चांगले आरोग्य हवे असेल तर पोटाचे आरोग्य चांगले राहणे हे फारच जास्त गरजेचे असते. पोट बिघडणे, बद्धकोष्ठता असा पोटाच्या समस्यांनी ग्रासले असाल तर तुम्हाला पोटाचे आरोग्य चांगले राहणे किती गरजेचे आहे हे नक्की माहीत असेल.पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मेटाबॉलिझम (Metabolism) चांगले राहणे गरचेचे असते. तुमची पचनशक्ती चांगली असेल तर तुम्ही खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचेल आणि तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळेल. तुमचा मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी अशी एक ट्रिक शोधून काढली आहे जी मेटॉबॉलिझम तर वाढवेलच पण तुमची त्वचाही सुंदर करण्यास मदत करेल. चला जाणून घेऊया या विषयी अधिक
मेटाबॉलिझम चांगले असण्याचे फायदे
मेटाबॉलिझम म्हणजे तुमची चयापचय क्रिया चांगली असेल तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला होऊ शकतात. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते. तुमच्या चेहऱ्याला चांगला ग्लो येऊ शकतो. म्हणूनच चयापचय क्रिया चांगली असणे गरजेचे असते. चयापचय क्रियेला तेजी आणण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींचा समावेश केला तर त्याचा फायदा मिळू शकतो. यासाठीच आम्ही काही सोपे असे पर्याय निवडले आहेत. जे तुमचे वजन कमी करणे, तुमच्या त्वचेला ग्लो देण्याचे काम करु शकते.
मेटाबॉलिझम ड्रिंक 1
मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी तुम्ही उपाशी पोटी तूप घालून गरम पाणी प्यायला हवे. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. इतकेच नाही तर तूपामुळे रुप मिळण्यासही मदत मिळते. त्यासाठी आवर्जून सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि ते पाणी प्या तुम्हाला नक्कीच त्यानंतर पोट साफ होण्याची समस्या असेल तर ती कमी होईल.
पोट साफ झाले तर चेहऱ्याला लकाकी येण्यास मदत मिळते. अनेक आयुर्वेदात तूपाला खूप जास्त महत्व दिले जाते. गायीच्या दूधापासून बनवले जाणारे तूप हे तुमच्या आहारात असायलाच हवे.
मेटाबॉलिझम ड्रिंक 2
मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आलं आणि लिंबू याचे पेय करुनही पिता येईल. आलं आणि लिंबू यामधील घटक तुमचे वजन नियंत्रणात आणण्यास मदत करतात. बरेचदा पोट साफ नसेल तरी देखील वजन वाढल्यासारखे वाटते. असे तुम्हालाही वाटत असेल तर कोमट पाण्यात आलं किसून घाला. त्यात लिंबू पिळून हे उपाशी पोटी प्या. लिंबामध्ये व्हिटॅमिन C असते जे तुमच्या त्वचेला तजेला देण्याचे काम करते.
( टीप: लिंबाचे प्रमाण योग्य असावे. खूप लिंबू प्यायल्यामुळेही तुम्हाला त्रास होऊ शकतो. )
मेटाबॉलिझम ड्रिंक 3
तुम्ही चहाप्रेमी असाल तर आजच तुमचा चहा सोडा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात मस्त अशा पुदिन्याचा चहा करुन पिऊ शकता. एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पाने उकळा.त्यात थोडी ग्रीन टीची पाने घाला. त्यात लिंबू पिळून मग हा गरम गरम चहा प्या. त्यामुळेही तुमच्या त्वचेमध्ये फरक पडलेला दिसू शकेल.
आता या गोष्टींचा तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये नक्की समावेश करा.