ADVERTISEMENT
home / Family
miss you स्टेटस

आठवण स्टेटस मराठी | Miss You Status Marathi | Miss U Quotes In Marathi

एखाद्याची आठवण आल्यावर तुम्ही काय करता? त्याला भेटण्याचे प्लॅनिंग करता? पण जर तुम्हाला एखाद्याला भेटणे सहज शक्य नसेल अशावेळी तुमच्या भावना तुम्ही शब्दातून व्यक्त करायला हव्यात. तुम्ही एखाद्याला मिस करत असाल तर त्याला (Miss You Status Marathi) पाठवून आपल्या भावना व्यक्त करायला हव्यात. आठवण ही कोणाचीही येऊ शकते. तुमच्यापासून दुरावलेल्या एखाद्या मित्राची, परदेशात असलेल्या तुमच्या कुटुंबाची, प्रियकराची किंवा प्रेयसीची अशा तुमच्या खास जवळच्या व्यक्तिला तुम्ही  आठवण स्टेटस मराठी (Miss You Status In Marathi)  पाठवू शकता. खास तुमच्यासाठीच आम्ही काही खास मेसेज शोधून काढले आहेत जे तुम्हाल आवडतील अशी अपेक्षा आहे.

खास मित्रांसाठी  मिस यू स्टेटस (Miss You Status In Marathi For Friends)

Miss You Status Marathi For Friends

 काही मित्र खूप खास असतात अशा मित्रांना तुम्ही किती मिस करत आहात. त्यांची किती आठवण काढत आहात हे त्यांना माहीत असायला हवेत यासाठीच खास मित्रांसाठी मिस यू स्टेटस (Miss You Status Marathi For Friends)

  1.  आठवण आली असे कधीही झाले नाही
    आठवायला विसरावं लागतं
    पण मी तुला कधी विसरे नाही,
    मित्रा मिस यू सो मच
  2.  वाट पाहणे तुझी,
    हाच राहिला एक ध्यास
    दुसरा विचार मी नाही करत,
    तूच जीवन तूच आहेस श्वास
  3.  नशीब किती खराबं म्हणावं,
    ह्रदयाच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तिला
    दूर राहून फोटोमध्ये पाहावं लागतंय
  4. शाळेतला एक दिवस तुझ्याशिवाय गेला नाही,
    आता तू इथे सोबत नाही तर तुझ्याशिवाय काहीही करावेसे वाटत नाही
  5. काळजी घेणारी मैत्रीण मिळायला भाग्य लागतं
    तिची सतत आठवण येण्यासाठी माझ्यासारखं खूप प्रेम करणारं लागतं
    मिस यू

वाचा – Breakup Status In Marathi

मिस करत असलेल्या कुटुंबासाठी मिस यू स्टेटस (Miss You Status Marathi For Family)

Miss You Status Marathi For Family

आपल्या माणसापासून किंवा कुटुंबापासून तुम्ही दुरावले असाल तर तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही मिस यू स्टेटस (Miss You Status Marathi For Family) पाठवू शकता.

ADVERTISEMENT
  1.  आठवणी हसवतात, आठवणी रडवतात,
    काहीच न बोलता आठवणी निघून जातात,
    पण आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात,
    तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत आहे
  2.  तुमच्या आठवणीत माझा एकही दिवस जात नाही,
    तुम्हाला बघण्याची ओढ मला तुमच्या जवळ घेऊन जात आहे,
    मिस यू सो मच
  3.  असं म्हणतात जेवढी एखाद्याची आठवण येते,
    तेवढीच त्या व्यक्तिवरील आपले प्रेम वाढते,
    माझ्या कुटुंबावरही माझे प्रेम वाढू दे
  4.  कुटुंब असते एक आधार
    त्याच्याशिवाय नाही जीवनाला आधार
  5.  खूप दिवस नाही खाल्ली आई तुझ्या हातची भाजी,
    घराची आठण येतेय मला हल्ली रोज भारी

वाचा – रॉयल अॅटीट्यूड स्टेटस मराठीमध्ये

आठवण स्टेटस मराठी (Aathavan Marathi Status)

Aathavan Marathi Status

कोणाची खूप मनापासून आठवण येत असाल तर खास तुमच्यासाठी आठवण स्टेटस मराठी (Aathavan Marathi Status) पाठवू शकता.

  1.  जेव्हा विनाकारण मूड ऑफ होत असेल तर
    नक्कीच तुम्ही कोणाला तरी खूप मिस करत आहात
  2.  दिवस नकळत जाई,
    रात्र रेंगाळत राही,
    असा एकही क्षण नाही, ज्यावेळी मला तुझी आठवण येत नाही, मिस यू सो मच
  3.  दोन गोष्टी मला तुला पाहिल्यावर अजिबात करता येत नाहीत
    तुला पाहिल्यावर स्माईल
    तुला मिस केल्यावर डोळ्यात पाणी
  4.  तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करणं
    मला काही जमत नाही,
    तुझ्या आठवणीशिवाय
    मन मात्र कशातच रमत नाही
  5. खरंच किती वेडं असतं ना मन
    कुणाच्या तरी आठवणीत
    जगत असतं
    आणि आशा करतं की त्या व्यक्तिनेही
    आपल्यालाही मिस करावं

मिस यू कोट्स खास बहिणीसाठी (Miss U Quotes In Marathi For Sister)

Miss U Quotes In Marathi For Sister

कितीही भांडलो तरी देखील बहिणींमध्ये प्रेम असते. रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवशी बहिण- भावांची भेट होत असली तरी ती काही पुरेशी नसते. अशा बहिणीला तुम्ही कोणत्याही कारणामुळे मिस करत असाल तर खास तिच्यासाठी मिस यू कोट्स (Miss U Quotes In Marathi For Sister)

  1. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील,
    अलगद पापण्यांवरुन अश्रू  एखादा ओघळून जाईल,मिस यू
  2.  जवळ असलं की भांडायचं आणि दूर गेलं की मिस करायचं
    कसं होणार आमचं देवालाच माहिती
  3.  कितीही भांडलीस तरी तुझ्याशिवाय माझा दिवस जात नाही,
    तू संध्याकाळी घरी लवकर आली नाहीस की, जीव माझा खालीवर
    झाल्याशिवाय राहात नाही
  4. लग्न करुन गेलीस,
    पण तुझ्या आठवणीत आता
    घरची सगळं काम मला करावी लागत आहे,
    म्हणून मला तुझी आठवण येत आहे
  5. भाऊ कसाही असूदे
    तो कायम बहिणीच्या
    काळजाचा तुकडा असतो

लाडक्या भावासाठी मिस यू स्टेटस (Miss You Bhava Marathi Status)

Miss You Bhava Marathi Status

भाऊ कितीही खोडकर असलातरी देखील  तो आपल्यापासून दूर गेलेला आपल्याला कधीच नसतो. तुम्ही त्याला कितीही बोललात तरी देखील त्याला कोणी काहीच बोलू नये असे सगळ्यांनाच वाटते. अशा खोडकर भावासाठी मिस यू स्टेटस (Miss You Bhava Marathi Status)

ADVERTISEMENT
  1.  तुझ्या खोडी काही केल्या विसरता येत नाही,
    आता तुझ्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही,
    मिस यू भावा
  2.  बाहेर आल्यावर कळलं तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही,
    भावा तुला या जगात कोणीच रिप्लेसमेंट नाही
  3.  तुला कसं सांगू माझं किती प्रेम आहे तुझ्यावरती,
    तू आला नाहीस की डोळ्यात अश्रू आल्यावाचून राहात नाही
  4.  रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसाची असते मला खूप आस,
    आणि या दिवशी तू आला नाहीस की, तुझी आठवण रडवते मला खास
  5. कुठल्याच नात्यात नसेल,
    एवढी ओढ आहे,
    म्हणूच बहीण- भावांच नातं हे
    खूप गोड आहे
     

प्रेयसीसाठी खास मिस यू स्टेटस (Love Miss You Status Marathi For Girlfriend)

Love Miss You Status Marathi For Girlfriend

प्रेमाच्या व्यक्तिला मिस करणे फारच गरजेचे असते. अशा तुमच्या लाडक्या प्रेयसीसाठी मिस यू स्टेटस (Love Miss You Status Marathi For Girlfriend)

  1.  तो क्षण कधी येणार ज्यावेळी तू माझ्या मिठीत असणार
  2.  येणाऱ्या प्रत्येक सावलीत तुझा भास आहे,
    तू येशील अशी मला कायम असा आहे
  3.  ऐक ना तुझी सवय झालीय मला
    तुझ्याशिवाय नाही राहवत मला
  4.  कोणाला तरी आठवताय
    नंतर हलकेच गालात हसताय,
    अनं नंतर डोळ्यातले अश्रू पुसत
    एका कुशीवर झोपी जाताय
  5.  रोज तुला  शब्दात
    शोधण्याचा प्रयत्न करतो,
    पण शब्द लिहित असताना
    मीच शब्दात हरवून जातो, मिस यू

लाडक्या प्रियकरासाठी मिस यू स्टेटस (Love Miss You Status Marathi For Boyfriend)

Love Miss You Status Marathi For Boyfriend

तुमचा बॉयफ्रेंड तुमच्यापासून दूर गेला असेल तर त्याच्यापासून दूर राहणे थोडे कठीणच असते. अशा तुमच्या लाडक्या प्रियकरासाठी मिस यू स्टेटस (Love Miss You Status Marathi For Boyfriend)

  1.  तुझ्या मिठीत जे सुखं वाटतं ते कशातच वाटत नाही बघं
  1. जिथे श्वासात श्वास गुंततात,
    तेच क्षण आपले असतात,
    तू नसलास आता तरी,
    तेच क्षण मला आजही आठवतात
  2.  पाहते जिथे दिसतोस तू
    बघते जिथे तिथे असतोस तू,
    पण एकच खंत वाटते
    माझ्यासोबत रोज का नसतोस तू?
  3. कितीही दुखावलो तरी आठवण
    तुझी आल्यावाचून राहात नाही,
    तुला मिस केल्याशिवाय माधा एकही दिवस जात नाही
  4.  कधी आठवण आली तर डोळे बंद करु नको,
    कधी भेटशील त्या वळणावर स्माईल देऊन बोलायला विसरु नकोस,
    कधी चूक झाल्यावर माफ करायला विसरु नको,
    आपलं प्रेम आहे खास ते करायला विसरु नकोस

मिस यू मराठी कविता (Miss You Marathi Kavita)

Miss You Marathi Kavita

काही खास व्यक्तिंना ज्यावेळी तुम्ही मिस करता त्यावेळी त्यांना आपल्या मनातील भावना पोहोचवण्यासाठी तुम्ही मिस यू कविता पाठवू शकता. प्रेम कविता या नक्कीच खूप जणांना आवडतात 

ADVERTISEMENT
  1.  कुणीतरी जेव्हा आपल्यासाठी
    झुरत असतं  वाट पाहायला
    लावणं तेव्हा बरं नसतं
    वाट पाहणाऱ्याला जरी
    वेळेचं बंधन नसतं
    गेलेल्या क्षणाला नक्कीच मोल असतं
     
  2.  कोणत्याही अडचणीच्या वेळेला
    मी म्हणणार नाही Miss You,
    नेहमी राहायचं एकत्र मी आणि तू
    मी उद्या नसले तरी तू  दिवसातून एकदा तरी म्हणायचं
    की I miss You
     
  3.  तुझी आठवण येण्यासाठी
    काही वेळ लागत नाही
    तीही माझ्या आठवणीसारखी आहे,
    तिला तुझ्याशिवाय राहावत नाही
  4.  कसं असतं ना
    काही व्यक्ति लगेच बदलतात
    ज्यांना आपण जिवापाड प्रेम करतो
    तेच नंतर क्षणोक्षणी आपल्याला मिस करतात
  5.  आज तुझ्या आठवणींमध्ये
    रमून राहावंस  वाटतयं
    तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक
    क्षण पुन्हा जगावासा वाटतोय
    किती छान झाले असते
    जर घड्याळ्याच काटे
    मागे घेता आले असते
    तुझ्याबरोबर घालवलेले
    प्रत्येक क्षण पुन्हा  नव्याने जगायला मिळते.

आता तुम्हीही करत असाल कोणाला मिस तर नक्की पाठवा मिस यू स्टेटस 

अधिक वाचा:

आईला पाठवा वाढदिवसाच्या शुभेच्छा

23 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT