केस गळणं रोखण्यासाठी आतापर्यंत तुम्ही अनेक महागडे उपचार केले असतील. केस गळण्याची कारणं अनेक असू शकतात. त्यामुळे आधी तुमचे केस का गळत आहेत हे ओळखा आणि मगच त्यावर योग्य ते उपचार करा. जर तुमचे केस वातावरणातील बदल अथवा केसांच्या काही समस्यांमुळे गळत असतील तर त्यासाठी एक साधा आणि सोपा घरगुती उपाय करा. कारण हा उपाय तुमच्या केसांसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे परिणाम करेल. शिवाय हा उपाय घरगुती आणि नैसर्गिक असल्यामुळे त्यामुळे तुमच्या आरोग्यावर आणि सौंदर्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. यासाठी जाणून घ्या काय आहे हा उपाय
केसांसाठी तयार करा हे घरगुती हेअर टॉनिक
केसांचे गळणे रोखण्यासाठी आपण जे टॉनिक तयार करणार आहोत त्यासाठी आपण मेथीच्या बिया आणि तिळाचे तेल वापरणार आहोत. कारण तिळाच्या तेल आणि मेथी केसांसाठी फायदेशीर असते. यामुळे तुमचे केस गळणे फक्त थांबतच नाही तर तुमचे केस जोमाने वाढू लागतात. कारण मेथीमध्ये आणि तिळ्याच्या तेलामध्ये तुमच्या केसांची वाढ करणारे अनेक चांगले घटक असतात.
हेअर टॉनिकसाठी लागणारं साहित्य –
- मेथीचे दाणे
- तिळाचे तेल
हेअर टॉनिक बनवण्याची पद्धत –
- एका भांड्यात तिळाचे तेल घ्या आणि ते गॅसवर गरम करा
- तुम्हाला जितकं तेल हवं तितकं तेल घेऊन तुम्ही ते साठवून ठेवू शकता. त्यामुळे प्रमाण तुमच्या सोयीनुसार ठरवा.
- तेलाच्या अंदाजानुसार मेथीच्या बिया त्या गरम तेलात टाका
- मेथीच्या बिया तेलात चांगल्या गरम होऊ द्या
- तेल गरम झाल्यावर आणि बियांचा अर्क त्यात गेल्यामुळे तेलाचा रंग बदलून तो थोडे गडद रंगाचे दिसेल.
- गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या
- तेल थंड झाल्यावर गाळणीने गाळून घ्या
- गाळलेले तेल तुम्ही एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवू शकता
- तुमच्या केसांसाठी एक छान हेअर टॉनिक तयार झाले आहे
केसांसाठी कसा करावा या हेअर टॉनिकचा वापर-
- मेथीचे हेअर टॉनिक एका छोट्या वाटीत घ्या
- कापसाच्या मदतीने ते केसांच्या मुळांना लावा
- केसांच्या मुळांना हेअर टॉनिक लावल्यावर हलक्या हाताने त्यावर मालिश करा
- केस गरम पाण्यात बूडवुन घट्ट पिळलेल्या टॉवेलने गुंडाळून ठेवा
- अर्धा तासाने केस शॅंम्पू करा
- आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा नियमित हे हेअर टॉनिक केसांना लावले तर महिन्याभरात तुमची केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते
मेथीच्या हेअर टॉनिकचा केसांना काय फायदा होतो –
मेथीपासून तयार केलेलं हे हेअर टॉनिक तुमच्या केसांवर खूपच परिणामकारक ठरतं.
- मेथी आणि तिळाच्या तेलामुळे केसांची मुळं मजबूत होतात
- या हेअर टॉनिकमुळे केस गळणे थांबून केसांची वाढ होऊ लागते
- मेथीच्या हेअर टॉनिकमुळे केसांना योग्य पोषण मिळते ज्यामुळे तुमच्या स्काल्प आणि केसांच्या समस्याा कमी होतात
- नियमित मेथीचे हेअर टॉनिक वापरल्यामुळे केस लांब आणि चमकदार होतात
- केसांना फाटे फुटणे, कोंडा होणे अशा अनेक समस्या हा हेअर टॉनिकमुळे कमी होऊ शकतात
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
केसांसाठी लाकडाचा कंगवा वापरण्याचे फायदे