ADVERTISEMENT
home / Weight Loss
benefits of moong sprouts

कच्चे मूग खाण्याने मिळतो शरीराला फायदा, जाणून घ्या

मोड आलेले कच्चे मूग आपण नाश्त्यामध्ये अनेक जणांना खाताना पाहतो. खरं तर मोड आलेले मूग खाणे हे शरीराला अत्यंत लाभदायक आहे. यामध्ये फायबरचा मुख्य स्रोत असून हे खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि भूकही लवकर लागत नाही. तसंच आपल्या डोळ्यांची चांगली निगा राखण्यासाठी, वजन नियंत्रित करण्यासाठी आणि हाडांची काळजी घेण्यासाठी तसंच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा खूपच फायदा होतो. यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्कृष्ट असा फायबरचा स्रोत आहे. तसंच आपल्या हृदयाचे स्वास्थ्य जपण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा – 3, ओमेगा – 6 फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम, फोलिक अॅसिड आणि विटामिन बी – 6 चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे एक सुपरफूड असून याचा आपल्या दैनंदिन आहारात आपण समावेश करून घ्यायला हवा. कच्चे मूग खाण्याने शरीराला अधिकाधिक कोणता फायदा मिळतो हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. 

शरीराला अत्यंत पोषक 

कच्चे मोड आलेले मूग – Freepik

कच्चे मूग हे शरीराला अत्यंत पोषक असतात. दैनंदिन जीवनात विटामिन्सची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. मुगामध्ये विटामिन सी अधिक प्रमाणात आढळते. यामुळे संक्रमण आणि आजाराशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. एक कप कच्च्या मूगामध्ये साधारण 14 मिलिग्रॅम इतके विटामिन सी असते. विटामिन सी हे त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि शरीरातील निरोगीपणा राखण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये ग्लोब्युलिन आणि एल्बुमिन नावाचे मुख्य प्रोटीनही असते आणि म्हणून हाडे, मांसपेशी आणि त्वचेला अधिक मजबूती देण्यास याची मदत मिळते. 

पचनक्रियेसाठीही ठरते उपयोगी 

कच्च्या मूगामध्ये एंजाईमो अधिक प्रमाणात असते. हे एंजाईम आपल्या चयापचय क्रियेला मदतशीर ठरते आणि शरीरातील रासायनिक प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. जेव्हा पचनक्रियेबाबत आपण बोलतो तेव्हा तुम्ही कच्चे मूग तुमच्या नियमित डाएटमध्ये समाविष्ट करून घ्यायला हवेत. पचनक्रियेबाबत तुम्हाला समस्या असतील तर यामुळे त्या सुटण्यास मदत मिळते. कच्च्या मूगामध्ये अधिक डाएटरी फायबर आढळते. त्यामुळे पचनक्रिया नियंत्रित करण्यसाठी याचा उपयोग होतो. विशेषतः ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी तर आपल्या जेवणात कच्च्या मूगाचा समावेश नक्की करून घ्यावा. कारण त्यामुळे मलत्याग प्रक्रिया अधिक सोपी होते. 

वजन घटविण्यास ठरते फायदेशीर 

weight loss
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला याचा चांगलाच फायदा मिळतो. तुम्हाला खरंच वजन कमी करायचे असेल तर कच्चे मूग खाणे हा अत्यंत चांगला पर्याय आहे. हे शरीराला पोषक असून यामध्ये कोणतीही कॅलरी नसते. त्यामुळे तुम्ही नियमित याचे सेवन करू शकता. याशिवाय यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्याने तुम्हाला पटकन भूक लागत नाही आणि भूकेसाठी जबाबदार असणाऱ्या हार्मोन घ्रेलिनचा स्राव रोखण्यास मदत करते. त्यामुळे मेंदूला भूकेचे संकेत बऱ्याच काळापासून देणे बंद होते. सतत भूक लागून न खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत

यामध्ये असणारे पोषक तत्व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरतात. यामध्ये असणारे फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, ओमेगा – 3, ओमेगा – 6 फॅटी अॅसिड हे पोषक तत्व लिपीड प्रोफाईल बनविण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राखण्यासाठी मदत करतात. याशिवाय यामधील फायबर हे मधुमेहालाही प्रतिबंधित करण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे मधुमेह मेलिटस, हायपोग्लायसिमिया आणि इन्शुलिन पीडित व्यक्तींनी आपल्या डाएटमध्ये याचा समावेश करून घ्यावा.

एनिमिया रोखण्यास मदत 

अन्य महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे याच्या सेवनाने एनिमियासारखे आजार रोखण्यास मदत मिळते. मोड आलेले मूग हे लोहयुक्त खनिजांनी युक्त असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे खनिज व्यवस्थित मिळते आणि एनिमिया रोखण्यास मदत मिळते. पोटाची समस्या, मळमळणे, चक्कर येणे आणि थकवा अशी लक्षणे अशतील तर तुम्ही याचे सेवन नियमित करावे. याचा तुमच्या शरीराला अधिक फायदा मिळतो. 

कच्चे मूग तुम्ही तुमच्या आहारात नियमित समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी याची मदत मिळते. तसंच तुम्हाला कोणतीही आरोग्यविषयक समस्या असेल तर याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
03 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT