ADVERTISEMENT
home / आरोग्य
जाणून घ्या मलासन करण्याचे फायदे आणि योग्य पद्धत

जाणून घ्या मलासन करण्याचे फायदे आणि योग्य पद्धत

योगासनांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक योगासन योग्य पद्धतीने केल्यास त्याचे फायदे शरीर आणि मनावर झालेले दिसून येतात. मलासन हा देखील एक योगासनांमधील उत्तम असा प्रकार आहे. ज्यांना पोटाच्या समस्या आहेत अशा लोकांनी नियमित मलासनाचा सराव केल्यास पोटाच्या अनेक समस्या कमी होतात. मलासन करणं खूपच सोपं आहे मात्र तरिही कोणतंही आसन कसं करावं याची योग्य पद्धत प्रत्येकाला माहीत असायला हवी.

मलासन कोणी आणि कसं करावं 

मलासनव हा स्क्वाटचा एक प्रकार आहे. ज्यामुळे तुमचे नितंब ,सुडौल होतात आणि पोटाच्या समस्या दूर होतात. जर तुम्ही पहिल्यांदाच मलासनाचा सराव करणार असाल तर भिंत अथवा एखाद्या गोष्टीचा पाठीला आधार घ्या. सरावाने आधाराशिवाय तुम्ही मलासन योग्य पद्धतीने करू शकता. 

मलासन करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत

या पद्धतीने मलासन केल्यास तुम्हाला मलासनाचे सर्व फायदे नक्कीच मिळू शकतात.

 • सर्वात आधी योगा मॅटवर सरळ उभे राहा
 • पाय सरळ ठेवत पोट आतमध्ये घ्या
 • खांदे ताणून घ्या आणि दीर्घ श्वास घ्या
 • हात जोडून नमस्कार करा
 • श्वास सोडत गुडघे दुमडून उकिडवे बसा
 • जांघेमध्ये ताण येईल अशा पद्धतीने दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने ताणून घ्या.
 • तुमचे कोपरे पायाच्या गुडघ्यांमध्ये बसवा
 • दीर्घ श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीत या

मलासन करताना कधीच नितंब पायाच्या घोट्यावर टेकवू नका. असं केल्यास तुमचं वजन पायावर येतं आणि योगासनाचा फायदा होत नाही. सरावाने तुम्हाला हे आसन जमेल मात्र त्यासाठी पाठीला आधार मिळेल अशा ठिकाणी आसन करा.

ADVERTISEMENT

मलासनाचे फायदे

मलासन करण्याचे अनेक फायदे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे तुमचे नितंब सुडौल होतात आणि पोटाच्या समस्या दूर होतात.

 • मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते
 • बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या कमी होतात
 • पोटाचा आकार आणि घेर कमी होतो
 • पचन संस्था सुधारल्यामुळे वजन नियंत्रणात राहते
 • पाठीच्या कणातील त्रास कमी होतात
 • पाय आणि मांड्या लवचिक होतात

सूचना – मलासन हा योगासनाचा एक सोपा प्रकार असला तरी तो योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. यासाठी तज्ञ्जांची मदत घ्या आणि मगच मलासनाचा सराव करा. कारण थोडीशी चूक देखील तुमचं शारीरिक नुकसान करू शकते. तोल गेल्यास तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते. यासाठी तज्ञ्जांच्या मदतीने मलासनाचा सराव करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT