home / Family
Marathi Ukhane For Male

75+मराठी उखाणे नवरदेवासाठी | Marathi Ukhane For Male

लग्न म्हटलं की सगळ्याच तयारी सर्वात महत्त्वाची तयारी असते ती उखाण्यांची. हे उखाणे फक्त नववधूनेच नाही तर अगदी वरानेही लग्नामध्ये घ्यायचे  असतात. हल्ली तर वधूबरोबर नवरदेवालाही उखाणे घेणे अनिवार्य असते. नवरदेवाचे उखाणे (Navardevache Ukhane) देखील असतात खास. लग्नातील नवरदेवाचे उखाणे हे अर्थातच खास असायला हवेत. बाकीच्या सणासमारंभासाठीही नवरदेवाला हे उखाणे घ्यावेच लागतात. पण नक्की कसे उखाणे घ्यायचे असा प्रश्न उद्भवतो. कारण बऱ्याचदा उखाणे माहीतच नसतात. त्यामुळे आम्ही खास नवरदेवाचे उखाणे तुम्हाला इथे सांगणार आहोत. नवरदेव उखाणे (Marathi Ukhane For Male) घेतोय म्हटल्यानंतर सगळेच कान सरसावून बसतात. यामध्ये नवरदेवाचे विनोदी उखाणेदेखील आजकाल जास्त ट्रेंडमध्ये आहेत. तर पाहूया आता कोणकोणते उखाणे नवरदेव घेऊ शकतात. 

Latest Marathi Ukhane For Groom – नवरदेवाचे नवे उखाणे

नवरदेवाचे नवे उखाणे - Latest Marathi Ukhane For Groom
Latest Marathi Ukhane For Groom

नवरदेवाचे उखाणे म्हटले की ते मराठीतच (Navardevache Ukhane Marathi) असायला हवे. असेच काही मराठी उखाणे नवरदेवाचे खास करून आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.  

1. पुरणपोळीत तूप असावे साजूक, ….आहेत आमच्या नाजूक

2. काही शब्द येतात ओठातून,….चं नाव मात्र येतं हृदयातून 

3. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास….ला भरवितो श्रीखंडाचा घास 

4. सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखे रूप, मला मिळाली आहे…..अनुरूप

5. संसाररूपी सागरात पतीपत्नीची नौका….चं नाव घेतो सर्वांनी ऐका 

6. दुर्वांची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला

7. मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा…..चं नाव घेतो जरा लक्ष ठेवा 

8. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री 

9. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …..च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने 

10. सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ….चे नाव घेतो…च्या घरात

11. चांदीच्या ताटात रूपया वाजतो खणखण, …..चं नाव घेऊन बांधतो कंकण 

12. रुक्मिणीने केला पण कृष्णालाच वरेन, ….च्या साथीने आदर्श संसार करेन

13. हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी….नाजूक जसे गुलाबाचे फूल

14. आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, …..चं नाव आहे अमृतापेक्षाही गोड

15. …..माझे पिता,….माझी पाता, सुमुहूर्तावर…..आणली माझी कांता 

16. जाई जुईच्या फुलांचा दरवळला सुगंध,…..च्या सहवासात झालो मी धुंद 

17. प्रसन्न वदनाने आले रविराज,…..ने चढविला संसाराला स्नेहाचा साज 

18. काय जादू केली, जिंकलं मला क्षणात, प्रथम दर्शनीच भरली…..माझ्या मनात 

19. मायामय नगरी, प्रेममय संसार, ….च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार

20. जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी….म्हणजे लाखात सुंदर नार 

Short Ukhane For Groom In Marathi – मराठी उखाणे नवरदेवासाठी

Short Ukhane For Groom In Marathi
Short Ukhane For Groom In Marathi

मराठी उखाणे नवरदेवासाठी (Navardevache Ukhane Marathi) म्हटले की जास्त मोठे उखाणे असून चालत नाही. त्यासाठी साधे सोपे आणि छोटे उखाणे अगदी मनात घर करतात. असेच काही साधे सोपे छोटे उखाणे नवरदेवासाठी आम्ही इथे देत आहोत. हे उखाणे घेऊन नक्कीच नवरदेवाची वाहवा होईल यात काही शंका नाही. 

1. फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, …च्या रूपाने झालो मी बेभान 

2. तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी, बघता क्षणी प्रेमात पडलो ….ची लाल ओढणी 

3. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल, …चं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल

4. दवबिंदूनी चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात…च्या संग

5. हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि….किती टिंगू 

6. झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी, शोभून दिसते ….आणि माझी जोडी 

7. मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने…च्या  प्रेमात पडतं 

8. डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी,….माझी झाल्यापासून जळतात सारी 

9. गुलाबाचे फूल मोहक आणि ताजे,…च्या येण्याने भाग्य उजळले माझे 

10. सोन्याच्या कपावर चांदीची बशी…समोर फिक्या पडतील रंभा, उर्वशी 

11. चंद्रामुळे येते विशाल सागराला भरती, …मुळे माझे सारे श्रम हरती

12. मधाची गोडी, फुलाचा सुगंध,…मुळे कळला मला जीवनाचा आनंद 

13. प्रेमाच्या ओलाव्याने, दुःख झाली कोरडी, …माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली 

14. पाहताक्षणी चढली, प्रेमाची धुंदी, …मुळे झाले जीवन सुगंधी 

15. चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, …चं नाव घेतो पुढचं नाही पाठ

16. गोड गोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर तूप, ….वर आहे माझं प्रेम खूप खूप खूप

17. गुलाबी प्रेमाने बनला प्रेमाचा गुलकंद,…च्या नावातच आहे सारा माझा आनंद 

18. अस्सल सोने चोवीस  कॅरेट, …ची झाले आज माझे मॅरेज

19. उगवला सूर्य, मावळली रजनी, …चे नाव सदैव माझ्या मनी 

20. रुप्याचे ताट, त्यावर सोन्याचे ठसे,…चे रूप पाहून चंद्र सूर्य हासे 

वाचा – Dohale Jevan Ukhane for Male

Funny Marathi Ukhane For Groom – नवरदेवाचे विनोदी उखाणे

Funny Marathi Ukhane For Groom
Funny Marathi Ukhane For Groom

सतत अगदी प्रेमाचेच उखाणे घ्यायला हवेत असे काही नाही. असे बरेचसे उखाणे आहेत जे खूपच गमतीशीर असतात. असेच गमतीशीर उखाणे नवरदेवाचे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. असे विनोदी उखाणे (Funny Marathi Ukhane For Male) घेऊन तुम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवू शकता. यामुळे कोणाचाही अपमान होणार नाही याची मात्र तुम्ही उखाणा घेण्याआधी नक्की काळजी घ्या. उखाणा घेताना हा मजेसाठी घेण्यात येत आहे हे स्पष्ट करायला मात्र नक्कीच विसरू नका. 

1. चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे,  घास भरवतो मरतुकडे तोंड कर इकडे

2. गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डोलू, दिवसभर सुरू असते…चे गुलूगुलू 

3. नव्या कोऱ्या रूळांवर ट्रेन धावते फास्ट, चल पिक्चरला सीट पकडू लास्ट

4. अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड, हसते गोड पण डोळे वटारायची भारीच तिला खोड

5. जीवन आहे एक अनमोल ठेवा….आणते नेहमी सुकामेवा 

6. चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा,  आमची ही म्हैस तर मी आहे रेडा 

7. …बिल्डिंग, घराला लावली घंटी, …माझी बबली आणि मी तिचा बंटी 

8. गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,….माझी बायको आहे मोठी लुच्ची 

9. झेंडूचे फूल हलते डुलूडूलू, आमची ही मात्र दिसते डुकराचे पिलू

10. वड्यात वडा बटाटावडा, …ला मारला खडा म्हणूनच जमला जोडा 

11. 5 + 4 इज इक्वल टू नाईन, …इज माईन 

12. माधुरीच्या अदा, कतरिनाचा रूप, …ची प्रत्येक गोष्ट भावते मला खूप

13. …च्या मैदानात खेळत होतो क्रिकेट, …ला पाहून पडली माझी विकेट

14. एक होती चिऊ, एक होता काऊ, ….चं नाव घेतो डोकं नका खाऊ 

15. आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारे…. चं नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे

16. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा…चं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा 

17. मातीच्या चुली घालतात घरोघर, …झालीस माझी आता चल बरोबर 

18. श्रावणात पडतो पारिजातकांंचा सडा….ला आवडतो बटाटावडा 

19. स्टुलावर स्टूल बत्तीस स्टूल,….एकदम ब्युटीफूल 

20. साखरेचे पोते सुईने उसवले,….मला पावडर लावून फसवले

नववधूकरिता खास उखाणे, मराठी उखाणे नवरीचे (Marathi Ukhane For Bride)

Marathi Ukhane For 1st Padva For Male – पहिल्या पाडव्यासाठी नवरदेवाचे उखाणे

पहिल्या पाडव्यासाठी नवरदेवाचे उखाणे - Marathi Ukhane For Gudi Padwa
Marathi Ukhane For 1st Padva – Male

पहिला पाडवा हा जसा नववधूसाठी खास असतो तसाच तो नवरदेवासाठीही खास असतो. पाडव्याच्या दिवशी जावई म्हणून सगळीकडेच एक वेगळा मान देण्यात येतो. अगदी पहिल्या पाडव्याला खास सासरी जेवायचे आमंत्रण असते. अशावेळी अगदी स्वतःच्या घरी असो अथवा सासरी असो दोघांनाही उखाणा हा घ्यावाच लागतो. मग अशावेळी तयारी करायची असेल तर नक्कीच तुम्हाला हे उखाणे (Ukhane In Marathi For Male) उपयोग पडतील.

1. वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा

2. गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट, एकमेकांचे नाव घेतो सोडा आमची वाट 

3. गुढीपाडव्याला केलाय ….ने बदामाचा हलवा, खायला आता सगळ्यांना बोलवा 

4. रांगोळी काढली आहे दारी, दिवा देवापाशी, ….चं नाव घेतो गुढीपाडव्याच्या दिवशी 

5. आजच्या मंगलदिनी राम, सीता, लक्ष्मण परतले अयोध्यापुरी, ….चे नाव घेऊन उभारतो गुढी 

6. नूतनवर्षाची चाहूल घेऊन आला गुढीपाडवा, तुझ्या आणि माझ्या संसारातला आनंद सदैव वाढावा 

7. गुढीसाठी रेशमी साडी, दारात सुंदर रांगोळी….ने केली चविष्ट पुरणपोळी 

8. मांगल्याच्या गुढीला घातल्या साखरेच्या गाठी,…चे नाव घेतो खास तुमच्यासाठी 

9. मांगल्याचं तोरण, यशाची गुढी, ….सोबत जोडल्या पूर्वीच्या परंपरागत रूढी 

10. राम, लक्ष्मण, सीता त्रिमूर्ती साक्षात, गुढीपाडव्याला ….चं नाव घेतो, ठेवा लक्षात 

Smart Marathi Ukhane For Groom – नवरदेवासाठी मराठी उखाणे

नवरदेवासाठी मराठी उखाणे - Smart Marathi Ukhane For Groom
Smart Marathi Ukhane For Groom

तेच तेच पूर्वपरंपरागत उखाणे घेण्यापेक्षा काही खास आणि स्मार्ट उखाणे आता घ्यावे असं प्रत्येकालाच वाटतं आणि त्यासाठी काही स्मार्ट उखाणे आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुम्हालाही तुमच्या मनाने काही स्मार्ट उखाणे (Smart Ukhane In Marathi For Male) बनवून घेता आले तर मग एकदमच मस्त. पण तोपर्यंत तुम्हाला या उखाण्यांची नक्की मदत घेता येईल. 

1. देवळाला खरी शोभा कळसाने येते, …मुळे माझे सौख्य दुणावते 

2. आपल्याकडे सर्वांनी राखावा मराठी भाषेचा मान, ….चं नाव घेतो ऐका लक्ष देऊन कान 

3. नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,…..चे रूप आहे अत्यंत देखणे 

4. पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले,….चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले 

5. नवग्रह मंडळात शनिचं आहे वर्चस्व, ….आहे माझे जीवन सर्वस्व 

6. पुढे जाते वासरू, मागून चालली गाय,…..ला आवडते नेहमी दुधावरची साय 

7. काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,….बरोबरच मिळतो सर्व आनंद 

8. अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,…..घास भरवतो वरण – भात – तुपाचा 

9. श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण,….ला सुखात ठेवेन हाच केला आहे पण 

10. नंदनवनात अमृताचे कलश,….आहे माझी सालस 

देखील वाचा – 

महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं
महिला दिवस की हार्दिक शुभकामनाएं
Holi Wishes in Hindi

20 Mar 2020

Read More

read more articles like this
good points logo

good points text