‘सत्य हे नेहमी कटू असते’ हे आपण सगळेच जाणतो. पण आयुष्य जगताना खरेपणाची साथ देणेहे फार महत्वाचे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत राहतात. पण त्यातून बाहेर येण्यासाठी काही कटु सत्य पचवणे गरजेचे असते. आपण जे करतो तेच बुमरँग होऊन आपल्याला परत मिळत असते. अशावेळी कटु सत्य वचन (Katu Satya Vachan) आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. सत्य वचन मराठी (Katu Satya Vachan In Marathi) जाणून घेत तुम्ही आयुष्य जगण्यासाठीचा एक चांगला मार्ग निवडायला हवा. त्यामुळे तुम्हाला बराच फरक झालेला जाणवून येईल. प्रेरणादायी कोट्स पाठवून तुम्ही एकमेकांना आधार देऊ शकता. या शिवाय जो व्यक्ती दु:खात असतील तर Marathi Sad Shayari देखील पाठवू शकता. त्यामुळेही जीवनाला एक वेगळा आधार मिळण्यास नक्कीच मदत होईल. आज आपण कटू सत्य वचन (Katu Satya Vachan In Marathi) जाणून घेणार आहोत जे तुम्हाला नक्कीच मदत करतील.
Satya Vachan Marathi Status | सत्य वचन मराठी स्टेटस
Katu Satya Vachan Status
कधी कधी आपल्याला समजून सांगताना सत्य वचन मराठी स्टेटस (Satya Vachan Marathi Status) पाठवले तरी देखील एक वेगळा आधार मिळू लागतो. पाहुयात सत्य वचन मराठी स्टेटस
हजारो किलोमीटरच्या प्रवासाची सुरुवात ही एका पावलाने होत असते, कठीण परिस्थितीतही असाच मार्ग काढणे यशाकडे घेऊन जाते.
पोटात गेलेले विष एकाच व्यक्तिला मारते, परंतु कानात गेलेले विष अनेकांना मारते
नशीबवान तो नाही ज्याचे नशीब चांगले आहे, परंतु तो आहे जो नशिबाने खूश आहे
आयुष्यभर साथ देणारी माणसं कमवा, कारण काही तास बोलणारी माणसं प्रवासात ही सापडतात
संधी पाहणारा व्यक्ती हा सर्वसाधारण असतो संधी निर्माण करणारी व्यक्ती ही असधारण असते
आपलेपणा हे सगळेच दाखवतात पण आपल्या खऱ्या व्यक्ती कोण ही ती वेळच सांगते
पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो यशासाठी त्याला नक्कीच मार्ग सापडतो
सगळ्या व्यक्तींना समान कौशल्य मिळेल असे नाही, पण आपल्याकडे नाही ते कौशल्य निर्माण करणे फार महत्वाचे असते
खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात, खरं बोलणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना खटकतात
ज्या व्यक्ती स्वत:च्या मनापेक्षा इतरांच्या मनाचा अधिक विचार करतात, त्या मानसिक संकटात सापडतात.
Katu Satya Vachan Msg In Marathi | कटू सत्य वचन मेसेज
Katu Satya Vachan Msg In Marathi
जर एखाद्या कटू सत्य वचन मेसेज (Katu Satya Vachan Msg In Marathi) पाठवू इच्छित असाल तर तुम्हाला कटू सत्य मेसेज पाठवता येतील .
जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही, पण जे गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक समाजात लोकप्रिय असतात
काहीच नसते तेव्हा अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो
जीवनात यशस्वी होण्यासाठी मीपणा सोडून देणे महत्वाचे असते
बरेचदा आपण परक्यांना आपलेसे करण्याच्या नादात परक्यांना आपलेसे करतो
संशयाने बघणाऱ्या नजरा झुकवायच्या असतील तर पहिले स्वत:ला सिद्ध करावे लागेल
लोकांना कितीही आपलेपणा दाखवला तरी ते शेवटी परकेपणा दाखवतातच
दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं ही कधीही एकटी नसतात
ज्या लोकांना तुमची खरंच साथ द्यायची असते ते परिस्थितीचा कधीही विचार करत नाहीत
शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो, शरीर थकलं तरी शांत झोप लागते, आणि मन थकलेलं असेल की झोप उडते
दरवेळी मनासारखं घडतं असं नसतं, कधी कधी जे घडतंय ते त्या सारखं मन करावं लागतं
Satya Vachan Sms In Marathi | सत्य वचन SMS मराठी
Satya Vachan Sms In Marathi
सत्य वचन पाठवण्यासाठी काही खास sms म्हणजेच (Satya Vachan Sms In Marathi) पाठवा आणि त्याला आत्मविश्वास द्या.
मित्रपरिवारात मतभेद असतील तरी चालतील पण मनभेद नसावेत
व्यक्तीचं मुल्य समजण्यासाठी एकतर त्या कमवाव्या लागतात किंवा गमवाव्या लागतात
आपले दु: ख हे कायम अशाच लोकांना सांगा ते तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतील
सत्य नेहमी कटू असते, त्यामुळे त्याचा आदर ठेवून सत्याच्या मार्गावर चाला
सत्याची वाट कठीण असली तरी त्याच वाटेवर चाला, तुम्हाला नक्की फायदा होईल
आयुष्याच्या वाटेवर सत्य आणि असत्याची निवड करणे कठीण जाते, पण अशावेळी सत्याची निवड करा
सत्याची कठीण वाट चाला आणि आनंदी राहा
सत्यामुळे डोळ्यात पाणी येऊ शकते, पण त्याचे चांगले परिणाम भविष्यात मिळतात
माणुसकी दाखवताना सत्याची कास सोडू नका, त्यामुळेच अधिक फायदा होण्यास मदत मिळते
असेल सत्याची साथ तर होते कोणत्याही गोष्टीत भरभराट
Satya Vachan Marathi Kavita | सत्य वचन मराठी कविता
Satya Vachan Marathi Kavita
सत्य वचन मराठी कविता (Satya Vachan Marathi Kavita) पाठवून तुम्ही दुसऱ्याला सकारात्मक उर्जा देऊ शकतात.
मनुष्य घर बदलतो, कपडे बदलतो, नाती बदलतो, मित्र बदलतो, प्रेम बदलतो, पण तरीही दु:खी का राहायचे? कारण तो स्वत: बदलत नाही
नाती ही रक्ताची नसली तरी चालतील पण ती मनाने व्हायला हवी, मनाने तयार झालेली नाती ही जास्त काळ टिकतात. कोणत्याही नात्यात विश्वास टिकणे हे देखील महत्वाचे असते
माणसं चुकीची नसतात, त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी चुकीच्या घडतात पण त्या बदलणे तुमच्या हातात असते, त्यामुळे सत्यावर चाला आणि आनंदी राहा
आयुष्यात असे बरेचदा होते की निर्णय घेणे कठीण होऊन जाते, पण त्यातही तु्म्ही योग्य निर्णय घेतला तर तुमचे आयुष्य अधिक सुखी होते
हे नेहमी गरजेचे नाही की चुकीच्या गोष्टींमध्ये तुमचे नाव आले तिकडे तुम्ही चूक आहात, तुम्ही स्वत: ला सिद्ध केल्यानंतर नक्कीच लोक ती चूक विसरतात
आता हे सत्य वचन मराठी पाठवून तुम्ही आयुष्य जगण्याची एक नवी उमेद देतात. या शिवाय प्रेरणादायी कविता पाठवू शकता.