ADVERTISEMENT
home / Eye Make Up
आयलायनर लावण्याच्या या पद्धती खुलवतील सौंदर्य

आयलायनर लावण्याच्या या पद्धती खुलवतील सौंदर्य

आयलायनर लावणं एक कला आहे. पण ती कला आत्मसात करण्यासाठी तसा थोडा वेळ आणि कलेची आवड हवी. विंग आयलायनर लावल्यानंतर अनेकांना तसेच आयलायनर लावण्याची खूप इच्छा होते.पण वेळेअभावी किंवा मुळातच हाताला वळण नसल्यामुळे विंग आयलायनर लावणे फारच कठीण जाते. इतके सगळे कष्ट करुनही जर तुम्हाला अशा पद्धतीचे आयलायनर लावता येत नसतील तर तुम्ही काही अन्य पद्धतीनेही आयलायनर लावू शकता. आयलायनर लावण्याच्या या पद्धतीही फार सुंदर असून तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य त्यामुळे अधिकच खुलून दिसण्यास मदत होईल. 

आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक Eyeliner Styles in Marathi

फिशटेल लायनर

फिशटेल लायनर

Instagram

ADVERTISEMENT

काजळ आणि आयलायनर असा दोन्ही लुक कव्हर करु शकेल असा हा आयलायनरचा प्रकार आहे.  माशांच्या शेपटीप्रमाणे याचा आकार दिसत असल्यामुळे त्याला फिशटेल लायनर लुक म्हणतात.

  • सगळ्यात आधी आयलायनरची एक बारीक रेष डोळ्यांच्यावर काढून घ्या. डोळ्यांच्या कोपऱ्यावर म्हणजे टिपकडील भागाकडे आयलायनर थोडे जाड करुन ते विंग्ड लायनर प्रमाणे थोडेसे बाहेर काढा 
  • डोळ्याच्या खालच्या बाजूला लायनर लावताना डोळ्याच्या कोपऱ्यापासून खाली ओढत वरच्या आयालायनरच्या रेषेला समांतर अशी रेषा तुम्हाला खाली ओढायची आहे. फिशटेल आयलायनर लुक रेडी


आयलायनर लुकसाठी जेल पेन्सिल लायनरचा उपयोग फायदेशीर

आयलायनर आणि मस्कारा काढण्याच्या या आहेत सोप्या ट्रिक्

नॅचरल आयलायनर लुक

नॅचरल आयलायनर लुक

ADVERTISEMENT

Instagram

 मेकअपमध्ये नॅचरल असं काही नसतं. पण तरीही तुमच्या डोळ्यांना नॅचरल लुक देणारा हा आयलायनरचा प्रकार दिसायला फारच सुंदर आहे. थोडी मेहनत घेतली तर तो तसा करायलाही सोपा आहे. 

  • पेन्सिल लायनर घेऊन आयलायनरप्रमाणे तुम्ही लायनरची रेष ओढून घ्या. 
  • या लायनरचा लुक येण्यासाठी तुम्ही थोडे जाड लायनर लावले तर फारच उत्तम कारण त्याचा लुक चांगला येतो. 
  • आता नॅचरल लुक दिसण्यासाठी तुम्ही याला थोडंसं हाताने स्मज करा. कारण तुमच्या डोळ्यांच्या वरचा भाग हलकासा काळा दिसणे म्हणजे तुमचे डोळे उठून दिसण्याचे काम हे आयलायरचा प्रकार करते. 


पेन्सिल आयलायनरचा करा वापर 

डोळ्यांचे सौंदर्य खुलवणारे आयलायनर शोधत असाल (Best Eyeliners In India In Marathi)

ADVERTISEMENT

रिव्हर्स विंग्ड आयलायनर

रिव्हर्स विंग्ड आयलायनर

Instagram

रिव्हर्स विंग्ड आयलायनर हा प्रकारही दिसायला खूपच छान दिसतो. विंग्ड आयलायनरच्या तुलनेत तसा हा प्रकार करायला थोडासा सोपा आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

  • तुमच्या आवडीचे कोणतेही लायनर घेऊन डोळ्यांच्या खालच्या बाजूला ते लावा. 
  • डोळ्यांच्या वरच्या बाजूपेक्षा खालच्या बाजूला विंग्ड तयार करणे थोडे सोपे असते. 
  • तुमच्या डोळ्यांच्या आकारानुसार तुम्ही त्याची जाडी ठरवा. यामध्ये तुम्ही आयलायनरचे वेगवेगळे रंगही ट्राय करु शकता. 


आता आयलायनरचे हे प्रकार तुम्ही नक्की ट्राय करुन पाहा. तुम्हाला हे लुक नक्की आवडतील. 

02 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT