जुनी फॅशन परत परतून येते असे म्हणतात ते उगीच नाही कारण हल्ली पुन्हा एकदा अगदी मराठमोळे लुक्स परत येऊ लागले आहेत. पैठणी, चोळी, इरकल आणि खणाची फॅशन आता पुन्हा दिसू लागली आहे. कोणत्याही लग्नासाठी किंवा फेस्टिव्हसाठी या जुन्या साड्यांचे नवे ट्रेंड फारच उठून दिसतात. सध्या खण साड्यांची फारच चलती आहे. साडीच नाही तर खणाचा ब्लाऊचही आता चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. खणाचा ब्लाऊज हा कोणत्याही प्रकारच्या साडीला एक वेगळा लुक देऊ शकतो. हल्ली खणाच्या ब्लाऊजमध्येही वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला यंदा नवरात्रीत, दिवाळीत किंवा आता येणाऱ्या लग्नाच्या सीझनमध्ये वेगळे दिसायचे असेल तर तुम्ही खणाच्या ब्लाऊजचा हा ट्रेंड कॅरी करायला हवा.
लग्नसराईसाठी साड्यांचे प्रकार (Marathi Wedding Sarees Shalu)
नथीचा नखरा
नथ असलेल्या साड्या सध्या फारच ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्हाला नथीची साडी कॅरी करायच नसेल तर नथ असलेले ब्लाऊजपीसही आता मिळू लागले आहेत. एम्ब्रोयडरी केलेल्या नथीचे ब्लाऊज सध्या सगळीकडे मिळतात. पाठीवर एक मोठी नथ असते. पाठ भरुन ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्हाला ही नथ छान पाठीवर घेता येते. खण प्रकारात मिळणाऱ्या नथीच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला बरेच रंग आणि नथीचे पॅटर्न मिळतात. कोणत्याही प्लेन साडीवर किंवा एखाद्या ट्रेडिशनल साडीवर हा ब्लाऊज खूप छान उठून दिसतो. त्यामुळे हा नथीचा नखरा तुम्ही अगदी हमखास ट्राय करायला हवा.
सुंदर आणि लेटेस्ट नथ डिझाईन्स खास तुमच्यासाठी
चंद्रकोर
चंद्रकोर असलेले ब्लाऊजही हल्ली पाहायला मिळतात. नखीप्रमाणेच पाठीवर चंद्रकोर विणलेली असते. वेगवेगळ्या रंगामध्ये ही चंद्रकोर असते. त्यामुळे ही पाठभर आलेली चंद्रकोर दिसायला एकदम सुंदर आणि वेगळी दिसते. खणाच्या ब्लाऊजचा हा प्रकारही तुम्ही कोणत्याही साडीवर घालू शकता. कारण तो उठून दिसतो. चंद्रकोर मोठी असेल तर ती अधिक छान दिसते. पण तुमची चण बघून तुम्ही चंद्रकोराची निवड करा.
मिक्स खण
हल्ली मिश्र खणांचे ब्लाऊजसुद्धा मिळतात. म्हणजे त्यामध्ये एक असा रंग नसतो. असे ब्लाऊज पीस तुम्हाला कोणत्याही रंगाच्या साडीवर नेसता येतात. ज्यावेळी तुम्हाला काही कॉन्ट्रास घालायची इच्छा असेल त्या साडीवर तुम्ही असे मिश्र खण असलेले ब्लाऊज निवडू शकता. जे दिसायला फारच सुंदर दिसतात. त्यामुळे तुमच्याकडे हा एअसा प्रकारातील एक तरी ब्लाऊज असायला हवा. कारण असा ब्लाऊज तुम्हाला अगदी कशावरही घालता येतो.
सौभाग्यवती
हल्ली होणाऱ्या नवरीसाठीही खणाचे खास ब्लाऊज मिळतात. या ब्लाऊज पीसच्या मागे सौभाग्यवती असे लिहिलेले असते. सौभाग्यवती असे लिहिलेले असताना त्यामध्ये सौभाग्याचीही काही चिन्हे असतात. त्यामुळे असे ब्लाऊज थोडे हेव्ही स्वरुपात घेऊन तुम्हाला साडी नेसता येते. अशा प्रकारचे लिहिलेले ब्लाऊज खणामध्ये मिळतात. किंवा तुम्हाला करुनही घेता येतात. लग्न लगाताना तुम्ही जी साडी नेसणार असाल त्या साडीवर तुम्हाला अशा स्वरुपाचे ब्लाऊज घालता येतील .
आता खणाच्या साडीचा हा ट्रेंड तुम्ही नक्की कॅरी करा कारण तो तुम्हाला नक्की या फेस्टिव्ह सीझनमध्ये ट्रेंडी दिसण्यास मदत करेल.