कोणत्याही कार्यक्रमाला जाताना पारंपरिक कपड्यांवर नक्की कोणते फुटवेअर्स घालायचे असा प्रश्न पडतो. विशेषतः पारंपरिक पंजाबी ड्रेस, कुरते अथवा पलाझो असे कपडे असतील तर बरेचदा हाय हिल्स घातल्या जातात. पण हाय हिल्स सर्वांना सुटेबल होतातच असं नाही. हाय हिल्समध्ये सर्वांना दिवसभर वावरता येतच असं नाही. त्यामुळे हल्ली सर्वात जास्त सोपा उपाय म्हणजे मोजडी. मोजडी घालायलादेखील सोपे आहे आणि कार्यक्रमांमध्ये अधिक आकर्षकही दिसतात. हाय हिल्स, लोफर्स जितक्या ट्रेंड्समध्ये आहेत तितक्याच हल्ली मोजडीदेखील हल्ली ट्रेंडिंगमध्ये आहेत. पण कधी कधी कोणत्या प्रकारच्या मोजडीची स्टाईल करावी हे कळत नाही. तुम्हाला नवाबी लुक हवा असेल अथवा तुम्हाला फुटवेअर्समध्ये काही वेगळे ट्राय करायचे असेल आणि चांगला लुक हवा असेल तर तुम्ही नक्की मोजडीची खरेदी करायला हवी. मोजडीची स्टाईल आरामदायक होण्यासह अत्यंत स्टायलिशदेखील आहे. कोणत्या आहेत मोजडी ज्यांची तुम्हाला स्टाईल करता येईल ते जाणून घेऊया.
राजस्थानी पार्टी वेअर मोजडी
राजस्थानी पार्टी वेअर मोजडी (Rajasthani Wear Mojari) ही तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरू शकता. अत्यंत सुंदर आणि क्लासिक एम्ब्रॉयडरी असणारी ही राजस्थानी पार्टी वेअर मोजडी अत्यंत सुंदर दिसते. एथनिक ड्रेसवर ही मोजडी अत्यंत सुंदर दिसते आणि तुम्ही ही मोजडी साडी अथवा कोणत्याही ड्रेस वर घालू शकता. यामध्ये गडद रंगापासून ते अगदी तुमच्या आवडीच्या फिकट रंगदेखील यामध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही कुरता आणि जीन्स घालणार असाल तर त्याखाली तुम्हाला ही मोजडी अत्यंत सुंदर दिसते.
लेदर मोजडी
लेदर मोजडी हादेखील एक उत्तम पर्याय आहे. लेदर मोजडी (Leather Mojari) अनेक महिलांमध्ये लोकप्रिय आहे. पार्टीसह तुम्ही कॅज्युअलीदेखील ही मोजडी घालू शकता. पंजाबी सूट, जीन्स आणि कुरता यासह तुम्ही लेदर मोजडीची स्टाईल करू शकता. लेदर मोजडी ही दिसायला अत्यंत रॉयल दिसते आणि तुम्हालाही नवाबी आणि रॉयल लुक मिळवून देते. लेदरची मोजडी ही अधिकतर ब्राऊन रंगामध्ये दिसून येते. त्यामुळे याचा लुक अधिक एलिगंट दिसून येतो. तुम्ही ऑफिस अथवा कोणत्याही ठिकाणी कार्यक्रमात लेदर मोजडीचा वापर करू शकता.
एथनिक मल्टिकलर्ड मोजडी
वेलवेट आणि कॉटन या दोन्हीमध्ये एथनिक मल्टिकलर्ड मोजडी (Ethnic Multi Coloured Mojari) तुम्हाला बाजारात मिळते. यामध्ये अनेकविध रंग तुम्हाला दिसून येतात. तुम्ही जर गडद रंगाचे कपडे घालणार असाल आणि तुम्हाला अगदी नवाबी अथवा रॉयल लुक हवा असेल तर तुम्ही एथनिक मल्टिकलर्डल मोजडीचा वापर करून घ्या. कोणत्याही एथनिक ड्रेसवर (Ethnic Dress) तुम्ही याचा वापर करू शकता. हे दिसायला अत्यंत सुंदर दिसते. तसंच तुमचे पायही यामध्ये अधिक उठावदार दिसून येतात. या मोजडीची सर्वात चांगली बाब ही आहे की, कोणत्याही रंगाच्या ड्रेससह ही वापरता येते. मोजडीची ही डिझाईन तुम्हाला देसी लुक मिळवून देते.
राजस्थानी सिंथेटिक मोजडी
कोणत्याही पारंपरिक आणि सणासाठी तुम्ही या राजस्थानी सिंथेटिक मोजडीचा (Rajasthani Syntheic Mojari) वापर करून घेऊ शकता. ऑनलाईन अथवा बाजारात कुठेही ही मोजडी तुम्हाला उपलब्ध आहे. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खिशाला परवडेबल अशी ही मोजडी आहे. लेहंगा असो वा साडी असो अथवा कोणत्याही प्रकारचा ड्रेस असो त्यासह तुम्ही ही मोजडी घालू शकता. ही मोजडी आकर्षक असण्यासह अत्यंत टिकाऊदेखील आहे.
जयपुरी वर्क मोजडी
तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला उत्तम लुक हवा असेल तर तुम्ही जयपुरी वर्क मोजडीची (Jaipuri work mojari) स्टाईल करावी. जयपुरी वर्क मोजडी यासाठी उत्तम पर्याय आहे. यावर करण्यात आलेली कलाकुसर ही अत्यंत सुंदर आणि आकर्षक असते. तसंच यावरील एम्ब्रॉयडरी ही तुम्हाला अधिक आकर्षित करते. कोणत्याही कपड्यांवर ही जयपुरी वर्क असणारी मोजडी अत्यंत सुंदर दिसते. ही मोजडी घालायला अत्यंत आरामदायी आहे. त्यामुळे अनेक महिलांना ही अधिक प्रमाणात आवडते.
तुम्हाला कोणत्या स्वरूपाची मोजडीची स्टाईल अधिक भावते हे तुम्ही निवडा आणि तुमच्या कार्यक्रम आणि कपड्यांनुसार कोणती मोजडी घालायची हे ठरवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक