नवरी म्हटली की इतर तयारीप्रमाणे महाराष्ट्रीयन लग्नामध्ये खास तयारी करावी लागते ती उखाण्यांची. लग्नाचे उखाणे हे नवरीसाठी नक्कीच वेगळे आणि खास असतात. पण आजकाल उखाणे तयार करण्याची पद्धतच निघून गेली आहे. नवरीचे उखाणे आता आयते सर्च करूनही मिळतात. लग्नात नाव घेणे ही पद्धत पूर्वपरंपरागत चालत आली आहे. मराठी उखाण्यात नाव घेणे ही मजा लग्नात काही औरच असते. त्यातही उखाणे नवरीचे असतील तर सर्वांचे डोळे तिच्याकडे लागलेले असतात. नवरीकरिता आता मजेशीर उखाणेही असतात. लग्नात उखाणे घेण्याची एक स्पर्धाच असते जणू! नवरीचे मराठी उखाणे (navriche ukhane) हे तर लग्नातील वैशिष्ट्य. मराठी लग्नात नाव घेणे (marathi naav ghene) ही परंपरा आजही चालू आहे. नवरीचे उखाणे ऐकण्यासाठी खास सगळे जमलेले असतात. त्याचवेळी मराठी उखाणे घेणारी नवरी (marathi ukhane for bride) अगदी लाजून लाजून अर्धी झालेली असते. त्यावेळी तिला सतवत तिच्याकडून नवऱ्याचे नाव घ्यायला लावणे ही एक मजाच असते. असेच काही वेगवेगळे उखाणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हीही लवकरच नवरी होणार असाल आणि तुम्हाला नववधूकरिता खास उखाणे हवे असतील तर आम्ही नवरीसाठी खास मराठी उखाणे घेऊन आलो आहोत.
नवीन 10 मराठी उखाणे नवरी साठी (Latest Marathi Ukhane For Bride)
नववधूने नक्की कोणते उखाणे घ्यायचे यामध्ये नेहमीच गोंधळ उडतो. कारण सगळ्यांच्या नजरा त्या नवरीवर असतात. आताच्या मुलींना आधुनिक उखाणे घ्यायला आवडतात. त्याच त्याच पारंपरिक उखाण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या तऱ्हेने नाव घेण्यात मजा येते. अशाच नववधूकरिता काही खास नवरीचे उखाणे(navriche ukhane). उखाणे हे खरे तर मराठी नवरीकरिता खास तयार करण्यात येतात. पण तुम्हाला तयार करता येत नसतील आणि लग्नामध्ये खास पद्धतीने नवऱ्याचे नाव उखाण्यात घ्यायचे असेल तर तुम्ही असे नववधूकरिता आधुनिक उखाणे घेऊ शकता.
1. माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने
….राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे
2. सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात
….रावांचे नाव घेते, ….च्या घरात
3. रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा
….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा
4. संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला
…रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला
5. आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा
….रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा
6. संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी
….रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी
7. गोऱ्या गोऱ्या हातावर, रेखाटली मेंदी
….रावांचे नाव घेण्याची, नेहमी मिळो संधी
8. पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये , वाढले लाडू पेढे
…रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे
9. दोन जीवांचे मीलन जणू, शतजन्माच्या गाठी
…रावांचे नाव घेते , तुम्हा सर्वांसाठी!
10. मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर
…रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेर
Best Gruhpravesh Ukhane Marathi
नववधूकरिता 10 लहान उखाणे (Short Marathi Ukhane For Bride)
खरं तर उखाणे लहानच असतात. पण तरीही त्यातल्या त्यात सोपे उखाणे जे लक्षात ठेवता येतील असे नववधूकरिता काही खास उखाणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण बऱ्याचदा मोठेमोठे उखाणे घेणं आताच्या पिढीतील मुलींना जमत नाही. त्यामुळे त्यांना लहान स्वरूपाचे उखाणे घेणं सोपं जातं. नववधूंसाठी लहान लहान उखाणे हे अतिशय सोपे असतात. असेच काही सोपे नवरीचे उखाणे (ukhane in marathi for bride).
1. सासरची छाया, माहरेची माया,
….राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया
2. हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी,
…रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी
3. पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी
…रावांमुळे आली, आयुष्याला गोडी
4. सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
…रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण
5. चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा,
…रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा
6. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं
…रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं
7. चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
…रावांचे नाव घेते देवापुढे
8. शेल्याशेल्याची बांधली गाठ
…रावांचे नाव मला अगदी तोंडपाठ
9. बारीक मणी घरभर पसरले
…रावांसाठी मी माहेर विसरले
10. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
…रावांचं नाव घेते….ची सून
नवरीच्या हातावर रंगलेल्या मेंदीवरून कळून येतं नवऱ्याचं प्रेम
संक्रांतीसाठी नववधूचे 10 मराठी उखाणे (Sankranti Marathi Ukhane For Bride)
लग्नानंतरची पहिली संक्रांत ही खास असते. खरं तर लग्नानंतर येणाऱ्या प्रत्येक सणाला मग ते मराठी उखाणे नवरदेवासाठी असो वा नवरीसाठी असो. उखाणा हा घ्यावाच लागतो. त्यातही संक्रांतीचा सण म्हणजे हळदीकुंकवाचा सण. बऱ्याच महिला जमल्यानंतर तर उखाणे घ्यावेच लागतात. हा सण असा आहे ज्यावेळी सगळ्यांना एकत्र जमून मजा करता येते. बऱ्याच दिवसांनी एकत्र जमून हा कार्यक्रम साजला केला जातो. त्यानिमित्ताने सगळेच एकमेकांबरोबर बोलतात आणि एकमेकांची विचारपूस करतात. मग अशाच संक्रांती सणासाठी खास नवरीचे उखाणे (marathi ukhane for bride).
1. गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी
….रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी
2. हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी
….रावांचं नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी
3. महिन्यात असते कधी पुनव कधी अवस
….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांतीचा दिवस
4. कपाळाचं कुंकू, जसा चांदण्याचा ठसा
…रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाला बसा
5. तिळगुळाच्या संक्रांतीला, जमतो स्वादिष्ट मेळ
…रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ
6. सोसायट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
…रावांचे नाव घेते आणि वाटते तीळगूळ
7. तीळगुळाच्या देवघेवीने, दृढ जुळते नातं
….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांत
8. उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव
आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव
9. मोत्याची माळ, सोन्याचा साज
….रावांचे नाव घेते, मकर संक्रांंतीचा सण आहे आज
10. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात
….रावांचे नाव ऐकायला बसले सगळे प्रकाशात
पहिल्या पाडव्यासाठी मराठी उखाणे नवरीचे (Ukhane For 1st Padva)
पहिला पाडवा हा प्रत्येक नववधूसाठी खास असतो. या दिवशी पंचपक्वान्नाचं जेवण तर असतंच. याशिवाय या दिवशी नववधूचे खास लाडही होत असतात. घरात मित्रमंडळी नातेवाईक जमलेले असतात आणि अशावेळी हमखास मराठी उखाणे नवरी साठी(ukhane in marathi for bride) घ्यायला अर्थात नाव घ्यायला सांगण्यात येते. नववधूसाठी पहिल्या पाडव्यासाठी काही खास उखाणे
1. तेल लावून, कंबर माझी मोडली,
पाडव्याची ओवाळणी पाहता, कळी माझी खुलली
2. गुढी पाडव्याच्या सणाला, कडूलिंबाचे पान
…रावांचे रूप पाहून, झाले मी बेभान
3. बहिणासारख्या नणंदा, भावासारखे दीर
…रावांचे नाव घ्यायला, पाडव्याला झाले मन अधीर
4. माहेरची माया आणि माहेरची साडी
…रावांची आणि माझी पाडव्याच्या दिवशी जमली जोडी
5. नववर्षाच्या शुभारंभासाठी येतो पाडवा
…रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा
6. घातली मी वरमाला, …रावांच्या गळी
पाडव्याच्या दिवशी येते गालावर लाली
7. जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनी
पाडव्याच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
8. नंदवनात असतात सोन्याची केळी
….रावांचे नाव घेते पाडव्याच्या सणाच्या वेळी
9. सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
…रावांचे नाव पाडव्याच्या दिवशी ओठावर येई
10. लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
…रावांचे नाव घेते, पाडवा सणासाठी!
पहिल्या मंगळागौरीसाठी खास उखाणे (Ukhane For 1st Mangalagaur)
नववधूसाठी जितका महत्त्वाचा पाडवा असतो तितकीच महत्त्वाची असते ती मंगळागौरीची पूजा. मंगळागौरीच्या पूजेनंतर तर खास उखाण्यांचा कार्यक्रम रंगतो. अशावेळी उखाणे कमी पडू लागतात. त्यातही आजकाल उखाणे जास्त येत नसल्यामुळे मराठी उखाण्यांची गरज भासते. मंगळागौरीच्या पूजेनंतर तर उखाण्याची एक स्पर्धाच रंगते. अशावेळी खूप मजा येते. प्रत्येक नववधूसाठी तर हा एक वेगळा अनुभव असतो. कारण अनुभवी महिलांना खूप उखाणे येत असतात. पण मग अशावेळी नक्की काय करायचे तर त्यासाठी असेच काही सोपे नवरीचे उखाणे(ukhane in marathi for bride) तुमच्यासाठी
1. सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी
…रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी
2. सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात,
…रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट
3. जडवाचे मंगळसूत्र, सोन्याने मढविले
…रावांचे नाव घेण्यासाठी, इतके का अडविले
4. सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास
मंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास
5. सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
….रावांचे नाव घेण्यासाठी, नको मला आग्रह
6. मंगळागौरी माते, नमन करते तुला
….रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला
7. गजाननाची कृपा, गुरूंचा आशिर्वाद
…रावांचे नाव घ्यायला मंगळागौरीच्या दिवशी करते सुरुवात
8. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
9. संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा
…रावांचे नाव घेऊन, आशिर्वाद मागते सौभाग्याचा
10. संसाराच्या सागरात प्रीतीच्या लाटा
….रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा
सुखदु:खात साथ देणाऱ्या मराठीतील चारोळ्या, करतात भावना व्यक्त
नववधूकरिता गमतीदार उखाणे (Funny Marathi Ukhane For Bride)
तेच तेच उखाणे घेऊन कंटाळा आला असेल तर नववधूंसाठी काही खास मजेशीर उखाणेदेखील आहेत. हे उखाणे तुम्ही तुमच्या मैत्रिणी असताना घेऊन नक्कीच मजा करू शकता. यामध्ये अनेक विनोदी आणि चावट उखाणे देखील असतात. पण जितके मजेशीर उखाणे तुम्ही घ्याल तितकी मजा अधिक.
1. बागेमध्ये असतात, गुलाबाच्या कळ्या
…रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या
2. पुरणपोळीत तूप असावे ताजे आणि साजूक
आमचे….राव तर आहेत खूपच नाजूक
3. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
….राव परतले नाहीत, कुठे पिऊन पडलेत की काय?
4. रेशमाचा सदरा, त्याला प्लास्टिकचे बक्कल
आमचे…राव आहेत हँडसम, पण डोक्यावर मात्र टक्कल
5. नाव घ्या नाव, सगळे झाले गोळा,
….रावांचं नाव आहे, एक लाख रूपये तोळा
6. पाव शेर रवा, पाव शेर खवा
….रावांचे नाव घेते, समोर हजार रूपये ठेवा
7. सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून
…रावांचे नाव घेते पाच गडी राखून
8. चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा
मी आहे म्हैस तर…राव आहेत रेडा
9. उंच उंच डोंगर हिरवे, त्याला टेकतं आभाळ,
….रावांचे नाव काय घेऊ…कपाळ???
10. एक होती चिऊ, एक होता काऊ
….रावांचे नाव घेते, आता डोकं नका खाऊ
वाचा – लोकप्रिय मराठी शब्द
महिलांकरिता स्मार्ट उखाणे (Smart Marathi Ukhane For Female)
महिला आजकाल खूपच स्मार्ट झाल्या आहेत. बऱ्याचशा महिलांना अगदी पारंपरिक उखाणे घ्यायला आवडत नाही. त्यांना आधुनिक आणि स्मार्ट असे उखाणे घ्यायला आवडतात. त्यातून स्मार्टनेस दिसावा अशी महिलांची अपेक्षा असते. तेच तेच उखाणे अशा महिलांना नको वाटतात. त्यांना आपल्याकडे लक्ष वेधून घेणारे उखाणे जास्त आवडतात. मग अशा महिलांसाठी काही खास उखाणे
1. देवापुढे लावली समईची जोडी,
….रावांमुळे आली आयुष्याची गोडी
2. निळ्या आकाशात चमचमते तारे,
….रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे
3. आईने केले संस्कार, बाबांनी बनवले सक्षम
….रावांच्या साथीने संसार होईल भक्कम
4. श्रावणाच्या आगमनाने, बहरली कांती
…रावांच्या संसारात, मिळो सुखशांती
5. मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ
….रावांमुळे आला जीवनाला अर्थ
6. आतून मऊ, बाहेर काटेरी साल
….दिसले खडूस तरी मन मात्र विशाल
7. गार गार माठामधले, पाणी ताजे ताजे
….राव झाले माझ्या मनाचे राजे
8. मनी माझ्या संसाराची आहे आस
….तू फक्त गोड हास
9. माझी आणि ….रावांची जमली जोडी
सर्वांनी येऊन वाढवा लग्नाची गोडी
10. नव्या कोऱ्या रूळांवर, ट्रेन धावते एकमद फास्ट
…राव चला पिक्चरला, पकडू सीट लास्ट
हेही वाचा –
महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं
Dohale Jevan Ukhane | डोहाळे जेवण उखाणे