ADVERTISEMENT
home / केस
mushroom helps in reducing hair fall in marathi

मशरूमची भाजी खाण्याने होईल केस गळणे कमी, ट्राय करा हा उपाय

केस गळणे ही अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, अती सौदर्यप्रसाधनांचा वापर, हेअर स्टाइल आणि वातावरणात होणारे बदल अशी अनेक कारणं केस गळण्याची असू शकतात. धकाधकीच्या जीवनात सतत येणारी चिंता काळची केस गळणं अधिक वाढवते. यासाठी वेळीच केस गळण्यावर योग्य उपाय करायला हवेत. केस गळणे कमी करण्यासाठी केसांवर बाहेरून केल्या जाणाऱ्या उपायांसोबतच आहारात विशेष बदल करणं फायदेशीर ठरतं. कारण तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या आरोग्य, त्वचा आणि केसांवर परिणाम होत असतो. यासाठीच जाणून घ्या केस गळणे रोखण्यासाठी मशरूमची भाजी खाणं कसं ठरेल फायदेशीर

mushroom helps in reducing hair fall in marathi

आयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी (Ayurvedic Hair Care Tips In Marathi)

मशरूम केसांसाठी आहे पोषक

आपल्या आहारात असे अनेक पदार्थ असतात ज्यांचा आपल्या शरीरावर आणि त्वचा, केसांवर चांगला परिणाम होत असतो. मशरूम भाजी ही अशी एक पोषक भाजी आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांना उत्तम पोषण मिळते. मशरूमच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, अॅंटि ऑक्सिडंड, व्हिटॅमिन डी असतं. ज्यामुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते. केस घनदाट करण्यासाठी पोटॅशिअमची शरीराला खूप गरज असते.  यामुळे केस नैसर्गिक पद्धतीने चमकदार होतात. कारण मशरूम खाण्यामुळे  तुमच्या शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो आणि त्वचा आणि केसांना योग्य प्रमाणात ऑस्किजन मिळते.  

केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)

ADVERTISEMENT

आठवड्यातून दोनदा खावी मशरूमची भाजी

केस आणि त्वचेचं पोषण करण्यासाठी मशरूम तुम्ही आठवड्यातून दोनदा नक्कीच खाऊ शकता. मात्र लक्षात ठेवा दररोज मशरूम खाऊ नका. कारण मशरूम पचनास जड असतात. त्यामुळे मशरूम खाण्यामुळे तुम्हाला पोट जड होणे, गॅसेस, अॅसिडिटी, अपचनाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही अंग मेहनतीचे काम अथवा नियमित व्यायाम करत असाल तर तुम्ही दररोज मशरूम खाऊ शकता. पण जर तुमची जीवनशैली बैठी असेल तर मात्र तुम्ही आठवड्यातून दोनदाच मशरूम खायला हवेत. 

केसांचे आरोग्य राखण्यासाठी ट्राय करा हे सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate Free Shampoo)

23 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT