ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Viralvideo : जेव्हा कार्तिकला अचानक भेटण्यासाठी पोचली सारा आणि झाला गोंधळ

Viralvideo : जेव्हा कार्तिकला अचानक भेटण्यासाठी पोचली सारा आणि झाला गोंधळ

बॉलीवूडमधील फ्रेश जोडी म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचं प्रेम हळूहळू बहरतंय की, त्यांची सो कोल्ड मैत्री वाढतेय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. एकमेंकासोबत गर्दीत चेहरा लपवून दर्गा जाणं काय, एकमेंकांना पत्र लिहीणं काय…हे कमी म्हणून आता पुन्हा एकदा या दोघांचे व्हिडिओज व्हायरल होऊ लागले आहेत. वाचा आता काय नवीन घडलं या दोघांच्याबाबतीत.

कार्तिकला सरप्राईज द्यायला सारा गेली लखनौला

हो…या दोघांच्या आगामी एकत्रितपणे येणाऱ्या चित्रपटाचं शूटींग कधीच संपलंय. पण तरीही साराने नुकतंच अचानक लखनौला जाऊन Kartik Aaryan को सरप्राईज दिलं. पण नंतर ते तिच्याच अंगाशी आलं जेव्हा लोकांनी तिला घेराव घातला आणि कार्तिकलाच तिचा बॉडीगार्ड व्हावं लागलं. पाहा हा व्हिडिओ –

सारा अली खान (Sara Ali Khan) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) मधील रोमान्सच्या बातम्या तेव्हापासून व्हायरल होऊ लागल्या जेव्हा दोघांना इम्तियाज अलीच्या आज कल (Aaj Kal) या चित्रपटात कास्ट करण्यात आलं. त्यानंतर आता हा लखनौचा व्हिडीओ समोर येतोय.

नक्की काय झालं लखनौमध्ये

ज्यावेळी सारा आर्यनला सरप्राईज देण्यासाठी लखनौला पोचली. तेव्हा एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना या दोघांना फॅन्सनी अक्षरक्षः घेराव घातला. मग काय झाला व्हिडिओ व्हायरल. 

ADVERTISEMENT

या व्हिडियोजला पाहून तुम्हाला कळलं असेलच की, गर्दीपासून साराला वाचवण्यासाठी कार्तिकला किती मेहनत घ्यावी लागली ते. खरंतर या दोघांचा एक जरी फोटो सोशल मीडियावर आला की, लगेच चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालंच म्हणून समजा. एवढंच काय तर यांच्या फॅन्सनी दोघांचं नामकरण #Sartik असं सुद्धा केलं आहे. 

पती, पत्नी, वो आणि सारा

खरंतर कार्तिक आर्यन लखनौमध्ये आपल्या आगामी पती, पत्नी और वो (Pati Patni Aur Woh) च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटांमध्ये अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर तो रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या बायकोच्या भूमिकेत भूमी तर ग्लॅमरस असिस्टंटच्या भूमिकेत अनन्या दिसणार आहे.

हेही वाचा –

कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची ताटातूट

ADVERTISEMENT

कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरचा ‘दोस्ताना’

कार्तिक आणि सारानं केलं लिप लॉक, व्हायरल झाला व्हिडिओ

24 Jul 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT