ADVERTISEMENT
home / Acne
मानसिक आजारामुळे त्वचाविकार होऊ शकतात का?

मानसिक आजारामुळे त्वचाविकार होऊ शकतात का?

आपले मन व शरीर एकमेकांशी जोडलेले आहे. आपल्या मानसिक अवस्थेवर आपले शारीरिक आरोग्य अवलंबून असते. एकवेळ शारीरिक आजार असतानाही आपण मन खंबीर ठेवले तर लवकर बरे होतो. पण दीर्घकालीन चिंता, नैराश्य आणि मानसिक आजारांचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतो असे तज्ज्ञ वारंवार सांगत आले आहेत. मानसिक आजार व त्वचाविकार यांचाही खूप जवळचा संबंध आहे. या प्रकाराला सायकोडर्माटोलॉजिक डिसऑर्डर असे म्हणतात.

सायकोडर्माटोलॉजिक डिसॉर्डर म्हणजे काय?

सायकोडर्माटोलॉजिक डिसऑर्डर ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आपल्या मानसिक अवस्थेचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो.सायकोडर्माटोलॉजिक  डिसॉर्डर्सचे तीन प्रकार आहेत. ते  सायकोफिजियोलॉजिक डिसॉर्डर, प्रायमरी सायकियॅट्रिक डिसॉर्डर व सेकंडरी सायकियॅट्रिक डिसॉर्डर असे आहेत. सोरायसिस आणि एक्झिमा सारख्या सायकोफिजियोलॉजिक डिसॉर्डर या त्वचेच्या समस्यांशी संबंधित आहेत. या विकारांचा मनाशी थेट संबंध नसतो.  परंतु तणावासारख्या भावनिक स्थितींवर ती शरीराची एक प्रतिक्रिया असते. तणाव व  नैराश्यामुळे हे त्वचाविकार ट्रिगर होऊ शकतात. किंवा जर तुम्हाला हे त्वचाविकार आधीपासूनच असतील तर तणाव किंवा नैराश्यामुळे ते आणखी वाढण्याची शक्यता असते.  

‘इच-स्क्रॅच सायकल’

तीव्र तणावामुळे अनेक जुनाट त्वचारोग वाढण्याची शक्यता असते. आपल्या मनावर ताण असला की शरीर त्यावर प्रतिक्रिया देते. जिथे त्वचाविकार आहे किंवा जिथली त्वचा सेन्सिटिव्ह आहे,तिथे खाज सुटते आणि जोराने खाजवल्यामुळे त्या ठिकाणच्या त्वचेला इजा होते. आणि त्वचाविकार वाढतो. हे एक दुष्टचक्र आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘इच-स्क्रॅच सायकल’ असे म्हणतात.  मानसिक तणावामुळे हे दुष्टचक्र ट्रिगर होऊ शकते. म्हणूनच जुनाट किंवा तीव्र प्रकारचे त्वचारोग असलेल्या  रूग्णांच्या त्वचाविकारांवर उपचार करताना त्यांच्या तणावाचे कारण शोधून काढून त्यावर देखील उपचार करणे आवश्यक असते. 

बहुतांश रुग्णांना त्यांच्या  मानसिक समस्यांविषयी बोलताना संकोच वाटतो. किंवा त्यांना आपण आपली मानसिक समस्या त्वचारोगतज्ज्ञांना सांगायची गरज वाटत नाही. पण त्वचारोगाचे मूळ मानसिक ताणात दडलेले आहे हे लक्षात घेऊन रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांना त्यांच्या मानसिक आजाराविषयी सांगायला हवे. जेणे करून डॉक्टर  इतर उपचारांबरोबरच तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे याचाही सल्ला देतील. त्वचाविकार असणाऱ्यांना मन शांत राहण्यासाठी  रिलॅक्सेशन टेक्निक, संगीत व  व्यायाम या गोष्टींचा फायदा होतो. काही विशिष्ट मानसिक आजार किंवा समस्या असल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून थेरपी किंवा समुपदेशन घेणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – सोरायसिस म्हणजे काय जाणून घ्या सर्व माहिती

सायकोडर्माटोलॉजिक डिसॉर्डर्स कुठल्या आहेत

त्वचेवर उठणारे पुरळ किंवा पिंपल्स, ऍलोपेशिया एरिएटा, अटोपीक डर्मटायटिस, सोरायसिस, एक्झिमा, सायकोजेनिक परप्युरा, रोझशा, सेबोरेहीक डर्मटायटिस व अर्टीकॅरीया हे  सायकोडर्माटोलॉजिक डिसॉर्डर्सचे काही प्रकार आहेत. ४४% रूग्णांच्या केस मध्ये असे दिसून आले आहे की त्यांना  सोरायसिसचा त्रास उद्भवण्याआधी त्यांच्या मनावर खूप ताण होता. आणि वारंवार होणार्‍या सोरायसिसच्या त्रासामुळे ८०%  व्यक्तींना नैराश्य आणि तीव्र मानसिक तणावाचा त्रास झाला. वयाच्या चाळीशीच्या आधी ज्यांना सोरायसिसचा त्रास होतो त्याचे मूळ त्यांच्या मानसिक अवस्थेत दडलेले असते असे त्वचातज्ज्ञांचे मत आहे.  ज्यांना गंभीर स्वरूपाचे नैराश्य किंवा तणाव असतो त्यांना एकतर त्वचाविकार किंवा सांधेदुखी होण्याचा अधिक धोका असतो.  

म्हणूनच जर तुम्हीही त्वचाविकाराने त्रस्त असाल किंवा तुम्हाला गंभीर स्वरूपाचे मानसिक त्रास असतील तर त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. जेणेकरून भविष्यात तुम्हाला अधिक शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू नये.  

अधिक वाचा – सतत एकाच ठिकाणी का येतात पिंपल्स, जाणून घ्या कारण

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

04 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT