आपल्याकडे महाराष्ट्रीयन पद्धतीत लग्न असो अथवा कोणताही सण असो, उखाणे घेणे ही एक मजेशीर प्रथा आहे. नवरीसाठी अर्थात नववधूसाठी खास उखाणे असतातच. पण नवऱ्यासाठीही अप्रतिम उखाणे असतात. इतकंच नाही तर आपल्याकडे प्रत्येक खास सणांसाठीही उखाणे घेण्याची पद्धत आहे. आपल्याकडे सणच नाही तर अगदी प्रत्येक गोष्ट खास पद्धतीने साजरी होत असते आणि त्यामध्ये डोहाळे जेवणदेखील असते. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा तर आपण देतच असतो. पण डोहाळे जेवणासाठीही खास उखाणे आपल्याकडे घेतले जातात. तुम्हालाही तुमच्या डोहाळे जेवणात अथवा तुमच्या मैत्रिणीला डोहाळे जेवणासाठी काही खास उखाणे (Dohale Jevan Ukhane) सांगायचे असतील तर तुम्हाला हा लेख नक्कीच फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया काय आहेत खास डोहाळे जेवण उखाणे (Dohale Jevan Ukhane In Marathi).
डोहाळे जेवण म्हटलं की, होणाऱ्या बाळाच्या आईकडेच सर्व लक्ष असतं. तर डोहाळे जेवणाच्या वेळी मुलगा आहे की मुलगी आहे याबाबत खेळ खेळताना होणाऱ्या आईला अगदी सर्वांच्या आग्रहाखातर उखाणा हा घ्यावाच लागतो. त्यामुळे महिलांकरिता खास डोहाळे जेवण उखाणे (Dohale Jevan Ukhane Marathi For Female).
1. 5 सुविसिनींनी भरली 5 फळांनी ओटी….रावाचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी
2. मावळला सूर्य आणि चंद्र उगवला आकाशी, ….रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या खास दिवशी
3. खरं तर सासर आणि माहेरची माझ्या लोकं सारी हौशी….रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी
4. सूर्यमा मावळला आणि चंद्रमा उगवला, रजनी टाकते हळूच पाऊल….रावांच्या आणि माझ्या संसारात लागली बाळराजाची चाहुल
5. हिमालयावर पडतोय बर्फाचा पाऊस…रावांचं नाव घेते सारच्यांना खूपच भारी हौस
6. आई वडील प्रेमळ तसेच आहे सासू – सासरे, …रावांचं नाव घ्यायला डोहाळे जेवणाचं कारण आहे पुरे
7. घाट घातला तुम्ही सर्वांनी पुरवण्यासाठी माझे डोहाळे……रावांच्या प्रेमाच्या झुल्यावर मी घेते हिंदोळे
8. कुबेराच्या भांडारात हिरे आणि माणकांच्या राशी……रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी
9. फुटता तांबड पूर्वेला कानी येते भूपाळी……रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी
10. नेसली हिरवी साडी, घातला हिरवा चुडा……रावांचं नाव घेते आणि शोधते बर्फी वा पेढा
11. तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले…रावांचं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.
12. पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी… रावांचे नाव घेते भरली माझी ओटी
13. सरस्वती देवीच्या मंदिरात साहित्यांच्या राशी…रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.
14. डोहाळे जेवणाला सजवली पाना फुलांची नौका… रावांचं नाव घेते लक्ष देऊन ऐका
15. गोप-गोपिकांना करते धुंद कृष्णाची बासरी…रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे आहे सासरी
डोहाळे जेवण महिलांसाठी असले तरीही त्यामध्ये बाळाच्या होणाऱ्या बाबाचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो. डोहाळे जेवणाच्या दिवशी बायकोला घास भरवताना पतीलाही उखाणा हा घ्यावाच लागतो. होणाऱ्या बाळाचा बाबादेखील तितकाच आनंदी असतो. अशावेळी पुरुषांसाठी डोहाळे जेवण उखाणे (Dohale Jevan Ukhane for Male) घ्या जाणून.
1. कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,…… च्या सोबतीत, डोहाळे जेवणाच्या दिवशी गवसला जीवनाचा आनंद
2. …. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला डोहाळे जेवणाचा दिवस एकदम स्पेशल
3. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, …. चे नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी ऐका देऊन कान
4. पाच बोटातून होते कलेची निर्मिती,…. वर जडली माझी प्रीती आणि त्याचे फळ मिळतेय डोहाळे जेवणाच्या दिवशी
5. केसर दुधात टाकलं काजू, बदाम, जायफळ,…. नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी वेळ न घालवता वायफळ
6. काट्यात काटा गुलाबाचा काटा, ….चं नाव घेतो डोहाळे जेवणाला गुलाबजाम खाता खाता
7. आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, डोहाळे जेवणाला जाहीर करतो …..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड
8. काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, लग्न असो वा डोहाळे जेवण…..चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून
9. डोहाळे जेवणाचा दिवस आहे आमच्याकरिता खास, …. ला देतो गुलाबजामचा घास
10. संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, डोहाळे जेवणाला माझी …. म्हणते मधुर गाणी
कोणतीही गोष्ट ही विनोदाशिवाय नक्कीच पूर्ण होत नाही. असेच काही विनोदी आणि मनाला आनंद देणारे विनोदी उखाणेदेखील तुम्ही डोहाळे जेवणाला घेऊ शकता. डोहाळे जेवण हा आनंदाचा दिवस आहे. या दिवसाला मस्तपैकी विनोदी उखाणे (Funny Dohale Jevan Ukhane In Marathi) घेऊन करा मजा.
1. डोहाळे कार्यक्रमासाठी आज फुले मिळाली स्वस्त…रावांचे नाव घ्यायला कारण लाभलेय मस्त
2. ….आहे प्रेगनंट देतो मी तुला फूल, प्रॉमिस करतो आज तुला, डॅडी होईन मी कूल
3. ….रावांना आहे माज, तरीही नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी खास
4. आहे मी प्रेमळ, नाही कोणाचा द्वेष, डोहाळे जेवणाच्या दिवशी…रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश
5. कितीही झाला बिझनेसमध्ये तोटा,….रावांनी तरीही उडवल्या डोहाळे जेवणात 100 च्या नोटा
6. सिव्हिल इंजिनिअर बनायला लागले खूप कष्ट…रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी स्पष्ट
7. गणपती बाप्पाला केला होता नवस..रावांसह साजरा करतेय आज डोहाळे जेवणाचा दिवस
8. नटण्यासाठी बायका कायम असतात हौशी, ….रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी
9. इन्स्टाग्रामच्या बायोला टाकले आहे फूडी…राव पाहा आजही डोहाळे जेवणाला आहेत तसेच मूडी
10. दादर चौपाटीवर बसून बघायला आवडते समुद्राची लाट….रावांच्या छोट्या Version ची पाहतेय मनापासून वाट!
डोहाळे जेवण हा तसा तर पारंपरिक कार्यक्रम आहे. डोहाळे जेवणामध्ये आपल्या घरच्या मुलीचे आणि सुनेचे डोहाळे पुरवून तिला अत्यंत सुखी ठेवण्याचा आणि आनंदी ठेवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. अशाच आपल्या मुली आणि सुनेसाठी खास पारंपरिक डोहाळे जेवण उखाणे (Dohale Jevan Special Ukhane) घ्या जाणून.
1. नाटकामध्ये नाटक गाजले सुभद्रा-हरण…रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे आहे कारण
2. कृष्णा देवाच्या गायींना चरायला हिरवे-हिरवे कुरण, …रावांचे नाव घ्यायला डोहाळे जेवणाचे कारण
3. प्रिय सासू-सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात… रावांचं नाव घेते कार्यक्रम झाला अगदी थाटात
4. वाऱ्यावरती हलके हलके कळी उमलली मस्त, …रावांचं नाव घ्यायला कारण लाभल मस्त
5. श्रावणामध्ये येते सुंदर श्रावणधारा, …रावांचे नाव घेते डोहाळे जेवण आहे घरा
6. पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळ धमक वरण,…रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे आहे कारण
7. मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल…रावांचे नाव घेते, जड झाले पाऊल
8. आनंदाचे कारंजे, मनी उडते थुई थुई …रावांच्या बाळाची, आता होणार मी आई
9. आजच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या हौशी, ….रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी
10. रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा… रावांना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा.
11. चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ, …..चे नाव घेते केला डोहाळ जेवणाचा थाट
12. सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी, ……चे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी
13. लागली आहे बाळराजांची चाहुल दरवळला परिसर, ….. च्या सहवासात माझे जीवन होईल सफल
14. खरं तर संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट….. राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट
15. मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट, ……चे नाव घेते, केला थाटमाट
तुम्हाला हे डोहाळे जेवण उखाणे आवडले असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुमच्याही डोहाळे जेवणासाठी ठरतील उपयोगी.