मिर्झापूर 2 सिझन कधी येणार हा डिजीटल मनोरंजन जगातला सर्वात जास्त विचारला जाणारा सध्याचा प्रश्न आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात जास्त पाहिली गेलेली वेबसीरिज म्हणजे मिर्झापूर. ज्याच्या सेकंड सिझनची सगळेच आतुरतेने वाट पाहात आहेत. पण हा सिझन येणार येणार अशा बातम्या अनेक महिन्यांपासून आपण वाचतोय. पण याचं नेमकं उत्तर मिळालंय मिर्झापूरमध्ये गोलूची भूमिका केलेल्या श्वेता त्रिपाठीकडून.
कोरोनामुळे सध्या सगळेच लॉकडाऊनच्या परिस्थितीत घरी अडकले आहेत. या काळात मनोरंजनाचं असलेलं एकमेव साधन म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म्स हे आहे. भारतात नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ हे सर्वात मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत. ज्यांच्याकडेही रिलीजसाठी काहीच प्रोजेक्ट्स उरले असून ते काही दिवसात रिलीज करण्यात येतील. पण त्यामध्ये मिर्झापूर 2 चा समावेश आहे का? तर नाही. सूत्रानुसार नवा सिजन लवकर रिलीज करण्याचा प्रयत्न तर सुरू आहे पण सध्या लॉकडाऊनमुळे सगळंच थांबलंय. त्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स अडकले आहेत. त्यामुळे प्रोडक्शन टीमच्या हातातही काही नाहीये.
गोलूनेही दिलं उत्तर
मिर्झापूरमध्ये गजगामिनी उर्फ गोलूची भूमिका केलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरळीत आणि वेळेवर सुरू होतं. पण ऐनवेळी लॉकडाऊन झाल्यामुळे सगळंच थांबलं. मला आशा आहे की, सगळं व्यवस्थित होईल. आत्ता काहीच सांगता येणार नाही, पण ‘मी प्रोमिस करते, जब आयेगा तब भौकाल जरूर होगा’. काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या सिझनमधील गोलूची झलक रिलीज करण्यात आली होती. ज्यानंतर ती इंटरनेटवर ती व्हायरल झाली होती.
वेबसीरिजमधल्या कलाकारांचं वाढतं फॅन फोलोइंग
मिर्झापूरसोबतच या वेबसीरिजही रखडल्या
लॉकडाऊनच्या स्थितीत डिजीटल प्लॅटफॉर्म्सवरही लोकांना दाखवण्यासाठी काहीच नाही. या दरम्यान रिलीज झालेल्या पंचायतला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. पण दुसरीकडे मुख्य आकर्षण असलेल्या वेबसीरिज मात्र अडकल्या आहेत. प्राईम व्हिडिओच्या अडकलेल्या वेबसीरिजमध्ये फक्त मिर्झापूरच नाहीतर सैफ अली खानची दिल्ली आणि अभिषेक बच्चनची ब्रीद 2 चा समावेश आहे. ज्याचं शूटिंग पूर्ण झालं आहे पण पोस्ट प्रोडक्शनचं काम मात्र बाकी आहे. पण प्राईमकडे फोर मोर शॉट्स प्लीज 2 आणि पाताल लोक या वेबसीरिज रिलीजसाठी तयार आहेत.
त्यामुळे सध्या तरी मिर्झापूरची आतुरतेने वाट पाहणाऱ्या वेबसीरिज फॅन्सना थोडी वाट पाहावी लागेल. कारण आता मनोरंजनापेक्षाही घरात राहून लॉकडाऊन पाळणं जास्त महत्त्वाचं आहे. कोरोनापासून वाचलात तरच पुढचे सिझन्स पाहता येतील ना.
पुन्हा एकदा जरीनची होणार ‘मिर्झापूर 2’ मध्ये एंट्री
वेबसिरीजचे चाहते असाल तर या 5 वेबसिरीज तुम्ही पाहिल्यात का?