टपोरे आणि बोलके डोळे तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. म्हणूनच मेकअपमध्येही डोळ्यांचा मेकअप महत्त्वपूर्ण समजला जातो. आय मेकअप करताना काजळ, आय लायनर, मस्कारा, कृत्रिम आयलॅशेस, आय शॅडो, आय शॅडो प्रायमर, शिमर अशा अनेक गोष्टी वापरण्यात येतात. या सर्व गोष्टी करताना डोळ्यांचा आणि पापण्यांचा मेकअपमधील केमिकल्ससोबत संपर्क येतो. जर मेकअप काढताना तो सावधपणे काढला नाही तर त्याचा थेट दुष्परिणाम तुमच्या पापण्यांच्या आरोग्यावर होतो. यासाठी काही गोष्टी करताना सावध राहायला हवं. या काही चुका तुमच्या डोळ्यांचे आरोग्य बिघडवू शकतात. तसंच जाणून घ्या सुंदर डोळ्यांसाठी अशी घ्या ‘पापण्यांची’ काळजी (How To Take Care Of Eyelashes In Marathi), डोळ्यांचा मेकअप टिप्स मराठी | Eye Makeup Tips In Marathi, डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी सोपे डोळे दुखणे घरगुती उपाय (Home Remedies For Eye Pain)
डोळे चोळू नका
डोळे चोळणे ही अनेक लोकांकडून नकळत घडणारी अशी एक चूक आहे. ज्यामुळे डोळ्यांचे आणि पापण्यांचे खूप नुकसान होते. कारण डोळे जोरात चोळण्यामुळे पापण्यांचे केस तुटतात. डोळ्यात काही गेलं अथवा डोळ्यांची जळजळ होत असेल तर डोळे चोळण्यापूर्वी जरा सावध राहा. असं झालं तर डोळे चोळण्याऐवजी डोळ्यांवर पाणी शिंपडा. ज्यामुळे डोळ्यात गेलेलं बाहेर पडेल आणि डोळे न चोळता तुम्हाला बरं वाटेल.
रात्री मेकअप न काढता झोपणे
मेकअपची आवड सर्वांनाच असते, पण मेकअप काढण्याचा मात्र अनेक जणी कंटाळा करतात. काही जणी तर मेकअप न काढताच झोपी जातात. असं केल्याने तुमच्या पापण्यांचे अतोनात नुकसान होते. बराच काळ मेकअप डोळ्यांवर असल्यामुळे पापण्यांचे केस कमजोर होतात आणि गळू लागतात. म्हणूनच कधीच मेकअप काढल्याशिवाय झोपू नका.
चुकीच्या पद्धतीने मेकअप काढणे
डोळ्यांचा मेकअप चुकीच्या पद्धतीने काढण्यामुळेही बऱ्याचदा पापण्यांचे नुकसान होऊ शकते. कारण काही जणीनां जोरात चोळून आय मेकअप काढण्याची सवय असते. असं केल्यामुळे डोळ्यांची नाजूक त्वचा रगडली जाते आणि पापण्यांचे केस गळून जातात. म्हणूनच नेहमी चांगल्या गुणवत्तेच्या मेकअप रिमूव्हरने हळूवारपणे मेकअप काढावा. वॉटर प्रूफ मस्कारा काढण्यासाठी कॉटन पॅडवर मेकअप रिमूव्हर घ्या आणि एक मिनीट ते डोळ्यांवर तसंच ठेवा. ज्यामुळे सहज तुमचा आय मेकअप रिमूव्ह होईल.
एक्सपायर झालेला आय मेकअप वापरणे
डोळ्यांचा मेकअप दररोज केला जात नाही. काजळ आयलायनर नियमित वापरलं जातं. मात्र मस्कारा, आय शॅडो, आय लॅशेस अशा गोष्टी क्वचित वापरल्या जातात. ज्यामुळे बऱ्याच दिवस मेकअपचं साहित्य घरात पडून असतं. आय मेकअप एक ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ वापरू नये कारण त्यांचे शेल्फ लाईफ जास्त नसतं. असे एक्सपायर झालेले आय मेकअप प्रॉडक्ट वापरण्यामुळे तुमच्या पापण्यांचे नुकसान होऊ शकतं.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक