Advertisement

DIY फॅशन

सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी

Dipali NaphadeDipali Naphade  |  Oct 23, 2020
सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी

Advertisement

साडी म्हटलं की एक वेगळाच लुक डोळ्यासमोर येतो. आता अगदी वेगवेगळ्या साड्यांची फॅशन आली आहे. पण आजही महाराष्ट्रीय खणाची साडी ही सगळ्यात अप्रतिम ठरते आणि या साडीची भुरळ आपल्या मराठी अभिनेत्रींनाही पडली नसती तर नवलचं.  खणाच्या या साडीचा लुकच वेगळा आहे. त्यातही फ्युजन लुक आणि अगदी मराठमोळा लुक असा कोणताही लुक तुम्ही करू शकता. याबरोबर तुम्ही ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी घातली की वेगळाच साज चढतो. अशीच आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रींची ही खणाची साडी नेसल्यावर केलेली स्टाईल ही वाखाणण्याजोगी आहे. तुम्हालाही हे लुक पाहून आपल्या वॉर्डरोबमध्ये ही मराठमोळी साडी असायलाच हवी असं वाटेलच.  खणाची साडी हा महाराष्ट्रीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अगदी पूर्वकाळापासून ही साडी नेसण्यात येते. पण आता त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. तर मिक्समॅच करून नेसण्यात येणारी ही साडी वेगळाच स्टायलिश लुक मिळवून देते.  आजकाल टिपिकल साड्यांपेक्षा वेगळा लुक करण्याची एक फॅशनच आली आहे आणि यामध्ये सर्वात वरचढ ठरते ती खणाची साडी. 

उर्मिलाची मनमोहक अदा!

उर्मिला कोठारे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला नक्कीच नवीन नाही. मरून रंगाच्या या अप्रतिम खणाची साडीमध्ये उर्मिलाचं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे. साध्या काठाच्या साडीवर खणाचे ब्लाऊज असे पूर्वीचे समीकरण असायचे. पण आता या खणाच्या साडीवर वेगवेगळ्या प्रकारचे कॉटन ब्लाऊज घातले जातात. जे अत्यंत सुंदर दिसतात. उर्मिलाच्या या खणाच्या साडीलादेखील ब्लाऊजमुळे अधिक चांगला लुक आला आहे. दोन्ही मिसमॅच करून हा अप्रतिम लुक उर्मिलावरून नजर हटू देत नाही.

अभिनेत्रींची साडी जॅकेट स्टाईल होतेय व्हायरल

उफ! प्राजक्ता

View this post on Instagram

झाकू कशी पाठीवरली… चांदण गोंदणी बाई… बाई चांदण गोंदणी… झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी लावण्याची खाणी…… . #lovethissong #prajaktamali #मराठीगाणी #खणचोळी 🥰 . . Wearing: Sparsh by @k2fashioncloset Designed & Style by: @ketaki_ashish hair n MUA by: @madhurikhese_makeupartist @seemaaofficial Jewellery by: @priyahurne Assist by: @a_m_m_e_y Shot by: @vikrantmumbaikar Social Media: @sagardxt .

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on Feb 6, 2020 at 9:47pm PST

खणाच्या साडीमध्येही अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचे वेगवेगळे डिझाईन्स करून ही साडी नेसता येते.  याचा ग्लॅमरस लुक दाखवला आहे प्राजक्ता माळीने.  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहचलेली प्राजक्त या साडीमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ता नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंवरून फोटो शेअर करत असते. पण साडीमध्येही तितकीच मादकता दाखवते येते हे प्राजक्ताच्या या लुकमधून दिसून येते. यावर तुम्ही लाईट मेकअप आणि आमच्या MyGlamm मधील गडद शेडची लिपस्टिक लावली तर तुमचा लुक 

‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल

स्वाती लिमयेची निरागसता!

खणाच्या साडीमध्ये तुम्ही वेगवेगळा लुक नक्कीच करू शकता. वेगळी स्टाईल करून तुम्ही खणाच्या साडीने आपल्या व्यक्तिमत्वामध्ये फरक दाखवू शकता हे स्वाती लिमयेच्या या लुकवरून नक्कीच लक्षात येईल. स्वाती या खणाच्या साध्या साडीमध्ये निरागस आणि तितकीच आकर्षक दिसत आहे. तिची ही स्टाईल घरातील कोणत्याही समारंभाला तुम्ही करू शकता. 

शाल्मलीचा आकर्षक लुक

शाल्मली टोळ्ये अभिनेत्री तर आहेच. मात्र ती स्वतः एक स्टायलिस्ट आहे. त्यामुळे कोणती फॅशन कशी कॅरी करायची हे तिला स्वतःलाही खूपच चांगले जमते. मजेंडा रंगाच्या या साडीमध्ये शाल्मलीचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. त्यावर तिचे कुरळे केस तिला अधिक सुंदर दिसत आहेत. केस सोडल्यामुळे तिची ही स्टाईल अधिक सुंदर दिसत आहे. तसंच या साडीला साजेसे दागिने तुम्हाला ही स्टाईल बारकाईने बघण्यास भाग पाडत आहेत.

ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय

साधेपणातही सुंदरता

खणाच्या साडीचा मूळ गाभा आहे तो त्याचा आकर्षक रंग. साधेपणातही असलेली सुंदरता. अभिनेत्री अर्चना निपाणकरने नेसलेल्या या पोपटी रंगाच्या खणाच्या साडीमधील लुक हा अनुभव नक्कीच देतोय. नव्या नवरीने असा लुक केल्यास, अधिक सुंदर दिसेल असा विचार पटकन मनात येऊन जातो. कोणताही भपका नाही आणि अतिशय सुंदर आणि तितकाच साधा पण क्लासी लुक आपल्याला यातून दिसून येतो आहे. 

भारदस्त आणि नाजूकपणाचा समतोल असणारी मृण्ययी

मृण्मयी नेहमीच आपले साड्यांमधले वेगवेगळे लुक सोशल मीडियावर शेअर करत असते. पण मृण्यमीच्या जास्त लुकमध्ये कॉटन आणि खणाच्या साड्यांमधील लुक तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. भारदस्त आणि नाजूकपणाचा समतोल नेहमी मृण्मयीच्या स्टाईलमधून दिसून येतो. खणाच्या साडीमध्ये तुम्हीही असा लुक नक्कीच मिळवू शकता. तुमच्या वक्तिमत्वाला वेगळा लुक देण्यासाठी अशा खणाच्या साड्या नक्कीच फायदेशीर ठरतात. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक