ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
मुंडावळ्या आणि त्यातील विविध प्रकार | Mundavalya Designs In Marathi

मुंडावळ्या आणि त्यातील विविध प्रकार | Mundavalya Designs In Marathi

लग्न म्हटलं की लग्नाचे वेगवेगळे विधी आलेच. या विधीनुसार अनेक गोष्टी आपण फॉलो करत असतो. महाराष्ट्रीयन लग्नात तर खूपच मजा असते. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डोक्याला बांधल्या जाणाऱ्या मुंडावळ्या (mundavalya in marathi). मुंडावळ्यांशिवाय लग्न पूर्णच होऊ शकत नाही. आपल्याकडे आधी केवळ साध्या फुलांच्या मुंडावळ्या बांधायची पद्धत होती. पण आता वेगवेगळ्या मुंडावळ्या आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. मुंडावळ्यांशिवाय वधू आणि वराचा लुक अपूर्ण ठरतो. हिंदू लग्नाच्या विधीत मुंडावळ्या (mundavalya) बांधायचा विधी हा खास असतो. प्रत्येक विधीला मुंडावळ्या बांधल्या जातात. मुंडावळ्या म्हणजे काय? लग्नामध्ये याचे काय महत्त्व आहे? (Importance of Mundavalya In Maharashtrian Wedding) तुम्हाला माहीत आहे का? 

असे सांगण्यात येते की, लग्नसमारंभ म्हटलं की डोक्यावर काही प्रमाणात ताण हा असतोच. वेगवेगळे करण्यात येणारे विधी, होणारी धावपळ यामध्ये वधू आणि वरालाही व्यवस्थित झोप मिळत नाही. ते थकलेले असतात. त्यांना थकवा अथवा ग्लानी येऊ नये तसंच कोणत्याही शारीरिक अडचणी लग्नात उद्भवू नयेत म्हणून कपाळावर बाशिंग अथवा मुंडावळ्या बांधण्यात येत होत्या. लग्न बाशिंग वा मुंडावळ्या बांधल्यानंतर कपाळाच्या आतील नसांवर विशिष्ट दाब येतो आणि जागरणामुळे होत असलेल्या त्रासातून मुक्तता मिळते आणि कार्य छान पडते. त्यामुळेच पूर्वपरंपरागत या मुंडावळ्या बांधल्या जातात. बाजारात अगदी 20 रूपयांपासून ते अगदी 10 हजारपर्यंत मुंडावळ्या मिळतात. त्यातील कोणकोणते विविध प्रकार आहेत ते पाहूया. 

फुलांच्या मुंडावळ्या (Floral Mundavalya) 

लग्नासाठी आपण विविध प्रकारच्या साड्यांची निवड करतो. तसंच लग्नासाठी साडी कशी नेसावी याचीही आपण तयारी करत असतो. त्याचसह त्या साडीवर कोणत्या मुंडावळ्या अधिक चांगल्या दिसतील हेदेखील आपण लग्नाच्या आधीच ठरवत असतो. आजही बाजारात अनेक वेगवेगळ्या मुंडावळ्या मिळत असल्या तरीही फुलांच्या मुंडावळ्यांचा लुक तुम्हाला कधीच दुसऱ्या मुंडावळ्या बांधून येणार नाही. केवळ पांढऱ्या फुलांच्याच नाही तर यामध्येही तुम्हाला अनेक व्हरायटी दिसून येतात. झेंडू, अष्टर, मोगरा, निशिगंधा, गुलाब अशा अनेक फुलांच्या मुंडावळ्यांनाही मागणी आहे. इतकंच नाही तर रूईच्या फुलांच्या मुंडावळ्याही बाजारामध्ये मिळतात ज्या दिसायला अधिक आकर्षक असतात. 
इथे करा खरेदी – Flipkart 
किंमत – 750/-

मोत्याच्या मुंडावळ्या (Pearl Mundavalya)

mundavalya designs in marathi
मोत्याच्या मुंडावळ्या (Pearl Mundavalya)

महाराष्ट्रीयन लग्नात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मुंडावळ्या म्हणजे मोत्यांच्या मुंडावळ्या. या बाजारात 20 रूपयांपासून तुम्हाला मिळू शकतात. यामध्येदेखील अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. पांढरे मोती, पिवळसर मोती, लाल आण पिवळे, पांढरे अशा कॉम्बिनेशन आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बाजारामध्ये अनेक मोत्यांच्या मुंडावळ्या उपलब्ध होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपाळावर अत्यंत परफेक्ट या मुंडावळ्या बसत असल्यामुळे आणि तुमच्या पेहरावाला साजेशा मिळत असल्यामुळे याला अधिक मागणी आहे. तुमच्या लग्नाच्या कपड्यांना मॅचिंग अशाही तुम्ही या मुंडावळ्या घेऊ शकता. 
इथे करा खरेदी – Anuradha Art Jewellery 
किंमत – 425/-

ADVERTISEMENT

लग्नाचे बाशिंग (लग्न बाशिंग) bashing mundavalya 

mundavalya designs in marathi
bashing mundavalya – Instagram

मराठीमध्ये बाशिंग (bashing meaning in marathi) हा शब्द माहीत नाही, असा माणून सापडणे कठीण आहे. यावरून अनेक वाक्प्रचार आणि म्हणीदेखील आहे. महाराष्ट्रीयन लग्नामध्ये काही घरांमध्ये रितीनुसार लग्न बाशिंग बांधले जाते. हे नेहमीच्या मुंडावळ्यांपेक्षा थोडे वेगळे असते. सहसा मराठवाडा, विदर्भ, देशावरील भागामध्ये बाशिंग बांधलेले पाहायला मिळते. यामध्येदेखील आता विविधता दिसून येते. बाशिंगचेही वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतात. मात्र डिझाईनर साडीवर हे उठावदार दिसत नाही. तुम्ही नऊवारी साडी अथवा पारंपरिक पिवळ्या साडीमध्ये लग्न करणार असाल तर हे तुम्हाला दिसायलाही अधिक आकर्षक आणि उठावदार दिसते. नथीचा ठसका आणि बाशिंग हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. बाशिंग मुंडावळ्या (Bashing Mundavalya) तुम्हाला अनेक ठिकाणी दिसून येतील. तर काही ठिकाणी सोन्याच बाशिंगही दिसून येते. 
इथे करा खरेदी – Amazon 
किंमत – 301/-

गोल्ड फिनिश मुंडावळ्या (Gold Finish) 

बऱ्याच महिलांना सोन्याच्या दागिन्यांची खूपच हौस असते. त्याचप्रमाणे लग्नातही सोन्याचे फिनिशिंग असणाऱ्या मुंडावळ्या असाव्यात असेही अनेकांना वाटते. 250 पासून ते अगदी तुम्हाला हव्या त्या किमतीपर्यंत बाजारामध्ये सोन्याचे फिनिशिंग असणाऱ्या मुंडावळ्या मिळतात. अगदी 1 ग्रॅम सोनं असणाऱ्या मुंडावळ्यादेखील सोनाराकडून उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्हालाही तुमच्या लग्नात अशा मुंडावळ्या हव्या असतील तर तुम्हाला तुमच्या सोनाराकडून त्या बनवूनही घेता येतात. मात्र या सांभाळून ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर राहाते. मंगळसूत्रांच्या डिझाईन्स अथवा ठुशी डिझाईन्सप्रमाणे तुम्ही तुमच्यासाठी सोन्याच्या मुंडावळ्यांचे डिझाईन्सदेखील बनवून घेऊ शकता. 
इथे करा खरेदी – Amazon 
किंमत – 1185/-

चांदीच्या मुंडावळ्या (Silver mundavalya)

गेल्या 5-6 वर्षात चांदीच्या आणि ऑक्सिडाईज्ड मुंडावळ्यांचाही ट्रेंड चालू झाला आहे. तुम्ही सोन्याच्या मुंडावळ्यांप्रमाणेच तुमच्या सोनाराकडून चांदीच्या मुंडावळ्याही करून घेऊ शकता. चांदीची जर असणाऱ्या साड्यांवर तुमची जर ऑक्सिडाईज्ड दागिन्यांची फॅशन असेल तर या मुंडावळ्या तुम्हाला अधिक सुंदर दिसतात. मात्र हा ट्रेंड तितकासा अजून दिसून येत नाही. काही लग्नांमध्ये वेगळेपणा म्हणून नक्कीच पाहिला जात आहे. 
इथे करा खरेदी – aadya.com 
किंमत – 4800/-

वेलचीच्या मुंडावळ्या (Cardamom Mundavlya)

mundavalya designs in marathi
Cardamom Mundavlya

काही ठिकाणी वेलचीच्या मुंडावळ्यादेखील बांधण्यात येतात. मात्र यामागील प्रथा अजून नक्की कळलेली नाही. एक मात्र नक्की की, या मुंडावळ्या वजनाला अत्यंत हलक्या असतात आणि अत्यंत सुगंधीही. त्यामुळे वधू आणि वरांना मुंडावळ्यांचा त्रास होत नाही. पण याची अजून तितकीशी प्रथा नाही. काही गावांमध्ये मात्र याचा वापर करण्यात येतो. शहरांमध्ये सहसा या मुंडावळ्या वापरण्याची पद्धत दिसून येत नाही. पण एखाद्याला या आवडणार असतील तर नक्कीच या मुंडावळ्यांचा वापर करता येऊ शकतो. 

ADVERTISEMENT

डिझाईनर मुंडावळ्या (Designer Mundavalya)

mundavalya designs in marathi
डिझाईनर मुंडावळ्या (Designer Mundavalya)

त्याच त्याच पारंपरिकपणाचा एखाद्याला कंटाळा आला असेल तर बाजारामध्ये अनेक डिझाईनर मुंडावळ्यादेखील उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर या डिझाईनर मुंडावळ्यांमध्ये तुम्ही कस्टमाईज्डदेखील करून घेण्याची उपलब्धता तुम्हाला मिळते. तुमच्या साडीच्या डिझाईन्सनुसार अथवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही या मुंडावळ्या विक्रेत्याकडून बनवून घेऊ शकता. तसंच तुम्ही आधुनिकता आणि पारंपरिकता याचा मेळ घडवूनही याचे डिझाईन स्वतः तयार करून मुंडावळ्या तयार करून घेऊ शकता हे महत्त्वाचे. यासाठी थोडा अधिक खर्च होऊ शकतो. मात्र तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये वेगळेपणा हवा असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय अत्यंत उत्तम आहे. तसंच या मुंडावळ्या तुम्हाला अधिक आकर्षक दिसण्यास आणि लग्नात वेगळं दिसण्यासाठीही मदत करू शकतात. 
इथे करा खरेदी – Anuradha Art Jewellery 
किंमत – Above 250/-

खड्यांच्या मुंडावळ्या (Stone Mundavlya)

अन्य मुंडावळ्यांप्रमाणेच तुम्हाला खड्यांच्या मुंडावळ्यादेखील लग्नात वापरण्यासाठी उपलब्ध असतात. आजकाल बऱ्याच लग्नात खड्याच्या किंवा सेमी प्रेशियस स्टोनच्या फॅन्सी मुंडावळ्याही पाहायला मिळतात. तुम्हाला नियमित मुंडावळ्या नको असतील आणि खड्यांची आवड असेल तर तुम्ही नक्की याचा लाभ घ्या. अनेक ठिकाणी तुम्हाला आवडतील अशा खड्यांच्या स्वरूपात मुंडावळ्या असतात. लग्नात एकदाच मुंडावळ्या घालायच्या असतात हे जरी खरे असले तरीही हौसेला मोल नाही असं म्हणतात. त्यामुळे तुमच्या आवडीनुसारच तुम्ही मुंडावळ्यांची खरेदी करा. 
इथे करा खरेदी – Amazon 
किंमत – 225/-

रूईच्या फुलांच्या मुंडावळ्या (Rui Flower Mundavalya)

mundavalya designs in marathi
Rui Flower Mundavalya

फुलांच्या विविध मुंडावळ्यांबाबत तर आपण जाणून घेतलेच आहे. पण त्यातही अधिक आकर्षक दिसतात त्या रूईच्या फुलांच्या मुंडावळ्या. तुम्ही नवरी म्हणून या फुलांच्या मुंडावळ्या तुमच्या डोक्याला बांधल्यास अधिक सुंदर दिसता. विशेषतः नऊवारी साड्यांवर हे अधिक उठावदार दिसते आणि तुम्हाला वेगळे दिसण्यासही मदत करते. रूईच्या फुलांच्या मुंडावळ्या (haldi mundavalya) हा खास हळदीच्य कार्यक्रमासाठी बांधण्यात येतात. पिवळ्या साडीवर अधिक उठावदार दिसतात. 

मुंबईत दादर आणि गिरगावला गेल्यास तुम्हाला पारंपारिक प्रकारच्या मुंडावळ्या खरेदी करता येतील. ज्यामध्ये मोत्याच्या मुंडावळ्या तुम्हाला प्रामुख्याने खरेदी करता येतील. फुलांच्या मुंडावळ्या खरेदी करण्यासाठीही तुम्ही दादर फुल मार्केट अथवा भुलेश्वर मार्केटमध्ये खरेदी करू शकता. बरेचदा लग्नाच्या हॉलमध्ये संपूर्ण पॅकेजमध्ये फुलांच्या मुंडावळ्याही तुम्हाला दिल्या जातात. त्यामुळे तुम्हाला यापैकी कोणत्या मुंडावळ्या हव्या आहेत आणि तुम्ही कोणती स्टाईल करणार आहात यानुसारच तुम्ही निवड करणे योग्य आहे.  

ADVERTISEMENT
05 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT