बॉलीवूडमध्ये हिट ठरलेल्या स्टार्सची कधी ना कधी रिप्लेसमेंटही होतेच. आता बॉलीवूडला खिलाडी अक्षय कुमारची रिप्लेसमेंट मिळाली आहे. कारण त्याच्या दोन ओरिजिनल चित्रपटांच्या भूमिकांना एका नव्या चेहऱ्याने रिप्लेस केलंय. बॉलिवूडचा हा नवा चॉकलेट हिरो कार्तिक आर्यन सध्या इंडस्ट्रीतला सर्वात डिमांडिंग अभिनेता बनला आहे. नॉन फिल्मी बॅकग्राउंडमधला असूनही दिग्दर्शक आणि निर्मात्यांची तो पहिली आवड बनला आहे.
अक्षयला रिप्लेस करत आहे कार्तिक आर्यन
असं वाटतं आहे की, बॉलीवूडचा लेटेस्ट हार्टथ्रॉब कार्तिक आर्यन सध्या हिट चित्रपटांच्या सिक्वल्ससाठी बेस्ट ऑप्शन ठरत आहे. या आधीही तरूण वर्गाचा आणि लहान मुलांचा लाडका असणाऱ्या कार्तिकने ‘भूल भुलैया 2’ साईन केला होता ज्याच्या पहिल्या पार्टमध्ये अक्षय कुमार होता. सूत्रानुसार हेराफेरीच्या तिसऱ्या पार्टमध्ये अक्षयची भूमिका करण्यासाठी आता कार्तिकची वर्णी लागू शकते. मीडिया रिपोर्ट्नुसार, अक्षयच्या जागी कार्तिक पण परेश रावल आणि सुनील शेट्टी मात्र त्यांच्या त्यांच्या भूमिकेत दिसतील.
‘भूल भुलैय्या 2’ च्या शूटींगला सुरूवात झाली असून यामध्ये कार्तिकसोबत कियारा अडवाणी दिसणार आहे.
ब्रेकअपनंतरही काम सुरूच
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचे लव्हबर्ड्स म्हणून फिरणाऱ्या कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचा आता ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत. या बातम्या येताच कार्तिकचे उदास चेहऱ्याचे फोटोज व्हायरल होत आहेत तर दुसरीकडे साराचा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या ब्रेकअपचं कारण दोघांनीही एकमेकांना वेळ देता न येणं आणि प्रोफशनल फ्रंट अधिक फोकस करणं असं कळतंय. लव्ह आज कल 2 या आगामी चित्रपटाच्या शूटदरम्यान कार्तिक आणि साराच जुळलं होतं. त्यानंतरही हे दोघं एकत्र फिरताना दिसले. मात्र सध्या आर्यन पति पत्नी और वो च्या शूटींगमध्ये बिझी आहे तर दुसरीकडे साराही कुली नं 1 मध्ये बिझी आहे. पति पत्नी और वो मध्ये कार्तिकसोबत अनन्या पांडे आणि भूमि पेडणेकर दिसणार आहे तर सारा अली खान आणि वरूण धवनची जोडी कुली नं 1 मध्ये दिसणार आहे.
‘दोस्ताना’च्या सीक्वलमध्येही आर्यनच
आधी म्हटल्याप्रमाणे सीक्वल्ससाठी सध्या कार्तिक आर्यनचीच वर्णी लागत आहे. त्याप्रमाणे दोस्ताना 2 मध्ये जान्हवी कपूर आणि नवोदित अभिनेता लक्ष्यसोबत कार्तिक दिसणार आहे. नुकताच या तिघांचा एक मजेशीर फोटो व्हायरल झाला होता.
ओरिजिनल दोस्ताना मध्ये अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि प्रियांका चोप्रा हे कलाकार होते. दोस्ताना 2 दिग्दर्शन Collin D’Cunha करत आहे. कॉलीनने या आधी Collin ‘संजू’ आणि ‘पीके’ मध्ये दिग्दर्शक राजकुमार हिरानीला तर ‘भाग मिल्खा भाग’ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आणि ‘तलाश’ मध्ये रीमा कागतीला असिस्ट केलं होतं.
आता अक्षयची याच्यावर काही प्रतिक्रिया येते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी हाऊसफुल्ल 4 च्या रिलीज आधीच्या इव्हेंट्समध्ये व्यस्त आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची ताटातूट
कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरचा ‘दोस्ताना’
लव आज कल 2 मध्ये करणार सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रोमान्स