कुल्फीकुमार बाजावाला फेम अभिनेता मोहित मलिक आणि त्याची पत्नी अभिनेत्री आदिती शिरवाईकर मलिक यांनी घरी मागच्या महिन्यात त्यांच्या बाळाला जन्म दिला. 29 एप्रिलला या दोघांना पुत्रप्राप्ती झाली. बाळाचं आगमन होताच दोघांनी सोशल मीडियावर याची अधिकृत घोषणा चाहत्यांसाठी केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या बाळाची एक छलकही सोशल मीडियावर शेअर केली होती. आता नुकतंच मोहित आणि आदितीच्या बाळाचं नामकरण झालं असून त्याच्या नावाच्या अर्थासह एक पोस्ट मोहित मलिकने शेअर केली आहे.
बाळाचं का केलं जातं बारसं
एखाद्याच्या घरी बाळाचं आगमन झालं की पहिला प्रश्न विचारला जातो की बाळाचं नाव काय? कारण बाळाला आयुष्यभर या नावाने ओळखलं जातं. बाळाचं नाव ही बाळाची पहिली ओळख असते. म्हणून मग काही दिवस बाळाला सोनू, मोनू, चिंटू, सोनुली, परी, पिंकी अशा टोपण नावाने हाक मारली जाते आणि जन्मानंतर बाराव्या दिवशी अथवा सव्वा महिन्याने त्याचं बारसं अथवा नामकरण केलं जातं. या दिवशी त्याला अर्थपूर्ण नाव दिलं जातं. यासाठीच जाणून घ्या बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज (Namkaran Invitation Message In Marathi)
आदिती आणि मोहितच्या बाळाचं नावाचा अर्थ
आदिती आणि मोहितनेही त्यांच्या बाळाचं नामकरण करत एक अर्थपूर्ण नाव बाळाला दिलं आहे. आदितीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी बाळाचं नाव ‘एकबीर’ असं असल्याचं शेअर केलं आहे. आदितीने पुढे या पोस्टमध्ये शेअर केलं आहे की,” नाव काय ? तू शूरवीर आहे, तू सकारात्मक आहेस, तू कणखर आहेस आणि तू आमची ताकद आहेस, तू आमच्या प्रार्थनेचे फळ आहेस, आमचा एकबीर! आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
मोहित मलिकने शेअर केलं आहे की,” तू आमच्या आयु्ष्यात तेव्हा आलास जेव्हा सगळं जग एका कठीण काळातून जात आहे…आम्हाला बळ, प्रेम आणि सकारात्मकता देत तू आम्हाला आमच्या भविष्यकाळात जाण्याची एक संधी दिली आहेस…आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ‘एकबीर मलिक’ चाहत्यांनी मोहित आणि आदितीच्या या फोटो आणि पोस्टवर लाईक्स आणि कंमेट्सचा पाऊस पाडला आहे.
यासाठीच तुमच्या बाळासाठी नाव निवडताना लक्षात ठेवा या गोष्टी
मोहित आणि आदिती 2010 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर जवळ जवळ दहा वर्षानंतर बाळाच्या जन्मामुळे त्यांच्या घरी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. एकबीरमुळे निर्माण झालेला हा आनंद त्यांच्या जीवनात असाच टिकून राहो अशीच चाहत्यांची इच्छा आहे. मोहित मलिक ‘कुल्फी कुमार बाजावाला’नंतर ‘लॉकडाऊन की लव्ह स्टोरी’मध्ये दिसला होता. मोहित जवळजवळ गेली पंधरा वर्षे टेलिव्हिजन मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कुल्फी कुमार बाजावाला या मालिकेत त्यांने एका प्रेमळ पित्याची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूपच आवडली. आता तर तो ही भूमिका प्रत्यक्ष आयुष्यातही साकारत आहे. अदितीनेही अनेक हिंदी मालिकांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये दोघंही त्यांचं बाळ आणि संसारात चांगले रमले आहेत.
यासोबतच वाचा त वरून मुलांची नावे, आधुनिक आणि युनिक (“T” Varun Mulanchi Nave)
फोटोसौजन्य -इन्स्टाग्राम