जा मुली दिल्या घरी सुखी राहा…. लडकीया पराया धन होती है…. हे असे डायलॉग आपण चित्रपटातून नक्कीच ऐकले असतील. लग्नानंतर मुलींचे आयुष्य हे बदलून जाते. काही गोष्टी त्यांना सांभाळून घ्यायच्या असतात तर काही गोष्टींचा आनंद हा त्यांना न सांगता मिळतो. लग्नानंतर प्रत्येकाला येणारा अनुभव हा वेगळा असतो. खूप जणांना सासरी ॲडजस्ट होताना खूप वेळ जातो. तर काही जण अगदी पटकन दुसऱ्या घरात मिसळून जातात. जे मिसळून जातात त्यांना त्रास होत नाही. पण जे बदलांना स्विकारत नाही अशा मुलींना काही समस्यांना सामोरे जावे लागते. लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्यामुळे होणारी ओढाताण ही अत्यंत स्वाभाविक आहे. पण असे असले तरी देखील काही चुका या लग्नानंतर प्रत्येक मुलीने टाळायला हव्यात. संसारात येणारे विघ्न दूर करणाऱ्या अशा या टिप्स आहेत या अंगिकारल्या तरी सासरी- माहेरी दोन्हीकडे तुमचे स्थान अबाधित राहील.
सतत माहेरी जाणं
मुलींसाठी माहेर कधीच परकं होत नाही. त्या कायमच आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासाठी खास असतात. पण लग्नानंतर जर तुम्ही सतत माहेरी जात असाल तर ते कमी करा. खूप जणींना अगदी क्षुल्लक कारणावरुन माहेरी जाण्याची सवय असते. घर जवळ आहे म्हणून किंवा सासरच्या जबाबदाऱ्या टाळण्यासाठी म्हणून खूप जणी सतत माहेरी जात असतात. जर अशा प्रकारे जबाबदाऱ्या टाळून तुम्ही घरी येत असाल तर अशामुळे तुमचा संसार टिकू शकत नाही. कोणताही त्रास नसताना केवळ आपल्याला काही गोष्टींचा कंटाळा आहे असे म्हणून तुम्ही सतत घरी येत राहाल. तर तुमची किंमत राहणार नाही. इतकेच काय कालांतराने तुम्हाला कोणत्याही बाबतीत विचारले जात नाही हे देखील लक्षात येईल. मुलगी-बाबाचे नाते असते खास पण तरीदेखील काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते.
उदा. एकुलती एक मुलगी आपल्या आई- वडीलाच्या काळजीपोटी आली तर ती गोष्ट समजून घेण्यासारखी असते. पण ज्यांच्या माहेरी वहिनी आणि इतर जण आहेत. अशावेळी तुमचे सतत जाणे आणि सल्ले देणे समोरच्याला आवडणार नाही.
ईकडच्या गोष्टी तिकडे करणे
लग्नानंतर तुम्ही वेगळ्या कुटुंबात राहता. त्या कुटुंबाच्या काही गोष्टी असतात. कदाचित काही तुम्हाला आवडणार नाहीत. काही तुम्हाला आवडतीलसुद्धा. चांगल्या गोष्टी तुम्ही सांगणे ठीक पण एखाद्या कुटुंबात असणारे वाद किंवा काही इतर गोष्टी या कधीही सांगू नये. तुम्हाला घरातील एखादी व्यक्ती फार विश्वासाने काहीतरी सांगत असते. तुम्ही कोणाला सांगू नये असा त्या मागचा अर्थ असतो. तुम्हाला जर ती कोणाला सांगायची असेल तर ती कोणत्या तरी विश्वासू व्यक्तीला आवर्जून सांगा. पण त्याचा परिणाम तुमच्या नव्या कुटुंबावर होऊ देऊ नका.
उदा. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला आवडत नाही. तुम्ही त्याबद्दल जर तुमच्या घरी येऊन सांगाल तर नक्कीच तुमच्या खास लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललून जातो.
नवऱ्याला अंतर देऊ नका
लग्नानंतर नवरा हा फारच महत्वाचा असतो. प्रत्येक मुलीसाठी ते असायला हवे. काही जण आपल्या नवऱ्याला फारशी किंमत देत नाही. त्याचा परिणाम हा नात्यावर होतो. जर तुम्ही नवऱ्याला काही ना काही कारणावरुन अंतर देऊ नका. खूप जणी नवऱ्याला अंतर देतात. त्यानंतर नात्यात दुरावा आला की, नवऱ्याला दोष देतात. पण नवऱ्याला तुम्हीच काही कारणास्तव अंतर देत असाल तर ती सर्वस्वी चूक तुमची असते. तुमच्या नात्यातील चांगले आणि वाईट या दोघांसाठी तुम्हीच कारणीभूत असता.
उदा. सतत बाहेर जाणे, माहेरी जाणे, या कारणामुळे नवऱ्यामधील आणि तुमचे अंतर वाढत जाते.
लग्नानंतर या चुका करत असाल तर योग्यवेळी या सवयी बदला नाहीतर…