बाळाच्या जन्मानंतर त्याच्यावर केला जाणारा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला संस्कार म्हणजे नामकरण विधी. बाळाला नाव देण्याच्या या विधीला बारसं (Namkaran Sohala) असंही म्हणतात. नामकरण विधीनंतर बाळाला स्वतःची स्वतंत्र ओळख मिळते. बारशापर्यंत सर्वजण त्याला बाळा, सोनु, छकुली, छकुली अथवा परी असं म्हणत असतात. मात्र समाजात त्याला अथवा तिला कोणत्या नावाने ओळखलं जाणार हे नामकरण विधी नंतर ठरवलं जातं. बाळाच्या नामकरण विधीसाठी नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारीपाजारी यांना आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. यासाठी खास निमंत्रण पत्रिका छापल्या जातात. बारशाच्या अथवा नामकरण सोहळ्याच्या पत्रिकेवरील मजकूरही खूपच गोड असतो. तुमच्या बाळाच्या बारशाचं कसं आमंत्रण द्यायचं असा प्रश्न पडला असेल तर वाचा हे नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका मसेज मराठीतून (Naming Ceremony Quotes in Marathi)
बाळाच्या नामकरण विधीसाठी आमंत्रण पत्रिकेवर लिहा हा ड्राफ आणि द्या पाहुण्यांना निमंत्रण
१. ओठांवर हसू आणि गालांवर खळी, आमच्याकडे उमलली आहे छोटीशी कळी तिच्या बारश्यासाठी सर्वांनी यायचं हं...
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
२. इटुकले पिटुकल माझे हात
इवले इवले माझे गाल
गोड गोड किती छान
सर्वांची मी छकुली लहान
पण माझे नाव काय
अहो ... तेच तर ठरवायचे आहे
म्हणून आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
माझ्या बारशाला यायचं हं...
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
३. अहो आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी,आत्या, मावशी, दादा, ताई मी तीन महिन्याचा झालो..पण तुम्ही अजून मला माझं नाव दिलं नाही.... म्हणूनच माझ्या मम्मी पप्पांनी तुम्हाला माझ्या बारश्याला बोलावलं आहे.
चला तर मग लागा तयारीला... या द्यायला मला छान छान नाव आणि खूप खूप आर्शीवाद
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
४. आई-बाबा म्हणतात लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात... मग अशा या गोंडस फुलाला आर्शीवाद द्यायला तुम्ही येणार ना ... मी वाट पाहतोय माझ्या बारश्याच्या दिवशी
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
५. मी आणि आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला आाग्रहाचे आमंत्रण... आमच्या घरी एक छानशी परी अवतरली आहे. तिला नाव देण्यासाठी आणि तिला आर्शिवाद देण्यासाठी सर्वांनी यायचं हं
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
६. परमेश्वराची आमच्यावर झालेली कृपा म्हणा किंवा मग देवाने आमच्या प्रार्थनेला घातलेली साद म्हणा... आमच्या घरी आली आहे एक तान्हुली परी... आमच्या परीशी तुमची ओळख करून द्यायची आहे. तेव्हा आमच्या छकुलीच्या बारशाला सर्वांनी यायचं हं
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
७. आमच्या आयुष्यातील खास दिवस... आमच्या छकुल्याचा नामकरण दिवस... या शुभ दिवशी आपणां सर्वांचे आर्शिवाद आणि शुभेच्छा आम्हाला हव्या आहेत... मग येताय ना बाळाच्या बारशाला...
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
८. कृष्णाचा यशोदेला लागला ध्यास तसाच होता आम्हालाही विश्वास... परमेश्वराची झाली कृपा आणि तो झाला आमचा श्वास.. आमच्या छकुल्याच्या नामकरणासाठी तुम्हाला आमंत्रण आहे खास
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
९. पहिली बेटी धनाची पेटी
परमेश्वराने भरली सुखाने ओटी
कन्यारत्नाला आमच्या तुमचेही आर्शिवाद हवे
तिला नाव द्यायचे आहे नवे तेव्हा सर्वांनी बारशाला यायलाच हवे
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
१०. गणेशासारखी बुद्धी आणि हनुमानासारखी भक्ती
बाळाला आमच्या मिळावी तुमच्या आर्शिवाद ची शक्ती
यासाठी आपणास बारशाचे आग्रहाचे निमंत्रण
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
यासोबत तुमच्या बाळाचे नाव निवडताना लक्षात ठेवा या गोष्टी
बाळाच्या बारशासाठी मेसेज आणि पत्रिकेवर लिहा हे खास बारशासाठी कोट्स
१. इवल्याशा पणतीने घर होते प्रकाशित
आमच्या बाळाच्या येण्याने आमचे जीवन झाले उल्हासित
२. देवरायाकडा अमुल्य ठेवा त्याने दिला आम्हाला आयुष्यभराचा दुवा
गोंडस बाळाच्या आगमनाने प्रसन्न झाले घर
त्याला आर्शीवाद द्यायला यावे मात्र तत्पर
३. कोणी म्हणतं चिऊ, कोणी म्हणतं दिदी
अहो असं किती दिवस चालायचं...
म्हणूनच आम्ही आमच्या बाळाच्या नामकरण विधीचं आयोजन केलं आहे... तरी आपण सर्वांनी या सोहळ्यास आवर्जून हजर राहावे ही विनंती
४. बाळाच्या आगमनाची गोड बातमी आली कानी
आई बाबा म्हणून घेताना नात्याची वीण घट्ट झाली आमच्या परीला नाव आणि आर्शिवाद द्यायला हवे तुम्ही सारे जण
.... आणि ... वेळेवर या मात्र पटकन
५. सांगा सांगा माझे नाव, कोण सांगेल माझे नाव
माझं नाव काय हे जाणून घ्यायचं असेल तर.... तारखेला ... या वेळेत माझ्या नामकरण विधीला अवश्य या
६. कोण म्हणतं छकुली कोण म्हणतं गोंडोली
पुरे झाली टोपण नावं मी आता मोठी झाली
आई बाबांना मी सांगितलं आहे मला माझं नाव हवं
पण त्यासाठी माझ्या बारश्याला तुम्ही सर्वांनी यायला हवं
७. आमच्या छकुल्याचा नामकरण सोहळा
आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण
८. जन्मले मी नूतन बालक तान्हुले
माझ्या मातापित्याचे मी सोनुले
जन्म घेतला मातेच्या उदरी
आनंद देण्यासाठी आलो या भूतलावरी
स्वकीय आणि आप्तेष्टांच्या आर्शिवादाने
नतमस्तक होईन माझ्या माता पित्या चरणी
पण अजून झाली नाही ओळख तुमची आणि माझी
अहो म्हणूनच आमंत्रण तुम्हा सर्वांना
ओळख करून द्यावया माझी
या द्यावया आर्शिवाद आणि ठेवा सुंदरसे माझे नाव
९. नामकरणं संस्कार ‘आनंदाची वार्ता’
परमेश्वर कृपेने आम्हांस कन्यारत्न प्राप्त झाले आहे. तरी हा आनंद बारशाचे निमित्ताने आम्ही द्विगुणित करण्याचे नियोजित केले आहे.
नामकरण विधी .... ठिकाणी.... या वेळेत पार पडणार आहे. तरी या प्रसंगी आपण आमच्या छकुलीला आपले शुर्भाशिर्वाद देण्यास यावे ही विनंती
आपणांस आणि आपल्या परिवारास आग्रहाचे निमंत्रण
१०. आपणा सर्वांच्या आर्शिवादाने आमच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झाले आहे तरी आपण सर्वांनी आमच्या बाळाच्या बारशासाठी सहकुटुंब यावे ही विनंती
घरात बाळाचं आगमन होणं म्हणजे आनंदोत्सव. अशा तुमच्या प्रियजनांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांना द्या हे शुभेच्छा संदेश
१. आज आपल्या आयुष्यातील एक खास क्षण, तुमच्या छकुल्याच्या नामकरण विधीसाठी हार्दिक अभिनंदन
२. कृष्णाचा यशोदेला जसा ध्यास, तसाच तुमच्या आयुष्यातील हा क्षण आहे खास, आईबाबा झाल्याबद्दल आणि बाळाच्या नामकरण विधीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
३. आजवर हे घर फक्त माझ्या मित्राचं घर होतं आता मात्र त्याचं नंदनवन झालं आहे... नवजात बालकास आर्शिवाद आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
४. पहिली बेटी धनाची पेटी.... कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
५. नवजात बाळाची काळजी परमेश्वर त्याच्या अ्द्भूत प्रेमाद्वारे घेत असतो हाच तुम्हाला आर्शिवाद आणि बाळाला खूप खूप प्रेम
६. तुमच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी मनापासून शुभेच्छा तुमच्या आयुष्यात आनंदाची बरसात कायम होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
७. नवजात बाळाच्या आगमनाने तुमच्या सुखी संसारात आनंदाची कळी उमलली आहे... आयुष्यभर तुमच्या जीवनात हा आनंद असाच उमलत राहो याच शुभेच्छा
८. आयुष्यात तुम्ही खूप खूप श्रीमंत आहात कारण तुमच्यावर सुख समाधानाचा वर्षाव करणारे पिटुकले दोन जीव घरी आले आहेत. तुमचा हा आनंद कायम असाच राहू दे याच शुभेच्छा
९. तुमच्या बाळाला उदंड आयुष्य लाभू दे आणि त्याची किर्ती चहू दिशेने पसरू दे याच शुभेच्छा आणि आर्शिवाद
१०. मातृत्वाने तुमची ओंजळ कायम भरलेली राहू दे आणि तुमच्या बाळाचे यश पाहून तुमचे मन भरू दे... आईबाबा झाल्याबद्दल खूप मनापासून शुभेच्छा
त्याचप्रमाणे बाळाच्या बारशासाठी व वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी (Baby Boy Names Starting With V In Marathi)
बाळाच्या आगमनाने झालेल्या आनंद द्विगुणित करणाऱ्या नामकरण विधीला आमंत्रण देण्यासाठी
मेसेज
१. दुडदुडणारी मऊ पाऊले, फुलवीत आपले हा चिमुकले
जणू सांगती नाव ठेवा माझे चांगले
बारशाला सर्वांनी उपस्थित राहावे हेच आमुचे आहे मागणे
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
२. समस्त .... परिवाराकडून आपणास आग्रहाचे निमंत्रण
अहो माझे बाबा... आणि माझी आई.....
पण माझे नाव काय?
तेच तर ठरवायचे आहे
मग सगळे येताय ना मला नाव द्यायला
मुहुर्त -
स्थळ -
निमंत्रक -
३. आनंदाची चाहूल घेऊन इवल्याशा पावलांनी कोणी आले
सगे सोयरे जमतील सारे, मंगलमय मग घरकुल झाले,
कोण बरे मग अनामिक आले?
अहो त्याचेच तर नाव ठेवायचे आहे!
आमच्या बाळाच्या बारशाचे आपणां सर्वांना आग्रहाचे निमंत्रण
बाळाला शुभ आर्शिवाद देण्यास अगत्य यावे
स्थळ -
वेळ -
निमंत्रक -
४. मला आमच्या घरी येऊन एक महिना झाला
माझ्या आईवडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा आहे
त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि माझ्या नामकरण विधीसाठी सर्वांनी यायचं हं
पत्ता -
दिनांक आणि वेळ -
निमंत्रक -
५. आमची लाडक्या कन्येच्या नामकरणाचा विधी दिनांक... सायंकाळी... वा. करण्याचे योजले आहे. तरी आपण
सहपरिवार येऊन आणच्या कन्येला आर्शिवाद आणि शुभेच्छा द्याव्या ही नम्र विनंती
६. एक नाजुकसं स्वप्न प्रत्यक्षात अवतरलं
आकाशाचं चांदणं जणू ओंजळीत येऊन निजलं
इवलंसं चिमणं बाळ साऱ्यांना हसवायला लागलं
बघता बघता त्याचं बारसं करायचं ठरलं
इवल्याशा पंखांना फक्त आर्शिवादाचं बळ हवं
त्यासाठी मात्र तुम्ही सर्वांना घरी यायलाच हवं
दिनांक -
वेळ -
पत्ता -
७. आईबाबांनी माझं बारसं करायचं ठरवलं आहे
मला आर्शिवाद आणि प्रेम देण्यासाठी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण
मी सर्वांची वाट पाहीन... पण जास्त उशीर नाही करायचं हं. नाहीतर मी झोपून जाईन
याल तर गोड गोड पप्पी नाही आला तर मात्र कट्टी
दिनांक -
वेळ -
स्थळ -
८. क्षणात हसणं, क्षणात रडणं, इकडून तिकडे फिरताना अलगत पडणं, सहज खेळता खेळता मुळूमुळू रडणं आणि ऋतुमानाप्रमाणे सारं काही सतत बदलत राहणं
अशाच दुडदुडणाऱ्या पावलांचं आगमन आमच्या घरी झालं आहे
त्याच्या मागे पावलावर पाऊल ठेवत घरभर पळायचं आहे, पण... त्याआधी त्याला छानसं नाव ठेवायचं आहे... तेव्हा तुमच्या सर्वांना आमच्या बाळाच्या बारशाचं आग्रहाचं आमंत्रण
दिनांक -
वेळ -
स्थळ -
निमंत्रक -
9. दुडूदुडू धावतो बाळ शोभा आली अंगणा
बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा,
घरादारांत सुखाचं त्यानं चांदणं शिंपलं,
माझं सोनुलं सोनुलं , माझं छकुलं छकुलं,
बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं
आमच्या छकुल्याच्या बारशासाठी सर्वांनी यायचं हं
दिनांक -
स्थळ -
निमंत्रक -
१०. वर्षानुवर्षे ज्याची आस होती ते स्वप्न आज पूर्ण झालं
बाळाच्या आगमनाने घराच्या आमच्या गोकूळ झालं
गोकुळातल्या या कृष्ण कन्हैया ला नाव आता द्यायचं आहे
बाळाच्या बारशासाठी आमंत्रण तुम्हाला खास आहे
दिनांक -
वेळ -
स्थळ -
स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे (Baby Boy Names Starting With "S" In Marathi)
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम