सणासुदीचे दिवस आले की बाजारात खव्याचे पदार्थ दिसू लागतात. खूप जणांना खव्यापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ खूपच जास्त आवडतात. त्यामुळेच की काय सणासुदीच्या दिवसात खव्याचे पदार्थ (Khava Recipe In Marathi) हे जास्त दिसू लागतात. खवा हा दूधापासून तयार केला जातो. दूध चांगले आटले त्यातल्या पाण्याचा अंश घटू लागला की, त्याचा एक लगदा तयार होऊ लागतो. त्याला खवा असे म्हटले जाते. खव्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे काही वेळा गोड आणि थोडासा निमगोड खवा असा आपल्याला मिळतो. खव्याचा उपयोग करुन वेगवेगळे पदार्थ (Khava Recipe In Marathi) म्हणजेच गुलाबजाम (Khava Gulab Jamun Recipe In Marathi), खवा मोदक (Khava Modak Recipe In Marathi), खवा करंजी रेसिपीज (Khava Karanji Recipe In Marathi), खवा पोळी (Khava Poli Recipe In Marathi) अशा काही खास रेसिपी बनवता येतात. आज जाणून घेऊया खवा पासून बनणारे पदार्थ किंवा खव्याचे पदार्थ रेसिपी त्याही मराठीमध्ये चला करुया सुरुवात. या शिवाय दिवाळीचा फराळ उत्तम बनवण्यासाठी तुम्ही काही खास रेसिपी फॉलो करु शकता. दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दिवाळीचा आनंद व्यक्त करु शकता.
खवा पोळी (Khava Poli Recipe In Marathi)
खवा पोळी (Khava Poli Recipe In Marathi) हा पदार्थ खूप जणांनी केला असेल आणि खूप जणांना करुन खायची इच्छा असेल. जाणून घेऊया खवा पोळी रेसिपी. याशिवाय तुम्ही खमंग चकली रेसिपी देखील ट्राय करु शकता.
साहित्य: ¼ किलो खवा, ½ कप साखर, 1 ½ कप मैदा, वेलची पावडर, जायफळ पूड, मीठ आणि तूप
कृती :
- खवा पोळी करण्यासाठी आधी खवा तयार करुन घ्यायचा आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करुन त्यामध्ये खवा घालायचा आहे. त्यात पिठी साखर घालून तो चांगला मोकळा करुन घ्यायचा आहे. तुपामध्ये तो चांगला परतल्यामुळे त्याचा एक चांगली चमक येते.
- मैद्याचे पीठ पाणी घालून हलक्या हाताने मळून घ्या. ओल्या कपड्याखाली ठेवा. ज्याप्रमाणे आपण पुरणाच्या पोळ्या करतो. त्याप्रमाणे आपल्याला खव्याच्या पोळ्या लाटायच्या आहेत. त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन तो थोडासा लाटून त्यामध्ये तयार खवा घालायला आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे.
- वरुन छान तूप लावायचे आहे. तुमच्या खवा पोळी तयार
खव्याच्या साटोऱ्या (Khava Satori Recipe In Marathi)
खव्याच्या मदतीने केला जाणारा आणखी एक पदार्थ म्हणजे खव्याच्या साटोऱ्या (Khava Satori Recipe In Marathi) या देखील करायला तशा सोप्या आहेत.
साहित्य: 1 कप रवा, 2 मोठे चमचे मैदा, चवीनुसार मीठ, पाणी किंवा दूध, तूप,
सारणासाठी – 1 कप खवा, ¼ कप रवा, ⅓ कप पिठी साखर, आवडीचे ड्रायफ्रुट्स, ¼ वेलची पूड, जायफळ पूड, 1 चमचा तूप
कृती:
- आवरणाची तयारी करण्यासाठी एका भांड्यात तुम्हाला रवा, मैदा, मीठ घालून पीठ अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचे आहे. त्यामध्ये अगदी थोडेसे तूप घालावे म्हणजे पिठाला चांगला खुसखुशीतपणा येतो.
- एका सॉसपॅनमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये रवा गरम करुन घ्या. रवा चांगला भाजला की त्यामध्ये खवा घालावा. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स पूड घालावी.सारण गॅसवरुन उतरवल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड, जायफळ पूड घालावी. तुमचे सारण तयार
- आता साटोऱ्या करण्यासाठी मैद्याचा लहानसा गोळा घेऊन ती लाटा आता त्यात सारणाचा गोळा करुन तो चांगला भरुन घ्या. पुऱ्यांचा आकाराएवढ्या पुऱ्या लाटून घ्या. एका कढईत तूप गरम करुन त्यामध्ये साटोऱ्या तळून घ्या. या साटोऱ्या चवीला एकदम मस्त लागतात.
खवा मोदक (Khava Modak Recipe In Marathi)
खव्यापासून मोदक (Khava Modak Recipe In Marathi) देखील बनवले जातात. खव्यापासून मोदक कसे बनवायचे ते देखील जाणून घेऊया.
साहित्य: ¼ वाटी खवा, ¼ वाटी साखर, वेलची पूड, पिवळा किंवा केशरी रंग,चांदीचा किंवा सोन्याचा वर्ख,तूप
कृती :
- एका कढईत तूप गरम करुन त्यामध्ये खवा चांगला भाजून मोकळा करुन घ्या
- खवा थंड झाला की, त्यामध्ये पिठी साखर, आवडीचा रंग, वेलची पूड घालून सगळे सारण एकजीव करुन घ्या
- मोदकाचा साचा घेऊन त्यामध्ये मोदक काढून घ्या. त्यावर चांदीचा वर्ख लावा. तुमचे मस्त खवा मोदक तयार
खवा करंजी (Khava Karanji Recipe In Marathi)
दिवाळी म्हटली की करंजी करणे आलीच. करंजीमध्ये वेगवेगळे सारण घातले जाते. खव्याची करंची हा प्रकार देखील फार प्रसिद्ध आहे. खव्याच्या करंज्यांना गुजिया असे देखील म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही ही करंजी नक्की ट्राय करुन पाहायला हवी.
साहित्य: 1मोठी वाटी खवा , 1 कप मैदा, ½ कप पिठी साखर, वेलची पूड,आवडीनुसार ड्रायफ्रुटचे पातळ तुकडे किंवा काप, चवीपुरते मीठ, तेल, दूध
कृती:
- जर तुम्हाला ताजा खवा बनवायचा असेल तर तुम्ही दूध आटवून घरीच खवा देखील बनवू शकता. किंवा थेट खवा घेऊ शकता.
- एका भांड्यात तूप गरम करुन त्यामध्ये खवा चांगला भाजून घ्या. तो छान हलका व्हायला हवा. आता खवा एका भांड्यात काढून घ्या. तो थोडा थंड झाला की, त्यामध्ये साखर, वेलची पूड, ड्रायफ्रुट घालून चांगले एकजीव करा. तुमचे सारण तयार
- आता तुम्हाला करंजीचे आवरण तयार करण्यासाठी एका भांड्यात मैदा घेऊन त्यामध्ये थोडेसे तूप गरम करुन घालायचे आहे. आता दूध किंवा पाणी वापरुन अगदी हलक्या हाताने मळून घ्या. आता कंरजीप्रमाणे करंजी तयार करा. आणि मध्यम आचेवर तेल गरम करुन करंजी तळून घ्या.
खवा गुलाबजाम (Khava Gulab Jamun Recipe In Marathi)
गुलाबजाम सुपर सॉफ्ट आणि टेस्टी तेव्हाच लागतो ज्यावेळी त्यामध्ये खवा वापरला जातो. खवा गुलाबजाम करण्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करु शकता.
साहित्य: ¼ कप मैदा , 250 ग्रॅम मावा, 1 ½ कप साखर, तूप किंवा तेल, वेलची पूड
कृती:
- एका भांड्यामध्ये मैदा आणि मावा, चिमूटभर सोडा एकत्र करुन हे मिश्रण चांगले चोळून घ्या. त्याचा एक गोळा होईपर्यंत तुम्हाला मळायचे आहे.
- आता पाक करण्यासाठी दुसऱ्या कढईत पाणी आणि साखर घेऊन त्याचा एक घट्ट असा पाक करायचा आहे (गुलाबजामला लागेल इतका पाक तुम्हाला करायचा आहे)
- आता कढईत तेल गरम करुन गुलाबजामचे गोळे सोडायचे आहेत. अगदी मंद अशा आचेवर तुम्हाला ते चांगले शिजू द्यायचे आहेत. पाकात वेलची पूड घालून त्यामध्ये गुलाबजामचे गरम गरम गुलाबजाम सोडायचे आहेत. तुमचे मावा किंवा खवा गुलाबजाम (Khava Gulab Jamun Recipe In Marathi) तयार
खवा जिलेबी (Jilebi With Khava Recipe In Marathi)
खव्याचा उपयोग करुन जिलेबी देखील तयार केली जाते. खव्याची जिलेबी ही चवीला कुरकुरीत नाही तर थोडी नरम लागते. साधारण पनीरच्या चवीलसारखी ही जिलेबी लागते.
साहित्य: 1 कप मावा, ½ कप कॉर्नफ्लॉवर, बेकिंग पावडर, 1 ½ कप साखर, वेलची पूड, तळण्यासाठी तेल किंवा तूप, केशर
कृती:
- एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मावा, कॉर्नफ्लॉवर आणि बेकिंग पावडर घालून ते चांगले वाटून घ्या. त्यामध्ये पाणी घालून त्याचा लगदा करुन घ्या. तो पातळ न होता छान मऊ व्हायला हवा.
- जिलेबीसाठी पाक तयार करुन घ्या. त्यासाठी एका पॅनमध्ये साखर घेऊन त्यामध्ये पाणी ,केशर, वेलची पूड घालून एक छान पाक करुन घ्या.
- जिलेबी पाडण्यासाठी एखादा बॉटल किंवा पाईपिंग बॅग घेऊन त्यामध्ये हे सगळे मिश्रण घ्यावे. तेल गरम करुन त्यामध्ये जिलेबीच्या आकारामध्ये जिलेबी सोडा. तयार जिलेबी पाकात सोडा. तुमची खव्याची जिलेबी तयार
खवा बर्फी (Khavyachi Barfi Recipe In Marathi)
खवा बर्फी हा प्रकार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घरात अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करु शकता. चला जाणून घेऊया खवा बर्फीती रेसिपी
साहित्य: 1 वाटी खवा, 1 वाटी साखर, ड्रायफ्रुट्सचे काप, वेलची पूड, चांदीचा वर्ख, तूप
कृती:
- एका भांड्यात तूप गरम करुन त्यामध्ये खवा घाला. खवा चांगला खरपूस भाजून घ्या.
- खवा काढून त्यामध्ये ड्रायफ्रुट्सही भाजून घ्याखवा चांगला मोकळा झाला की तो खाली उतरवा. आता त्यामध्ये पिठी साखर, ड्रायफ्रुट्सचे काप, वेलची पूड घाला.
- एक खोलगट ताट घेऊन त्याध्ये खव्याचे सारण पररवा. त्यावर ड्रायफ्रुट्सचे काप घाला. ताटाला आधी तूप लावा. वरुन चांदीचा वर्ख लावून त्याचे काप करा.
खवा पुरी (Puri With Khava Recipe In Marathi)
ज्याप्रमाणे आपण साटोऱ्या केल्या अगदी त्याचप्रमाणे आपल्याला खवा पुरी करायच्या आहेत. या करणे फारच सोपे असते.
साहित्य: 1 वाटी खवा, ½ वाटी पिठी साखर, वेलची पूड, गव्हाची कणीक, तूप, तळण्यासाठी तेल, मीठ
कृती :
- कढई किंवा पॅन गरम करुन त्यामध्ये खवा भाजून घ्या. थंड झाला की त्यामध्ये साखर, वेलची पूड घाला. तयार सारण बाजूला ठेवा.
- गव्हाची मळलेली कणीक घेऊन तुम्ही त्याचा एक पेढा घ्या. तो लाटून त्यामध्ये खव्याचे सारण भरा. पुऱ्या लाटून त्या तळून घ्या.
- काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर तुम्हाला या पुऱ्या करायला काहीच हरकत नाही.
खव्याचा पेढा (Khava Peda Recipe In Marathi)
खव्याचे पेढे तुम्ही अनेक ठिकाणी खाल्ले असतील. पण विकताचा पेढा घेण्यापेक्षा तुम्ही घरीच खव्याचा पेढा बनवू शकता.
साहित्य: खवा, साखर, वेलची पूड
कृती :
- एका भांड्यात खवा घेऊन तो चांगला भाजून ध्या. त्याचा रंग बदलेपर्यंत तो भाजणे गरजेचे असते. त्यातून तेल सुटायला हवे.असे झाल्यानंतर ते वाळते.
- खवा पॅनमधून काढून त्यामध्ये पिठी साखर घाला. त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घाला. आता ते चांगले एकजीव करुन त्याचे पेढे बनवायला घ्या. खव्याचा पेढा तया
खवा बासुंदी (Khava Basundi Recipe In Marathi)
बासुंदी घट्ट हवी असेल तर त्यामध्ये खवा घातला जातो. खवा घातला की त्यामुळे बासुंदीची चव अधिक चांगली लागते.
साहित्य: ¼ वाटी खवा, दूध, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स, साखर
कृती :
- दूध गरम करुन त्यामध्ये साखर घालून ते चांगले आटवून घ्या. बासुंदीसाठी आपण जितके आटवतो तितकेच आपल्याला आटवायचे आहे. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स, साखऱ आणि वेलची पूड घालून चांगले एकजीव करायचे आहे.
- चांगली उकळी आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये खवा मोकळा करुन घालायचा आहे. दूध मंद गॅसवर चांगले उकळायचे आहे. तुमची खवा बासुंदी तयार
खवा लाडू (Khava Ladu Recipe In Marathi)
रव्याच्या लाडूमध्ये थोडासा खवा घातला की, त्याची चव ही फार वेगळी लागते. तुम्हालाही असा खवा लाडू करता येऊ शकतो.
साहित्य: 3 कप रवा, 1 ¼ मावा, 2 कप साखर, साजूक तूप, वेलची पूड, सुक्या मेव्याचे काप, आवश्यकतेनुसार पाणी
कृती:
- सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजायचा आहे. त्यासाठी तुम्हाला कढईत रवा घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार रवा घालायचा आहे. रवा चांगला भाजून घ्या.त्यामध्ये सुक्या मेव्याचे काप घालून तेही रव्यासोबत भाजा. आता त्याच कढईमध्ये तुम्हाला खवा भाजून घ्यायचा आहे. दुसरीकडे आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे.
- खवा आणि रवा एकत्र करुन त्यामध्ये तयार पाक मुरेल तेवढा घालायचा आहे. त्याचे लाडू वळून घ्यायचे आहे. तुमचा खवा लाडू तयार.
खवा केक (Khava Cake Recipe In Marathi)
बेकरीचे केक तुम्ही कधी खाल्ले असतील तर बेकरीतला मऊसूत असा खव्याचा केक खवा केक khava cake recipe in marathi तुम्ही कधी खाल्ला असेल तर तुम्ही घरीत खव्याचा केक खाऊ शकता.
साहित्य: 4 चमचे बटर, 1 कप मैदा, ½ छोटा चमचा बेकिंग पावडर, ½ चमचा बेकिंग सोडा, ¼ कप दूध, ¼ कप मावा, पिस्ता आणि बदामाचे काप
कृती :
- हा केक कुकरमध्ये करता येतो त्यामुळे तुम्हाला कुकरची शिटी काढून कुकर प्रीहिट करायला ठेवायचा आहे.
- एका मिक्सिंग बाऊलमध्ये बटर आणि साखर घेऊन हे मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटा. हे मिश्रण एकजीव झाले की, त्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा घालून मिश्रण एकजीव करा. त्यामध्ये मावा घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला. केकचे बॅटर तयार करुन ते ग्रीस केलेल्या केक टीनमध्ये घाला. केक 25 मिनिटे किंवा पूर्ण शिजेपर्यंत ठेवा. केक तयार झाला की तो थंड करुन खा. हा केक कॉफीसोबत एकदम छान लागतो.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. खवा किती दिवस टिकतो?
खवा हा दुधापासून बनवला जाणारा पदार्थ आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त 3 दिवसांसाठी काहीही न करता टिकू शकतो. पण अनेकजण फ्रिजमध्ये खवा ठेवतात. त्यामुळे तो थोडा अधिक काळ टिकला तरी देखील तो आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. त्यामुळे खवा शक्यतो लवकर खाऊन संपवणे जास्त असते.
2. भेसळयुक्त खवा कसा ओळखावा?
हल्ली अनेक गोड पदार्थांमध्ये भेसळ झालेली पाहायला मिळते. मिठाईमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणाऱ्या खव्यामध्ये भेसळ केली जाते. खवा शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी खव्यामध्ये पाणी घालून ते गरम केले जाते. गरम झाल्यावर त्यामध्ये काही थेंब टिंचर आयोडिन घाला. जर खव्याचा रंग निळा झाला की, समजावे हा खवा चांगला नाही. जर खव्याचा रंग अजिबात बदलला नाही तर खवा शुद्ध आहे असे समजावे.
3. खव्याचे प्रकार कोणते?
खवा हा वेगवेगळ्या गोड पदार्थांमध्ये वापरला जातो. या अशा खव्याचे गुलकंद खवा, रोझ खवा, कलाकंद आणि कुंदा असे प्रकार मिळतात. खव्याचा हा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करायला हवा.
अधिक वाचा:
नासलेलं दूध टाकून न देता असा करा वापर, बनवा स्वादिष्ट पदार्थ