ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मराठीतील ‘खिचिक झालं पोट्ट्याले’ हे गाणं तुम्ही ऐकलंत का

मराठीतील ‘खिचिक झालं पोट्ट्याले’ हे गाणं तुम्ही ऐकलंत का

‘काजळली रात खुळी, बेहेकला जमाना’ असे धमाल शब्द असलेलं ‘खिचिक झालं पोट्ट्याले’ हे ‘खिचिक’ या चित्रपटातील गाणं यूट्युबवर अल्पावधीतच ट्रेडिंग झालं आहे. तुम्ही ऐकलं का हे गाणं पाहा याचा व्हिडिओ.

खिचिकच्या गाण्याची कमाल

श्रुतिका लोंढेवर चित्रीत झालेल्या या गाण्याला एका दिवसातच तीन लाख व्ह्यूज मिळाले असून या गाण्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. आदर्श शिंदे आणि श्रुती जकाती यांनी हे गाणं गायलं आहे, तर दत्ता गुंजाळ यांच्या शब्दांना अभिषेक-दत्ता यांनी संगीतबद्ध केलं आहे. अभिषेक काटेनं संगीत संयोजन केलं आहे. 19 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या गाण्यानं एका दिवसातच तीन लाखांचा टप्पा गाठला आहे. या गाण्याचा लुक थोडा फार बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानच्या चेन्नई एक्सप्रेसमधल्या ‘1234 गेट ऑन द डान्स फ्लोअर’ या गाण्यासारखा आहे. 

खिचिकमध्ये दिसणार मराठमोळा मोगली

Instagram

ADVERTISEMENT

आपण सगळ्यांनी हिंदीतला मोगली पाहिला असेल.. पण आता मराठीतही पहिल्यांदाच ‘खिचिक’ मध्ये मोगली येऊ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा मोगली आहे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा शौर्य उर्फ यश खोंड हा बालकलाकार. मूळचा परभणीचा असलेला यश वडिलांच्या बिझनेसमुळे पुण्यात वाढला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे. गणपतीमध्ये नक्कल करणं असो किंवा चित्रपटातले संवाद हुबेहुब म्हणून दाखवणं असो. यशने सगळ्यांची मन जिंकली. अभिनयासोबत नृत्याचीही आवड असलेल्या यशने डान्स क्लासमध्येही उत्तम प्रतिसाद मिळवला. त्याच्या आई-वडिलांनी त्याला खूप मेहनतीने घडवलं आहे. याही बाबतीत असंच घडलं. यशच्या अंगातले सुप्त गुण लक्षात आल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला अभिनय क्षेत्रातच पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांची भेट दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांच्याशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अभिनयामधील उणिवा त्याने भरून काढल्या आणि त्यानंतर प्रितम यांनी आपल्या आगामी येणाऱ्या “खिचिक” चित्रपटासाठी यशची निवड केली. अशाप्रकारे यशचा “खिचिक” चा प्रवास सुरू झाला.

बालकलाकार यशची हटके भूमिका

यश साकारत असलेलं ‘फटफटी’ नावाचं पात्र हे पारधी समाजातील एका लहान मुलाचं पात्र आहे. जो अतिशय खोडकर आहे आणि दिसायला थेट मोगलीसारखा आहे. त्याचं जीवनही बरंचसं मोगलीसारखंच आहे. जंगलात राहणं, मासोळ्या पकडणं आणि दिवसभर धुडगूस घालणं असे उद्योग हा फटफटी करतो. एक दिवस त्याच्या आयुष्यात एक खिचिक घटना घडते. मग नेमकं काय होतं. त्यातून या व्यक्तिरेखेचा प्रवास प्रितम पाटील यांनी उलगडला आहे. हे पात्र साकारण्यासाठी खूप मेहनत घेणं गरजेचं होतं. पण प्रयत्नांची कोणतीही कसर यशने सोडली नाही. गुबगुबीत देहाच्या यशने या भूमिकेसाठी चक्क दहा किलो वजनही कमी केलं. पारधी समाजाची भाषा, त्यांचं जीवन, देहबोली हे सगळं काही तो अवघ्या चार महिन्यात शिकला. शहरात वाढलेला यश ते जंगलात राहणारा फटफटी असा प्रवास त्याने उत्तमरित्या साकारल्याचं सांगत दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

नात्यांची अनोखी कथा खिचिक

नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार असून रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते, शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण, यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. खिचिक हे नाव अनोखं आहे, त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबाबती उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या 20 सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

Sacred Games 2 :धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने अनुराग कश्यपविरोधात पोलीस तक्रार

#angrybirdsmovie2 मधील ‘रेड’ला कपिल शर्माचा आवाज

संगीताचा ‘बाजार’ न मांडणाऱ्या संगीत दिग्दर्शक खय्याम यांचं निधन

21 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT