ADVERTISEMENT
home / फॅशन
नवरीसाठी खास हेअर स्टाईल्स, फॉलो करा नवा ट्रेंड

नवरीसाठी खास हेअर स्टाईल्स, फॉलो करा नवा ट्रेंड

 

 

नवरी म्हटली की तिच्या कपड्यांपासून, दागिने आणि केसांच्या स्टाईल्सपर्यंत सर्व काही खास असावे लागते. आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावे असं कोणाला वाटणार नाही. लग्नामध्ये सर्वात जास्त लक्ष हे नवरीकडे असावे असेच सर्वांना वाटते. कपडे आणि मेकअप तर केला जातोच. पण हेअर स्टाईलही तितकीच महत्वाची आहे. हल्ली हेअर स्टाईल्स अत्यंत साध्या पण तितक्याच आकर्षक असतात. तुम्ही तुमच्या लग्नासाठी कोणती हेअर स्टाईल निवडली नसेल अथवा अगदी घरच्या कार्यक्रमांनाही तुम्हाला साखरपुडा, लग्नासाठी एखादी हेअरस्टाईल करायची असेल तर सध्याचे काही हेअर स्टाईल ट्रेंड्स (hairstyle trends) आम्ही तुम्हाला या लेखातून सुचवत आहोत. आपल्या लग्नात जर तुम्हाला आपल्या हेअर स्टाईल्सने सर्वांना आकर्षित करायचे असेल तर तुम्ही आताचे हे नवे ट्रेंड्स नक्की फॉलो करा. जाणून घ्या नवरीसाठी खास हेअर स्टाईल्स.

फुलांच्या गजऱ्यासह आंबाडा

 

ही खरं तर जुनी फॅशन आहे असं आपण म्हणतो पण ही कायमस्वरूपी आकर्षित करणारी फॅशन आहे. नवरीचा लुक पारंपरिक हवा असेल तर तुम्ही केसांचा अंबाडा घालून त्यावर फुलांचे गजरे माळा. व्यवस्थित माळलेले आणि अंबाड्याभोवती गुंडाळलेले गजरे तुमचा लुक अधिक भारदस्त आणि पारंपरिक करतात. परफेक्ट नवरीच्या लुकसाठी आणि नऊवारी साडीवर मराठमोळ्या लुकसाठी ही हेअरस्टाईल परफेक्ट आहे.

घरच्या घरी करा गजरा तयार, केसांची करा स्टाईल

ADVERTISEMENT

हेअर अॅक्सेसरीजसह थोडा हलकासा आंबाडा

 

प्रत्येकवेळी घट्ट आंबाडा आणि गजरा हवा असं नाही. बाजारामध्ये अनेक हेअर अॅक्सेसरीज (hair accessories) मिळतात. तुमच्या लेहंगा अथवा साडीप्रमाणे तुम्ही रंगाची निवड करून केसांना थोडासा वेगळा लुक देण्यासाठी सैलसर आंबाडा बांधून त्यावर या हेअरपिनचा उपयोग करावा. या हेअर अॅक्सेसरीज फुलांच्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या असतात. त्यामुळे साडी आणि लेहंग्यावर शोभून दिसतात.

नववधूकरिता गमतीदार उखाणे

आर्टिफिशियल फुलांचा करा वापर

 

कधी कधी नैसर्गिक फुलं दिवसभर टिकत नाहीत. मग दिवसभर तुम्हाला जर केसांमध्ये ताज्यातवान्या फुलांचा आभास हवा असेल तर तुम्ही आर्टिफिशियल फुलांचा वापर करा. नवरीचे केस मोठे असतील तर अशी आर्टिफिशियल गुलाबाची आणि इतर फुलंही खूपच सुंदर दिसतात. मोठ्या केसांचा आंबाडा बांधून तुम्ही त्यावर अप्रतिम फुलांनी सजवा आणि दिसा अधिक सुंदर

कर्ली आयर्निंगशिवाय बनवा सोप्या पद्धतीने वेव्ही हेअरस्टाईल

ADVERTISEMENT

 

फुलांनी सजवलेले ओपन कर्ल्स

 

तुम्ही केसांना जर सुंदर कलर केला असेल आणि रिसेप्शनसाठी लेहंगा घालणार असाल तर तुम्ही तुमच्या केसांना खालून कर्ल करा आणि त्यावर तुमच्या ड्रेसच्या रंगाप्रमाणे फुलांचा रंग निवडा आणि केसांची हेअरस्टाईल करा. दोन्ही बाजूंनी लहान वेण्या घालून एकत्र मागे घ्या आणि खाली केस कर्ल करून त्यामध्ये फुलांची आरास करा. दिसायला हे खूपच आकर्षक आणि सुंदर दिसते. नवरीचा लुक अगदी वेगळा आणि उठून दिसेल.

अशी करा लहान केसांची हेअर स्टाईल (Hairstyles For Short Hair)

गुलाबाच्या फुलांसह खजूर वेणी

नवरीचे केस लांबसडक असतील तर तुम्ही तिच्यावर ही हेअर स्टाईल नक्कीच करू शकता. खजूरवेणी घालून तिच्या ड्रेसच्या अथवा साडीच्या रंगाची गुलाबाची फुले खजूर वेणीच्या प्रत्येक भागात अडकवायची. हे दिसायला अतिशय सुंदर दिसते. एका पानासह गुलाबाचे फूल त्यात अडकवून सुंदर हेअरस्टाईल करू शकता. दिसायलाही अत्यंत आकर्षक दिसते.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Mar 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT