेहर खरंच तुम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे.’ 

शिकारीफेम नेहा खानच्या दिलखेचक अदा

करण आणि अंकिताची ‘मेहर’

करण आणि अंकिताच्या लग्नाला चार वर्ष झाली असून अंकिताच्या पहिल्या बाळाचं मिसकॅरेज झालं होतं. त्यानंतर या दोघांनी आपल्या दुसऱ्या बाळाच्या वेळी काळजी घेत अंकिताला अगदी कॅमेरापासूनही दूर ठेवलं होतं. आता या दोघांना मुलगी झाली असून त्यांना आशीर्वाद मिळाला असं वाटून तिचं नाव ‘मेहर’ असं ठेवलं आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर या दोघांनीही एका स्टेटमेंटद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. करणने म्हटलं, ‘मी या आनंदाने थोडा निःशब्द आणि थोडासा घाबरलोदेखील आहे. अंकिता व्यवस्थित आहे आणि आमचं कुटुंब त्या प्रत्येक माणसाचे आभार मानू इच्छिते ज्यांनी आम्हाला प्रेम दिलं. नेहमी तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या.’ करण आणि अंकिताने 2015 मध्ये गुजराती पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर चार वर्षांनी त्यांच्या घरी नन्ही परी आली आहे. अंकिताने याआधी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, याआधी दरवर्षी मी आई होणार की नाही याची वाट पाहत होते. 

‘तान्हाजी’ चित्रपटाचा पावरपॅक ट्रेलर 2 पाहिल्यानंतर वाढेल उत्सुकता

ADVERTISEMENT

नुकतीच ‘ये है मोहब्बतें’ मालिका संपली

करण गेल्या सहा वर्षांपासून ही मालिका करत होता. करणचा रमण भल्ला प्रेक्षकांना खूपच भावला. या मालिकेने करणला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. मध्यंतरी करणने ‘खतरों के खिलाडी’ साठी ही मालिका सोडली होती. त्यानंतर या मालिकेचा टीआरपी घसरला आणि पुन्हा या मालिकेत करणची वर्णी लागली होती. टीव्ही मालिका ‘ये है मोहब्बतें’ (Yeh Hai Mohabbatein) मागील 6 वर्षांपासून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. या मालिकेत अनेक उतार चढाव प्रेक्षकांना बघायला मिळाले. पण इशिता अय्यर (दिव्यांका त्रिपाठी- Divyanka Tripathi) आणि रमण भल्ला (करण पटेल- Karan Patel) यांचं प्रेम आजही प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडत आहे. पण काही महिन्यांपूर्वी या मालिकेतील रमण  भल्ला अर्थात करण पटेलने ‘खतरों के खिलाडी’ साठी हा शो सोडला होता. दरम्यान करण सध्या मुलीच्या जन्मामुळे खूपच आनंदी आहे. तर आता करणकडे दुसरा नवा प्रोजेक्ट आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. 

‘ये हे मोहब्बते’मधील ‘खतरों के खिलाडी’ करण पटेलची होणार पुन्हा एंट्री

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
16 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT