प्रत्येक मुलीला स्वतःच्या लग्नामध्ये सर्वात सुंदर दिसायचं असतं आणि का नाही? तो तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस तर असतोच. पण ती संपूर्ण कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आणि मुख्य असते. त्यासाठी ती कितीतरी महिने तयारी करत असते. अनेक मेकअपमॅन तिने ट्राय करून झालेले असतात. आपल्या मैत्रिणींबरोबर तिने अनेक ब्युटी पार्लरदेखील यासाठी पालथी घातलेली असतात. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे केवळ मेकअप आर्टिस्टवर सर्वस्वी तुम्ही अवलंबून राहणं योग्य नाही. तुम्हाला स्वतःलादेखील ब्रायडल मेकअप आणि सध्याच्या ट्रेंडची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की, आता हे नक्की कसं करता येईल, तासनतास गुगल करावं लागेल की काय? पण त्यासाठी गुगल करत बसण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला लेटेस्ट अर्थात ट्रेडिंग आय मेकअपबद्दल सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही साखरपुडा अथवा तुमच्या लग्नातही आपल्या डोळ्यांना अप्रतिम लुक देऊ शकता.
लग्नाच्या लाल जोड्यावर ब्राऊन ग्लिटरी डोळे हे कॉम्बिनेशन फारच कमी लोकांना सुचतं. पण तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता की, नववधूच्या डोळ्यावर ग्लिटरी आयशॅडोचा वापर करण्यात आला आहे. पण हे आयशॅडो दिसायला अतिशय सुंदर दिसतात.
लग्न असो वा साखरपुडा कोणत्याही कार्यक्रमामध्ये ग्लिटरी आईज हा सध्याचा ट्रेंड आहे. तुम्हाला जर साखरपुड्याला गुलाबी अथवा फिरोजी असा लाल रंगाचे कपडे घालायचे असतील तर तुम्ही या नववधूप्रमाणे हिरवा लेहंगा नक्की ट्राय करू शकता. या लेहंग्यासाठी तुम्ही आयमेकअप म्हणून हिरव्या ग्लिटरी आयशॅडोचा वापर करा. तुमच्यावर हे नक्कीच खुलून दिसेल.
या फ्लोरल लेहंग्यावर नववधूला सोन्याच्या रंगासारखे डोळे अतिशय सुंदर दिसतात. तुम्हाला जर सोन्याचे दागिने घालण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या डोळ्यांवरदेखील गोल्डन गिल्टरी आयशॅडो लावण्याची कल्पना उत्तम आहे. तुमच्या मेकअप आर्टिस्टलादेखील तुम्ही याबद्दल सांगा आणि त्याप्रमाणे तिला वा त्याला मेकअप करायला सांगा.
गुलाबी हा साधारणतः मुलींचा सर्वात आवडता रंग मानला जातो. तुम्हालादेखील गुलाबी रंग आवडत असेल तर साखरपुड्याला गुलाबी रंगाचा लेहंगा घालण्याचा पर्याय खूपच चांगला आहे. त्यावर तुम्ही गुलाबी रंगाची ग्लिटरी आयशॅडो नक्की लावा. त्यामुळे तुम्ही अधिक सुंदर तर दिसालच पण संपूर्ण कार्यक्रमाची शोभा फक्त तुमच्यामुळे वाढली असेल.
लग्नासारख्या कार्यक्रमांसाठी ब्रॉन्झ ग्लिटरी आयशॅडोबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला जर याबद्दल काहीच माहीत नसेल तर तुम्ही नक्की तुमच्या मेकअप आर्टिस्टकडून याबद्दल जाणून घ्या आणि तुमच्या लग्नामध्ये तुमच्या डोळ्यांसाठी ब्रॉन्झ ग्लिटरी लुक नक्की ट्राय करा.
तुम्हाला जर पारंपरिक लुकमध्ये राहायला आवडत असेल तर लाल लेहंग्यावर लाल ग्लिटरी आयशॅडो लावा.
अर्थात फक्त लेहंग्यावरच असे ग्लिटरी लुक ट्राय करता येतात असं नाही, तर तुम्ही तुमच्या साखरपुडा आणि लग्नाच्या साड्यांवरही असे ग्लिटरी लुक नक्की ट्राय करू शकता. सध्याचा हा नवा ट्रेंड तुम्हाला अधिक चांगला आणि वेगळा लुक देऊ शकतो आणि तुम्हीदेखील नेहमीपेक्षा वेगळी नवरी म्हणून तुमच्या लग्नामध्ये मिरवू शकता. फक्त त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. तुमच्या चेहऱ्याला साजेसे रंग तुमच्या कपड्यांचे आणि ग्लिटरी आयशॅडोचे असायला हवेत. शिवाय तुम्ही नक्की काय घालणार आहात याची संपूर्ण कल्पनाही तुमच्या मेकअप आर्टिस्टना हवी. साखरपुडा अथवा लग्नाच्या आधी एकदा तुम्ही ठरवलेल्या मेकअप आर्टिस्टकडून तुमचा मेकअप नक्की ट्राय करून घ्या आणि मग लग्नामध्ये अप्रतिम दिसायला तयार व्हा.
फोटो सौजन्य – Instagram
हेदेखील वाचा
तुमच्या कलेक्शनमध्ये असल्याच पाहिजेत या ‘5’ लिपस्टिक शेड्स