लग्न होणे हे आपल्या हातात असले तरी देखील यातील बऱ्याच गोष्टी या योग येण्यावर अवलंबून असतात. काहींचा लग्नाचा योग हा खूप लवकर येतो त्यामुळे अवघ्या 23-24 वयातच त्यांचे लग्न होऊन जाते. तर काहींच्या लग्नाचा योग हा म्हणावा तितका लवकर येत नाही. अशांची लग्न होण्यासाठी कधीकधी चाळीशी देखील येते. घोडनवरा- घोडनवरी असे जरी म्हटले तरी देखील काही गोष्टींकडे उशीर लग्न करणाऱ्यांनी दुर्लक्ष करायला हवे. काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही लग्न उशीर करत असाल तर लक्षात घ्यायला हव्यात. त्यामुळे तुमच्या पती-पत्नीच्या नात्यात आणि नातेवाईकांमध्ये मुळीच दुरावा येत नाही. चला तर जाणून घेऊया या महत्वाच्या गोष्टी
Marathi Prem Kavita | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता
नात्यामध्ये अंतरही महत्वाचे, जाणून घ्या कारण
एकमेकांना समजून घ्या
साधारण एक वय उलटून गेले की, खूप जणांचा स्वभाव हा हट्टी होऊन जातो. कारण इतकी वर्ष आपल्याप्रमाणे वागल्यामुळे दुसऱ्या कोणासोबत अजिबात अॅडस्ट करायची सवय नसते.अशावेळी जोडीदार किंवा इतर नातेवाईक काही सांगत असेल तर खूप जणांना पटकन थोडे उलट उत्तर देण्याची सवय असते. एखादी गोष्ट पटली नाही की त्या पटकन रिअॅक्ट करतात. अशावेळी तुम्ही एकमेकांना समजून घेणे उत्तम आहे. लग्न उशीर करत असल्यामुळे आधीच एकमेकांना देण्यासाठी तुमच्याकडे फारसा वेळ हातात नसतो. अशावेळी शक्य असेल तेव्हा जोडीदाराचा स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ हा जोडीदाराला जाणून घेण्यात घालवा. म्हणजे तुमच्या स्वभावातील तफावत तुम्हाला नक्की कळेल.
नात्यात एकमेकांच्या गरजा आपण विसरुन जातो तेव्हा…
संसाराला प्राधान्य द्या
खूप मुलांचे किंवा मुलींचे लग्नानंतर खूप काही प्लॅन्स असतात. फॅमिली प्लॅनिंग त्यांनी आधीच मनाशी केलेली असते. पण अशी फॅमिली प्लॅनिंग करताना आपण संसार आणि वय विसरुन जातो. अशावेळी तुम्ही आधीच जर मुलांचा विचार करत असाल तर योग्य वेळी निर्णय घ्या. कारण त्यामुळे तुम्हाला नंतर अन्य काही आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जोडीदारासोबत कुटुंबासोबत या गोष्टी आधीच चर्चा करुन घ्या. संसार हा केवळ लग्न करणं नाही तर काही जबाबदाऱ्या स्विकारणं देखील आहे त्यामुळे संसारातील जबाबदाऱ्या वेळीच घ्यायला शिका. वय वाढतं तसं जबाबदाऱ्या घ्यावा अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यामुळे ही गोष्ट देखील फार महत्वाची आहे.
प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स
निर्णय घ्या पटापट
काही निर्णय हे उशीरा लग्न करत असताना पटपट घ्यावे लागतात. त्यामुळे आपल्यातील निर्णयक्षमता वाढवा. कारण त्याची सतत गरज भासण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा एकट्याचा विचार करु नका. थोडे सर्वसमावेशक होऊन तुम्ही काही गोष्टी समजूतदारपणाने करायला विसरु नका. असे कराल तर तुमच्यासोबत कुटुंबातील अधिक माणसं जोडली जातील. कारण अनेकदा या गोष्टींचा आपल्याल नेहमीच फायदा होतो. इतर आयुष्यातही ही गोष्ट आपल्यासाठी फारच महत्वाची असते.
आता उशीर लग्न करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला तुम्ही मुळीच विसरु नका. त्यामुळे तुमचे नातेही चांगले राहील.