आपल्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी खास गुण असतात अथवा दोषही असतात जे आपल्याला एकमेकांपासून वेगळं ठरवतात. तसंच हेच गुण अथवा दोष आपल्याला जीवनामध्ये यश अथवा अपयश येण्यास कारणीभूत ठरत असतात. आपल्याकडे जशा चांगल्या गोष्टी असतात तशाच काही वाईट सवयीदेखील असतात हे प्रत्येकालाच माहीत आहे. काही जण त्या स्वीकारतात तर काही जण त्या स्वीकारत नाहीत. पण तरीही अशा सवयी आपल्या आयुष्यात कितीही प्रयत्न करून सुटत नाहीत आणि मग कामातही कितीही प्रयत्न केले तरीही आपण या सवयींमुळे मागे राहतो. या सवयी वेळीच आपण सुधारल्या नाहीत तर आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो.
राशीनुसार जाणून घ्या आपल्या वाईट सवयी आणि स्वभावाबद्दल – Know your Bad Habits According to Your Zodiac in Marathi
Shutterstock
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची रास असतेच आणि प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वभाव असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक राशीची काही कारणे असतात ज्यामुळे त्यांना यश मिळवण्यात बाधा येते. आपण आपल्याकडून कितीही प्रयत्न केला तरीही आपल्याला एखाद्या कामात यश मिळतच नाही. पण आपल्या सवयी आणि स्वभाव हा आपल्या प्रयत्नांवर बऱ्याचदा मात करतो. त्यामुळे आपण इतरांपेक्षा मागे राहातो आणि आपल्या हातून बऱ्याचशा संधी निघून जातात. जाणून घेऊया राशीनुसार अशी कोणती कारणे आहेत जी आपल्या यशामध्ये अडचण आणत आहेत.
मेष (21 मार्च – 19 एप्रिल)
या राशीच्या व्यक्ती अतिशय एनर्जेटिक आणि उत्साही असतात. यांची ऊर्जाच यांची ताकद आहे. तर दुसऱ्या बाजूला या व्यक्ती रागीट आणि दुसऱ्यांना जाऊन भिडणारे अशा स्वभावाचे असतात. त्यामुळे नेहमी दुसऱ्यांबरोबर या व्यक्तींची भांडणं होतात आणि त्याचवेळी या संधीचा फायदा घेऊन दुसऱ्या व्यक्तींना यश मिळतं आणि तुम्ही मागे राहता.
वृषभ (20 एप्रिल – 20 मे)
या व्यक्ती विचार न करताच कोणत्याही कामात स्वतःला झोकून देतात. तर दुसऱ्या बाजूला या व्यक्तींचा स्वभाव मनमानी असल्यामुळे त्यांना स्वतःलाच त्रास होतो. या व्यक्ती लगेच नाराज होतात आणि यामुळेच त्यांना त्यांच्या कामात यश मिळणं कठीण होतं. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता या व्यक्ती मनमानी करत जगत असतात. त्याचाच परिणाम त्यांच्या कामावरही होतो.
मिथुन (21 मे- 21 जून)
GIPHY
तसं तर या राशीच्या व्यक्ती कोणतीही समस्या पटकन एका चुटकीसरशी सोडवण्याची हिंमत ठेवतात. पण या व्यक्ती बोलण्यात जितक्या तरबेज असतात. तितकाच वेळ त्यांना काम समजून घेण्यात आणि ते करण्यात लागतो. जी त्यांच्या स्वभावातील कमतरता आहे. यांचा प्रत्येक कामातील उतावीळपणा यांना यशापासून दूर घेऊन जातो.
राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती
कर्क (22 जून – 22 जुलै)
GIPHY
कर्क राशीच्या व्यक्तींची ताकद त्यांचे प्रेम आणि दुसऱ्यांबद्दल वाटणारी सहानुभूती आहे. यामुळे या व्यक्ती नेहमीच स्वतःचा वेगळेपणा दाखवतात. पण यांची नकारात्मक विचारसरणी यांचे काम बिघडवण्यास कारणीभूत ठरते. या व्यक्ती आपल्या डोक्याने कमी आणि मनाने जास्त विचार करतात आणि भावनिक गुंतवणुकीमुळे या प्रत्येकवेळी मागे राहतात.
सिंह (23 जुलै – 22 ऑगस्ट)
GIPHY
या राशीच्या व्यक्तींकडे कमालीची लीडरशीप क्वालिटी आहे. यांच्याकडे आत्मविश्वासाची अजिबातच कमतरता नाही. त्यामुळे खासगी आयुष्य असो वा व्यावसायिक असो या व्यक्ती सगळीकडेच स्टार असतात. पण पैसा आणि अहंकार या दोन्ही गोष्टी या व्यक्तींसाठी घातक ठरतात. विशेषतः पैसा. पैशाचा मोह यांना बऱ्याचदा अपयशाकडे खेचून जाण्यास भाग पाडतो.
कन्या (23 ऑगस्ट – 22 सप्टेंबर)
कन्या राशीच्या व्यक्तींचे निरीक्षण हे अफलातून असते. पण स्वतःबद्दल कोणतीची चुकीची गोष्ट या व्यक्ती खपवून घेऊ शकत नाहीत. असं झाल्यास या व्यक्ती स्वतःवरील नियंत्रणदेखील घालवून बसतात. या व्यक्तींचा हाच आवेश त्यांना यशापासून दूर करू शकतो.
आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)
तूळ (23 सप्टेंबर – 22 ऑक्टोबर)
GIPHY
या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा अतिशय तोलूनमापून असा असतो. प्रत्येक गोष्ट या व्यक्तींना अतिशय बॅलेन्स्ड लागते. कोणत्याही पक्षाची बाजू न घेणाऱ्या व्यक्ती आळशीपणामुळे मात्र मात खातात. यांचा आळशीपणाच यांच्या हातात आलेल्या संधी गमावण्यास कारणीभूत ठरतात.
वृश्चिक (23 ऑक्टोबर – 21 नोव्हेंबर)
GIPHY
या राशीच्या व्यक्ती अतिशय सिक्रेटिव्ह असतात. सतत नगारे वाजवून काम करण्याची या व्यक्तींची पद्धत नाही. पण या व्यक्तींचा रागावर अजिबातच ताबा नाही. तसंच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे बऱ्याचदा कामं बिघडतात. या व्यक्ती कोणत्याही चुकीच्या गोष्टी खपवून घेऊ शकत नाहीत. तसंच समोर कोण आहे याचा विचार न करता या व्यक्ती स्पष्टपणे बाजू मांडतात आणि हेच यांच्यासाठी नेहमी घातक ठरते. त्यामुळे मिळणारं यशही त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे बऱ्याचदा निसटून जातं.
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
धनु (22 नोव्हेंबर – 21 डिसेंबर)
या राशीच्या व्यक्ती आपल्या क्रिएटिव्हिटीने कोणतेही कंटाळवाणे काम अतिशय मजेशीर बनवू शकतात. पण प्रत्येक गोष्टीवर डाव खेळायची आणि पैज लावयाची या लोकांना वाईट सवय असते. ज्यामुळे या व्यक्ती पैशाच्या दृष्टीने लवकरच कफ्फलक होतात आणि त्यामुळेच यशही त्यांच्यापासून दूर राहाते.
मकर (22 डिसेंबर – 19 जानेवारी)
GIPHY
तसं तर या राशीच्या व्यक्तींची विचारसरणी ही खूपच सकारात्मक असते. पण यांच्या मनात सतत ईर्षा असल्याने लोकांबद्दल या व्यक्ती बऱ्याचदा चुकीचा विचार करतात. दुसऱ्यांच्या आनंदात या व्यक्ती कधीही आनंदी होत नाहीत. समोर तसं दाखवलं तरीही मनातून मात्र या व्यक्ती अतिशय दुःखी असतात. त्याचाच त्यांना तोटा होतो.
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
कुंभ (20 जानेवारी – 18 फेब्रुवारी)
या राशीच्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला व्यवस्थित जमवून घेतात. कोणताही बदल या व्यक्तींना बेचैन करत नाही. पण कोणतीही गोष्ट वाढवून आणि चढवून सांगणाऱ्या यांच्या सवयीमुळे बऱ्याचदा यांना दुसऱ्यांच्या नजरेत कमी लेखण्यास पात्र ठरते. तसंच यांच्या प्रगतीमध्ये बाधा आणते.
मीन (19 फेब्रुवारी – 20 मार्च)
मीन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आदर्शवादी विचारांमुळे खूपच मानले जाते. व्यक्तिगत आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यांपर्यंत या व्यक्ती आपल्या विचारांमुळेच प्रगती करतात. पण या व्यक्तींकडे आत्मविश्वास फारच कमी असतो. कोणत्याही गोष्टीची सुरूवात करायला घाबरत असल्यामुळे कधी कधी यश यांच्यापासून दूर राहाते.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा