काहीतरी चुरचुरीत, चटपटीत, कुरकुरीत असं काहीतरी खायची इच्छा झाली की, आपण मस्त भजीचा बेत करतो. कांदाभजी, बटाटाभजी आपण नेहमीच खातो. पण घरी काही खास असेल तर कोथिंबीर वडी आणि अळूवडीचा बेत केला जातो. तळणीचे हे दोन्ही पदार्थ खूप जणांच्या आवडीचे असतात. काहीजण कोथिंबीर वडी आणि अळूवडी फारच टेस्टी करतात. तर काही जणांच्या कोथिंबीर आणि अळूवड्या नेहमीच बिनसतात. अगदी क्षुल्लक चुकांमुळे त्यांची रेसिपी बिनसत असते. आता तुमच्याकडूनही वड्या बनवताना अशा काही चुका होत असतील तर तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
अस्सल हापूस आंबे ओळखण्याची ही योग्य पद्धत
कोथिंबीर वडी करताना होणाऱ्या चुका
कोथिंबीर वडी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर, बेसन आणि काही मसाल्यांचा उपयोग करुन ही वडी केली जाते. पण त्याचे प्रमाण जर चुकले तर तुमच्या कोथिंबीरवड्या बेचव आणि पाणचट लागतात. जर तुम्हाला कुरकुरीत आणि चटपटीत अशी कोथिंबीर वडी हवी असेल तर तुम्ही खालील काही टिप्स फॉलो करायला हव्यात.
- छान भरपूर कोथिंबीर वडी असलेली कोथिंबीर वडी ही परफेक्ट असते. पण अनेकदा आपल्याला बाहेरच्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये ज्या कोथिंबीरवड्या मिळतात. त्यामध्ये खूप बेसन असते. त्यामुळे ती गिळगिळीत आणि नरम लागते. याचे कारण आहे बेसनचे प्रमाण जर तुम्ही कोथिंबीरच्या तुलनेत जास्त बेसन घातले तर तुमची वडी तशी होऊ शकते.
- कोथिंबीरवडीतील कोथिंबीरीच्या काड्या दातात अडकण्याची शक्यता तेव्हाच असते. जेव्हा तुम्ही कोथिंबीर छान बारीक चिरत नाही.त्यामुळे कोणताही कंटाळा न करता कोथिंबीर छान बारीक चिरुन घ्या.
- कोथिंबीर वडी या वाफवून केल्या जातात. पाण्याचे प्रमाण कितीही असले तरी ते वाफवता येतात. पण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य असायला हवे. जर तुम्ही कोथिंबीर नुकतीच धुवून घेतली असेल आणि मग त्यात मीठ घातलं असेल तर मग त्याला पाणी सुटते.त्यामुळे लगेच बेसन घालू नका. पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये बेसन घाला.
- कोथिंबीरला एक वेगळा स्वाद असतो. त्यामुळे तुम्हाला खूप मसाले वापरण्याची फारशी गरज नसते. तुम्ही त्यात थोडासा स्वाद येण्यासाठी आलं-लसूण पेस्ट,लाल तिखटं, जीरं आणि तीळं इतके साहित्यही पुरेसे असते. हे करताना पीठ थोडे सैलसर असू द्या.
- कोथिंबीर वडीचे मिश्रण तुम्ही ढोकळ्याप्रमाणे किमान 10 मिनिटे तरी छान वाफवून घ्या. थंड करुन तुकडे पाडून झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने फ्राय करा.
इडली-डोशाचे बॅटर बिघडत असेल तर तुम्ही करत आहात या चुका
अळूवडी करताना घ्या या गोष्टींची काळजी
आता अळूवडी असा प्रकार आहे जो कोथिंबीर वडी इतकाच प्रसिद्ध आहे. हा पदार्थ ही वाफवून मग फ्राय केला जातो. आता यामध्येही बेसनाचा वापर केला जातो. आता अळूवडी करताना तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया
- अळू वड्यांसाठी योग्य पानं कशी निवडायची हे आम्ही तुम्हाला सांगितले आहे. अळू वड्यांचे पान कसे ओळखायचे ते माहीत नसेल तर या लिंकवर क्लिक करायला विसरु नका.
- अळूवड्यांमध्ये सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे बेसनाचे पीठ कारण अळू वड्यांच्या पानाला तशी काही विशेष चव नसते. आता त्यासाठी तुम्हाला बेसनाचे पीठ किंवा घोळ छान चविष्ट करायचे असेल तर भजीच्या पिठापेक्षा थोडे जाड बेसनचे बॅटर बनवा. त्यामध्ये मीठ,चिंचेचा कोळ,चवीनुसार गूळ लाल तिखट, हळद, तीळ, बेसनाचा त्रास होऊ नये म्हणून थोडासा ओवा घालायला विसरु नका.
- मोठे पान उलट करुन आधी त्याच्या शीरा काढून घ्या. पान जितके सपाट करता येईल तितके करा. त्यावर बॅटर पसरवा. बॅटरचा खूप थरही लावू नका. अगदी योग्य प्रमाणात ते असू द्या.
आता असे करताना अळूची लहान पाने राहून गेली असतील तर तीही मध्येमध्ये ठेवा आणि सारण लावा. आता त्याला रोल करा. म्हणजेच उंड्या तयार करा. - स्टीमरमध्ये पाणी गरम करुन हे रोल वाफवून घ्या. पानं साधारण नरम आणि सुरकुतली की पानं छान शिजली असे समजावे, साधारण 10 मिनिटं ही पान वाफायला लागतात.
- आता बाहेर काढून तुम्ही छान त्याचे पातळ पातळ रोल कापून तळू शकता. किंवा त्याला वरुन फोडणी देऊ शकता.
आता कोथिंबीर वडी आणि अळू वडी करताना या गोष्टी लक्षात ठेवा.
ताजे मटार साठवून ठेवण्यासाठी फॉलो करा या स्टेप-बाय-स्टेप टिप्स