ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to reuse leftover gulab jamun sugar syrup

गुलाबजामचा पाक उरला असेल तर त्याचा करा असा पुर्नवापर

गुलाबजाम अथवा रसगुल्ले ज्यांना आवडतात. त्यांच्या घरी वारंवार गुलाबजाम अथवा रसगुल्ले बनवले जातात. खास सणसमारंभ, कार्यक्रमासाठी घरात गोड पदार्थामध्ये गुलाबजामचीच वर्णी लागते. मात्र गुलाबजाम अथवा रसगुल्ले खाल्ल्यानंतर त्याचा पाक तसाच उरतो. बरेच जण हा उरलेला पाक नंतर फेकून देतात. मात्र पाक साखरेचा असल्यामुळेल लवकरल खराब होत नाही. सहाजिकच तो फेकून देण्याची मुळीच गरज नसते. गुलाबजामच्या या उरलेल्या पाकापासून तुम्ही अनेक गोड पदार्थ पुन्हा बनवू शकता. यासाठी जाणून घ्या उरलेल्या गुलाबजामच्या पाकाचा वापर कसा करावा.

how to reuse leftover gulab jamun sugar syrup 

स्पेशल पार्टीसाठी मेन्यू ठरवत आहात, मग हे वाचाच (Party Menu Ideas In Marathi)

गुलाबजामचा उरलेला पाक असा वापरा

गुलाबजाम अथवा रसगुल्ले खाऊन झाले की त्याच्या उरलेल्या पाकाचं काय करावं असा प्रश्न पडला असेल तर या टिप्स करा फॉलो.

  • मालपोहे बनवा.. नाश्ता अथवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मालपोहे हा एक झटपट आणि चविष्ट पदार्थ कधीही बनवता येतो. त्यामुळे मालपोहे बनवून तुम्ही ते गुलाबजामच्या उरलेल्या पाकात बुडवून ठेवू शकता. तसंच जर तुमचेही गुलाबजाम फुटत असतील,जाणून घ्या परफेक्ट गुलाबजाम बनवण्याची पद्धत
  • गोड शिरा अथवा सांजा बनवण्यासाठी तुम्ही गुलाबजामचा उरलेला पाक वापरू शकता. कारण त्यासाठी साखरेचा पाक करण्यापेक्षा हा पाक तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल.
  • गव्हाच्या पीठाचे पॅनकेक बनवा आणि त्याला गार्निश करण्यासाठी गुलाबजामचा पाक थोडा घट्ट करून वापरा.
  • केशरी भात, साखरभात अथवा नारळी भात अशा गोड भाताच्या प्रकारासाठी तुम्ही गुलाबजामचा उरलेला पाक वापरू शकता. 
  • घरी उरलेला ब्रेड असेल तर तो मस्त डीप फ्राय करा आणि त्यावर रबडी आणि गुलाबजामचा पाक टाकून मस्त शाही तुकडा बनवा.
  • घरी असलेली फळांचे छोटे छोटे तुकडे करा आणि त्यावर गुलाबजामचा पाक आटवून टाका. ज्यामुळे तुम्हाला घरच्या घरी छान डेझर्टचा आनंद मिळेल.
  • जर तुम्हाला आवळ्याचा मुरब्बा करायचा असेल तर तुम्ही गुलाबजामच्या उरलेल्या पाकामध्ये आवळे बुडवून ठेवू शकता. ज्यामुळे तुमचा पाक वाया जाणार नाही. 
  • ड्रायफ्रूट्स कॅरेमल करण्यासाठी तुम्ही गुलाबजामच्या पाकाचा वापर करू शकता.
  • गोड पुरी अथवा पोळी करण्यासाठी गव्हाच्या पीठात साखरेचा पाक मिसळा आणि पोळी अथवा पुरी बनवा.
  • गुलाबजामचा पाक चांगला आटवून घट्ट करा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या ज्यामुळे हवा तेव्हा तुम्हाला तयार पाक घरात मिळेल. 
  • शंकरपाळी, पाकातले लाडू, बिस्किटे अशा पदार्थांमध्येही तुम्ही गुलाबजामचा पाक टाकू शकता. 

घरच्या घरी बनवा 15 मिनिट्समध्ये झटपट रव्याचे गुलाबजाम

ADVERTISEMENT
01 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT