बऱ्याचदा आपल्या अंगाला खाज येत (Angala Khaj Yene) असते. पण त्याची नक्की कारणं काय असतात याची आपल्याला कल्पना नसते. बऱ्याचदा आपल्या अंगाला येणारी खाज अथवा अंगाला खाज का येते तर ही अलर्जीमुळे अथवा त्वचेवर आलेल्या रॅशेसमुळे उद्भवते. तर काही लोकांना डर्माटायटिस अर्थात त्वचारोगामुळेही उद्भवते. पण खाज येत आहे म्हणून अगदी घरगुती उपाय (Angala Khaj Yene Gharguti Upay) करून दुर्लक्ष करण्यात अर्थ नाही. ही समस्या संपूर्ण शरीराला अथवा शरीराच्या विशिष्ट भागालाही असू शकते. बऱ्याच जणांना धुळीची अलर्जी असते. त्यामुळेदेखील सर्व अंगाला खाज येण्याची समस्या असू शकते. पण जर खाज सुटणे उपाय होत नसेल आणि ही समस्या तुम्हाला वारंवार होत असेल तर तुम्हाला मूत्रपिंड अथवा यकृताचं दुखणं असण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कधीही याकडे दुर्लक्ष करू नका. सूक्ष्म विषाणू मायक्रोबमुळे खाज येते असं अलोपथीमध्ये सांगण्यात आलं आहे. अनेकदा खाज आल्यानंतर आपण हळूहळू त्वचा खाजवायला लागतो. पण मग इचिंग सुरु झाल्यानंतर अगदी आपली त्वचा ओरबाडण्यापर्यंत मजल जाते आणि त्यामुळे त्वचेला आपण हानी पोहचवत असतो. खाज हा खरं तर आजार नाही. पण तरीही आपल्याला झालेल्या अन्य आजारांमुळे त्वचा कोरडी पडून खाजेची समस्या उद्भवते. यावरच आपण अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय (Khaj Yene Upay In Marathi) या लेखातून जाणून घेणार आहोत. यासोबतच तुम्ही जांघेत खाज सुटणे उपाय ही वाचू शकता.
Table of Contents
- खाज म्हणजे नेमकं काय ? – What Is Itching In Marathi
- अंगाला खाज सुटण्याची कारणे – Causes Of Itching In Marathi
- अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय – Angala Khaj Yene Gharguti Upay
- खाजेकरिता घ्यायची काळजी – Prevention Tips For Itching In Marathi
- डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा – When You Ask Doctor
- प्रश्नोत्तरे (FAQ’s) – अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय
खाज म्हणजे नेमकं काय ? – What Is Itching In Marathi
वेळेवर आंघोळ न करणे, त्वचेवर धूळ – माती जमणं अशा कारणांमुळे खाज येत असते. पण नेमकं खाज म्हणजे काय? तर वैद्यकीय भाषेत खाजेला प्रूरिटस असं म्हटलं जातं. सूक्ष्म विषाणांमुळे ही समस्या उद्भवते. रक्तसंक्रमणामुळे फोड आणि पुरळ येतात आणि त्यानंतर शरीरावर खाज येऊ लागते. खाजेचे खरं तर चार प्रकार असतात. याची साधारणतः प्रत्येक माणसाला कल्पना नसते. काही वेळा खाज आली तर पुरळ येतंच असं नाही. शिवाय खाज संपूर्ण त्वचेवर अर्थात पाय, चेहरा, बोटं, नाक, हात अथवा आपल्या गुप्तांगामध्ये येत असते. खाज ओली अथवा कोरडी असते. त्यामुळे जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला खाजेचा त्रास जास्त प्रमाणात असल्याची शक्यता असते. उन्हाळ्यात कोरड्या त्वचेमुळे डोक्यालाही खूप खाज येते. काही व्यक्तींना तापमानात उष्णतेची वाढ झाल्यास खाज यायला सुरुवात होते. यावेळी शरीरातील उष्णात कमी करण्याचे उपाय ही करण्यात येतात. उन्हाळ्यामध्ये अधिक तापमान असल्यामुळे प्रचंड घाम येत असतो. काही लोकांना तर अधिक घाम येण्याचा त्रासही असतो. त्यामुळे घाम तसाच घेऊन आपण पंखा, कुलर अथवा एसीमध्ये बसतो आणि घाम अंगावरच वाळतो. त्यामुळे घामाने अंगावर घामुळं येऊन तुम्हाला खाज येते तर थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊन खाज येते. खाज येणे घरगुती उपाय आपण यावर पाहणार आहोत. पण त्याआधी याची नक्की कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.
अंगाला खाज सुटण्याची कारणे – Causes Of Itching In Marathi
खाज येण्याची अनेक कारणे असतात. त्यापैकी काही महत्वाची कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
- स्किन एजिंग
- त्वचेवर लाल अथवा खाजेचे पट्टे येणे (डर्मेटायटिस)
- साबण अथवा एखाद्या केमिकल गोष्टीची अलर्जी
- पित्त
- कोरडी त्वचा
- सोरायसिस (त्वचेवर खाज, रॅशेस येणे)
- कोणत्याही किटकाचा दंश
- रॅश अथवा सनबर्न
- कांजिण्या
- त्वचेवर येणारी अलर्जी
- लोहाची अंगामध्ये असणारी कमतरता (एनिमिया)
- कावीळ अथवा लिव्हरशी संंबंधित आजारामुळे
- गर्भावस्थेमध्ये येणारी खाज
- एखाद्या औषधचा दुष्परिणाम
अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय – Angala Khaj Yene Gharguti Upay
अंगाला खाज सुटणे उपाय अनेक करतात येतात तेही अगदी घरगुती. त्यामध्ये तुम्हाला घरातील काही गोष्टींचा वापर कसा करायचा आणि यासाठी कशा वापरायच्या आणि त्याचा कसा फायदा होतो ते आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. तुम्हालाही खाजेचा त्रास असेल तर तुम्ही नक्की हे खाज सुटणे उपाय करून पाहा.
बेकिंग सोडा (Baking soda)
साहित्य –
- अर्धा कप बेकिंग सोडा
- एक बाथटब कोमट पाणी
कसा करावा उपयोग
- आंघोळीच्या वेळी एका बाथटबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स करा
- या पाण्यात साधारण 15-20 मिनिट्स बसून राहा
- त्यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा
कसे ठरते फायदेशीर
अंगावर खाज येते उपाय सांगा, असं कोणी विचारलं तर खाजेवर घरगुती उपाय करण्यासाठी बेकिंग सोड्याचा उपयोग करणे चांगले आहे. एका तपासानुसार, बेकिंग सोडायुक्त पाण्याने आंघोळ केल्यास, खाज येणे बंद होते.
तुळस (Tulsi)
साहित्य
- एक मूठ तुळशीची पाने
- एक बादली कोमट पाणी
कसा करावा उपयोग
- एका बादली पाणी घेऊन ते तुळशीची पाने घालून उकळून घ्या
- या पाण्याने तुम्ही आंघोळ करा
- हवे असल्यास, तुम्ही तुळशीची पेस्ट बनवून खाज येत असलेल्या ठिकाणी लावल्यासदेखील त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो
कसे ठरते फायदेशीर
तुळस अत्यंत गुणकारी औषधी आहे. ज्याचा वापर खाजेसाठी घरगुती उपाय म्हणून करता येतो. त्वचेला बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनपासून वाचविण्यासाठी तुळशीचा उपयोग होतो. तसंच तुळशीमधील अँटिमायक्रोबायल गुण अत्यंत उपयुक्त असतात. म्हणूनच अंगाला खाज येत असल्यास, तुळशीचा वापर करावा.
लिंबू (Lime)
साहित्य
- एक ते दोन लिंबू
- कॉटन पॅड
कसा करावा उपयोग
- खाजेच्या औषधाच्या रूपात एक अथवा दोन लिंबाचा रस काढून घ्या
- आता कॉटन पॅड त्या लिंबाच्या रसात भिजवा आणि खाज येत असणाऱ्या ठिकाणी लावा
- त्वचा संवेदनशील असेल तर लिंबाच्या रसात थोडे पाणी घालून घ्या
कसे ठरते फायदेशीर
लिंबामध्ये अँटिएजिंग गुण असतात, जे वाढत्या वयानुसार होणाऱ्या खाजेच्या त्रासासाठी उपयुक्त ठरतात. तसंच लिंबू हे विटामिन सी ने युक्त असते. विटामिन सी चा उपयोग एटॉपिक डर्मेटायटिस (खाज आणि सूज समस्या) सारख्या समस्येवर गुणकारी ठरते.
कोरफड जेल (Aloe Vera)
साहित्य
आवश्यकतेनुसार कोरफड जेल
कसा करावा उपयोग
खाज येणाऱ्या ठिकाणी ताजी कोरफड जेल लावावी
कसे ठरते फायदेशीर
कोरफड जेलमध्ये मॉईस्चराईजिंग आणि अँटिएजिंगचे गुण आढळतता. या दोन्ही गुणांमुळे कोरडी त्वचा आणि वाढत्या वयामुळे अंगाला येणारी खाजेची समस्या सोडविण्यासाठी कोरफडचा उपयोग होतो. त्यामुळे खाज येत असेल तर तुम्ही ताज्या कोरफड जेलचा नक्की वापर करा.
अॅप्पल साईड व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
साहित्य
- एक कप अॅप्पल साईड व्हिनेगर
- कोमट पाणी
कसा करावा उपयोग
- आंघोळीच्या कोमट पाण्यात अॅप्पल साईड व्हिनेगर मिक्स करा
- साधारण 15 मिनिट्स या पाण्यामध्ये तुम्ही शरीर बुडवून ठेवा
- नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा
कसे ठरते फायदेशीर
खाज ही वेगवेगळ्या कारणाने येते हे आम्ही तुम्हाला सांगितले आहेच. यामध्ये वॅरिकोसिटीदेखील समाविष्ट आहे. ज्यामुळे नस सुजते आणि ट्विस्ट होते. त्यामुळे तुम्ही अॅप्पल साईड व्हिनेगरचा वापर केल्यास नसांची सूज पटकन कमी होण्यास मदत मिळते आणि खाजही कमी होते.
नीम (Neem)
साहित्य
- 10-15 कडुलिंबाची पाने
- आवश्यकतेनुसार पाणी
कसा करावा उपयोग
- कडुलिंबाच्या पानांची पाण्यासह पेस्ट करून घ्या
- ही पेस्ट खाज येणाऱ्या ठिकाणी लावा आणि काही वेळ तसंच राहू द्या
- नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा
- अथवा पाण्यात कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने आंघोळ करू शकता
कसे ठरते फायदेशीर
कडुलिंबाची पाने अनादी काळापासून वापरात आहेत. खाजेसाठी याचा उपयोग करून घेता येतो. यामध्ये असणारे अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण खाजेपासून सुटका मिळवून देतात.
नारळाचे तेल (Coconut Oil)
साहित्य
नारळाचे तेल आवश्यकतेनुसार
कसा करावा उपयोग
- कोमट पाण्याने आंघोळ करा आणि शरीर नीट सुकवा
- आता आवश्यकतेनुसार नारळाचे तेल घ्या आणि खाज येत असणाऱ्या ठिकाणी लावा
- पूर्ण शरीराला तेल लाऊन मालिशही करू शकता
कसे ठरते फायदेशीर
नारळाच्या तेलाचा उपयोग घरगुती उपाय म्हणून तुम्ही करू शकता. कोरड्या त्वचेने अधिक खाज येते. पण नारळाचे तेल त्वचा अधिक मऊ आणि मुलायम करून खाज घालविण्यास मदत करते.
पुदीना (Mint)
साहित्य
- दोन ते तीन थेंब पेपरमिंट ऑईल
- अर्धा कप पाणी
कसा करावा उपयोग
- अर्धा कप पाण्यात पेपरमिंट ऑईलचे थेंब घालून नीट मिक्स करा
- आता यामध्ये कापसाचा बोळा भिजवून खाज येत असलेल्या ठिकाणी लावा आणि काही वेळ तसंच ठेवा
नंतर स्वच्छ आंघोळ करा
कसे ठरते फायदेशीर
पेपरमिंट ऑईल हे एक प्रकारचे हायब्रिड पुदिन्यापासून तयार करण्यात आलेले इसेन्शियल ऑईल आहे. पेपरमिंटचा ऑईलचा उपयोग हा उत्तम घरगुती उपाय म्हणून करण्यात येऊ शकतो. यामुळे खाज निघून जाण्यास मदत मिळते.
मेथी दाणे (Methi Seeds)
साहित्य
एक – दोन कप मेथीचे दाणे
कसा करावा उपयोग
- मेथीचे दाणे एक तास पाण्यात भिजवून ठेवा
- भिजलेले मेथीचे दाणे काढून त्याची पेस्ट तयार करून घ्या
- आता खाज असलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावा आणि पेस्ट सुकू द्या
- नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा
कसे ठरते फायदेशीर
त्वचेच्या संबंधित समस्यांवर मेथीचे दाणे उपयुक्त ठरतात. मेथीच्या दाण्यात असलेले मेथेनॉलिक अर्क यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात. यामुळे खाज कमी होण्यास मदत मिळते.
मध (Honey)
साहित्य
मध आवश्यकतेनुसार
कसा करावा उपयोग
खाज येणाऱ्या आणि रॅश आलेल्या ठिकाणी मध लावा
कमीत कमी 20 मिनिट्स मध तसाच ठेवा. सुकू द्या
त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्वचा पुसून घ्या आणि मग आंघोळ करा
कसे ठरते फायदेशीर
त्वचेसंबंधित खाज ही सोरायसिस अथवा एक्झिमाही असू शकते. यामुळे असह्य अशी खाज येते आणि यासाठी तुम्ही घरगुती उपायमध्ये मधाचा वापर करू शकता. यामध्ये असणारे अँटिमायक्रोबियल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. त्वचेवरील सूज आणि खाज कमी करण्यसाठी याचा उपयोग होतो. तसंच बॅक्टेरियापासून वाचण्यासाठीही मदत मिळते.
खाजेकरिता घ्यायची काळजी – Prevention Tips For Itching In Marathi
खाज येऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची हेदेखील महत्वाचे आहे. तुम्ही नियमित ही काळजी घेतली तर अंगाला सुटणाऱ्या खाजेच्या समस्येपासून दूर राहू शकता.
- रोज स्वच्छ पाण्याने आंघोळ करा
- घामामुळे अंडरआर्म्सना खाज येते. त्यासाठी नियमित स्वच्छ करा.
- सुती अथवा कॉटनच्या कपड्यांच्या रोजच्यासाठी वापर करा
- गरम पाण्याने आंघोळ करू नका. कोमट पाण्याचा वापर करा
- त्वचा नियमित मॉईस्चराईज करा
- जास्त केमिकल असणाऱ्या साबणांचा आणि सौंदर्य उत्पादनांचा वापर करू नका
- त्वचा कोरडी होणार नाही याची काळजी घ्या
- सुकलेले आणि स्वच्छ कपडे घाला
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा – When You Ask Doctor
खाज जर अति येत असेल अथवा काही समस्या घरगुती उपायांनाही थांबत नसेल तर तुम्हाला अशावेळी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पण नेमकं काय होत असेल तर डॉक्टरांकडे जावं हे जाणून घ्या.
- सतत खाज येत असेल
- घरगुती उपायांनंतरही आराम न मिळाल्यास
- खाजेचे नक्की कारण न समजल्यास
- पूर्ण शरीरावर खाज येत असेल
- शरीरावर सतत पित्ताचे चट्टे येत असल्यास
प्रश्नोत्तरे (FAQ’s) – अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय
1. घरगुती उपायांनी खाजेवर परिणाम होतो का ?
कोरडी खाज ही त्वचेतील मॉईस्चराईजर कमी झाल्यामुळे होते. त्यामुळे अशा कारणांनी खाज येत असल्यास, मध, कोरफड जेल अशा घरगुती उपायांनी खाज नक्की बरी होते.
2. खाज बरी होण्यास साधारण किती वेळ लागतो ?
व्यक्तीच्या प्रकृती आणि खाजेचे नक्की कारण आणि त्याची गंभीरता किती आहे यावर अवलंबून आहे. त्यानुसार खाज बरी होण्यास वेळ लागतो.
3. एका रात्रीत खाजेची समस्या सुटू शकते का ?
कोणताही आजार वा समस्या ही एका रात्रीत बरी होऊ शकत नाही. वास्तविक काही दिवस त्यावर उपाय केल्यास, लवकर बरे होता येते.
पुढच्या वेळी कोणी अंगावर खाज येते उपाय सांगा असं सांगितल्यास त्यांना हे आर्टिकल नक्की शेअर करा.