महिलांमध्ये सध्या प्रजनन क्षमता कमी झाल्याने गर्भधारणेमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. महिला अथवा पुरूषांच्या वंधत्वामागे अनेक कारणं असू शकतात. बदलेली जीवनशैली, कामाचा ताण, अयोग्य आहार, चुकीचे वय मात्र या सर्व समस्यांवर अनेक वैद्यकीय उपचार सध्या उपलब्ध आहेत. जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल आणि वैद्यकीय उपचारांचा कोणताही फायदा तुमच्यावर होत नसेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत योग्य बदल करण्याची गरज आहे. शरीरात पोषक घटक कमी असण्यामुळेदेखील प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यावर घरगुती उपाय करण्यासाठी तुम्ही काळ्या मनुकांचे पाणी पिऊ शकता.
काळ्या मनुका वंधत्वावर फायदेशीर ठरतात. कारण यातील पोषक घटकांमुळे तुमच्या गर्भधारणेतील अडचणी कमी होऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या काळ्या मनुकांचे पाणी गर्भधारणेसाठी कसे उपयुक्त आहे.
महिलांमधील वंधत्वाचे मुख्य कारण –
महिलांमधील प्रजनन क्षमता कमी होणं ही गर्भधारणेतील एक मुख्य अडचण आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमधील हॉर्मोनल संतुलन बिघडते ज्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. याच कारणामुळे त्यांच्या मासिक पाळीचे चक्र बिघडते, ज्याचा परिणाम त्यांच्या ओव्हुलेशनवर होतो. काही जणींचे ओव्हुलेशन योग्य पद्धतीने होत नाही, तर काहींचे ओव्हुलेशन झाल्यावरही निर्माण होण्याऱ्या एग्सची गुणवत्ता कमी असते. अशा अनेक कारणांमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊन गर्भधारणा होण्यास अडचणी येतात.
काळ्या मनुकांचे पाणी आहे फायदेशीर –
ज्या महिलांना गर्भधारणेमध्ये अडचणी येत असतील मात्र ते बाळासाठी प्रयत्न करत असतील अशांना काळ्या मनुका वरदान ठरू शकतात. कारण काळ्या मनुकांच्या पाण्यामध्ये तुमच्या सर्व हॉर्मोनल समस्या दूर करण्याचे सामर्थ्य आहे. काळ्या मनुकांमध्ये सोडिअम, पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट,फायबर, प्रोटिन्स, व्हिटॅमिन ई, डी आणि सी, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, झिंक, अॅंटि ऑक्सिडंट हे पोषक घटक मुबलक असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराचे सर्व कार्य सुरळीत होते. प्रजनन क्षमतेसाठी ही सर्व पोषक घटक गरजेची असतात. ज्यामुळे काळ्या मनुका खाण्यामुळे स्त्रीयांची प्रजनन क्षमता वाढू लागते आणि गर्भधारणेतील समस्या हळू हळू कमी होत जातात.
काळ्या मनुकांचा कसा करावा वापर –
- काळ्या मनुका गर्भधारणेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. यासाठी त्या अशा प्रकारे खाव्या
- रात्री झोपण्यापूर्वी मूठभर काळ्या मनुका पाण्यात भिजत ठेवाव्या
- सकाळी उठल्यावर अनोशीपोटी म्हणजेच उपाशीपोटी काळ्या मनुकांचे पाणी प्यावे
- भिजवलेल्या काळ्या मनुका दिवसभर थोड्या थोड्या वेळाने खाव्या.
- हा उपाय नियमित केल्यामुळे तुमच्या गर्भधारणेमधील अडचणी कमी होण्यास मदत होईल
मात्र कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण गर्भधारणेमध्ये नेमकी काय अडचण आहे हे तुम्हाला तुमचे डॉक्टरच व्यवस्थित सांगू शकतात. काळ्या मनुका शरीरासाठी नक्कीच उपयुक्त आहेत. कारण त्यामुळे तुमच्या इतर शारीरिक समस्यादेखील कमी होतात. यासाठी नियमित काळ्या मनुका खाण्यास काहीच हरकत नाही. फक्त याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यामुळे तुम्हाला जास्त चांगला फायदा होऊ शकतो.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
‘प्रेग्नंट होण्यासाठी रोज सेक्स करावा’ यासारखे काही गैरसमज आणि त्यामागील तथ्य