जरा काही झालं की आपण नक्कीच लगेच डॉक्टरकडे पळत नाही. त्यासाठी आपण घरात पेनकिलर्स घेतो. आपल्यालाही आता सरावाने काही औषधं माहीत असतात. त्यामुळे बऱ्याचदा आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर्स घेत असतो. पण पेनकिलर्सच्या गोळ्या सतत घेणं नक्कीच योग्य नाही. त्याचा शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा पेनकिलर्स घेण्याच्या सवयीमुळे किडनी निकामी झालेल्या केसही पाहायला मिळतात. पण असं असलं तरीही आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला काही नैसर्गिक पेनकिलर्स सापडतील ज्यामुळे तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज भासणार नाही. पण आता नक्की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही स्वयंपाकघरातून घेऊन नैसर्गिक पेनकिलर्स म्हणून वापर करू शकता ते आपण या लेखातून पाहूया. खरं तर त्याचा कसा आणि उपयोग करता येईल आणि त्याचा काय फायदा आहे तेदेखील आपण जाणून घेऊया. कोणत्याही पेनकिलर्सच्या गोळ्या खाण्यापेक्षा तुमच्या शारीरिक दुखण्यावर घरातील नैसर्गिक पेनकिलर्स नक्कीच अधिक फायदेशीर ठरतात.
अशा कोणत्या स्वयंपाकघरातील नैसर्गिक पेनकिलर्स आहेत ज्या आपल्याला दुखण्यातून सावरू शकतात आणि त्याचा काय फायदा आहे ते आपण पाहूया.
हळद (Turmeric)
Shutterstock
हळदीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि करक्युमिन नावाचे तत्व जमख भरण्यासाठी आणि बऱ्याच त्रासातून सुटका मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे आपल्या रोजच्या वापरात हळदीचा समावेश करून घ्या. तसंच हळदीने आपली रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढते. नियमित हळदीचे सेवन केल्यास, बऱ्याच आजारांपासूनही दूर राहण्यासाठी याचा उपयोग होतो.
फायदे आणि वापर
- हळदीची पावडर तुम्ही तूपामध्ये घाला आणि यात थोडीशी साखर घालून अथवा साखर नाही घातली गूळ घातला तरीही चालेल. हे वाटण तुम्ही काही दिवस खाल्ले तर ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांना याचा फायदा होतो. मधुमेह कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. (साखर मधुमेहासाठी योग्य नाही पण तरीही अगदी कमी प्रमाणात या मिश्रणात घातली तरीही चालते)
- गळ्यामध्ये सूज आली असेल अथवा घसा खवखवत असेल तर हळद पावडर आल्याबरोबर मिक्स करून त्यात गूळ घाला. हे मिश्रण गरम करा आणि याचं सेवन करा. तुमच्या घशातील घवघव अथवा घसादुखी पटकन थांबवण्यास याची मदत होते. त्यासाठी कोणतीही औषधाची गोळी घ्यायची गरज नाही. हा अत्यंत सोपा आणि उत्तम घरगुती उपाय आहे.
- तूरडाळीमध्ये हळदीचा तुकडा घालून ती शिजवा आणि मग सुकवा. हे सुकल्यानंतर पाण्यात मिसळून सूर्यास्ताच्या आधी तुम्ही दिवसातून दोन वेळा जर डोळ्यांने लावले तर डोळ्यात होणारी जळजळ आणि लालपणा कमी होतो
- हळदीचे तुकडे भाजून रात्री झोपताना लहान लहान तुकडे तोंडात चघळल्यास, खोकला, कफ आणि सर्दी या तिन्हीपासून सुटका मिळते. अगदी तुम्हाला सतत खोकला असेल तरीही हा उपाय त्यावर उत्तम आहे. हळदीने खोकला बरा होतो.
- हळकुंड भाजून त्याचे चूर्ण बनवा. हे चूर्ण साधारण तीन ग्रॅम कोरफड जेलमध्ये मिसळून सकाळ संध्याकाळ दोन वेळ जर सात दिवस सतत तुम्ही घेतलं तर तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास निघून जातो. तुम्हाला इतर कोणत्याही पेनकिलर्स अथवा औषधांची गरज भासणार नाही.
लिंबू (Lime)
Shutterstock
लिंबामध्ये नैसर्गिक दुःख निवारणाचे घटक असतात. त्यामुळे त्वरीत आराम मिळतो. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून घेतल्यास ते पाणी प्यायलानेही डोकंदुखी थांबते. अथवा ताप असल्यास, कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करावा आणि दुखत असणाऱ्या ठिकाणी कपडा भिजवून लाऊन ठेवावा. पाच ते सात मिनिट्स असं केल्यास, त्वरीत आराम मिळतो.
फायदे आणि वापर
- लिंबाचा रस थंड पाण्यात मिक्स करून प्यायल्यास, उष्णतेचा त्रास कमी होतो
- एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस काढून घ्या आणि त्यामुध्ये थोडी साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस करून प्यायल्यास, पित्ताचा त्रास त्वरीत कमी होतो आणि अधिक ऊर्जा निर्माण होते आणि तजेलदारपणा येतो.
- एक ग्लास थंड पाण्यात लिंबाचा रस मिसळून रोज सकाळी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसंच कब्जाचा त्रास असल्यास तोदेखील कमी होतो.
- लिंबाच्या रसामध्ये सैंधव घालून नियमित प्यायल्यास, किडनी स्टोन असलेल्यांना त्याचा फायदा होतो. इतर कोणत्याही गोष्टीमुळे किडनी स्टोन पटकन बरा होत नाही. मात्र या उपायाने खडे निघून जाण्यास मदत मिळते. कोणत्याही पेनकिलर्सपेक्षा असा नैसर्गिक पेनकिलर्सचा वापर करून शरीराला अधिक सुरक्षित आणि चांगले ठेवता येते.
आले (Ginger)
Shutterstock
अँटीइन्फ्लेमेरी घटकांनी युक्त असणाऱ्या आल्यामुळे पोटदुखी आणि पोटासंबंधित विकार दूर होण्यासाठी मदत होते. पोट दुखल्यावर कोणतीही पेनकिलर गोळी खाण्यापेक्षा आल्यामुळे पटकन बरे वाटते आणि त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. शरीराला हानी पोहचत नाही.
फायदे आणि वापर
- आल्याचा रस आणि मध एकत्र करून हे चाटण तुम्ही चाखा यामुळे घसा बसला असल्यास, बरा होतो आणि आवाजही चांगला होतो
- आल्याचा आणि कांद्याचा रस एकत्र करून खाल्ल्यास उलटी होणे बंद होते
- 4 ग्रॅम सुंठ घ्या आणि त्यात पाणी घाला हे मिश्रण तुम्ही प्यायल्यास, हिरड्यांची सूज कमी होऊन दातदुखीही कमी होते
जंत झाले असल्यास, आलं कुटून पाण्यातून उकळून घ्या आणि हे पाणी तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायल्यास, तुमचा त्रास कमी होतो. त्याचा तुम्हाला त्वरीत फायदा मिळतो
आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी वरदान आहे आलं (Health Benefits Of Ginger In Marathi)
हिंग (Asafoetida)
Shutterstock
यामध्ये इन्फ्लेमेटरी ऑक्सिडंट्स असतात जे पोटदुखी, उलटी, गॅस, अपचनसारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. पोटात दुखल्यास, तुम्ही हिंगाचं पाणी बेंबीच्या आसपास लावल्यास, पोटदुखी आणि गॅसपासून सुटका मिळवू शकता. अगदी लहान बाळासाठीदेखील हा उपाय उपयुक्त असतो. त्यामुळे मोठ्या व्यक्तींना खरंच अशा वेळी कोणत्याही पेनकिलर्सची आवश्यकता नाही. जाणून घ्या हिंगाचे फायदे आणि वापर.
फायदे आणि वापर
- थोड्याशा दारूमध्ये हिंग घालून सुकवा. यामध्ये अगदी थोडा मस्का मिक्स करून हे मिश्रण चाटल्यास, तुमचा खोकला बंद होतो आणि तुम्हाला जर श्वास घ्यायला त्रास होत असेल अथवा अत्यंत दूषित कफ विकार असल्यास, त्यासाठीही गुणकारी आहे
- हिंग, कापूर आणि आंबा याचे समसमान भाग करून पुदीन्याच्या रसात मिक्स करून वाटून घ्या आणि याचे गोळे बनवा. दर चार तासाने ही गोळी बद्धकोष्ठ असणाऱ्यांनी खावी. त्याचा फायदा मिळतो
- हिंग पाण्य्यात उकळून त्या पाण्याने तुम्ही गार्गल करा असं केल्याने तुम्हाला असलेली दातदुखी निघून जाईल आणि तोंडातून येणारा दुर्गंधही कमी होईल. तसंच दातामध्ये कीड लागली असल्यास, हिंग भरल्यास, कीड मरते आणि दातदुखी कमी होते.
मेथी (Fenugreek)
Shutterstock
मेथीदेखील पेनकिलकरचं काम करते. मेथीमध्ये असणारे तत्व हे मधुमेह नियंत्रणात आणण्यास मदत करतात. मेथी ही मधुमेही व्यक्तींसाठी अतिशय गुणकारी असते. मधुमेही व्यक्तींनी कोणत्याही पेनकिलर्स घेण्यापेक्षा आपल्या आहारात मेथीचा समावेश करून घेणं हे योग्य आहे.
फायदे आणि वापर
- पोटात जळजळ झाल्यास मेथीची सुकी पाने आणि मध एकत्र करून काढा बनवा. दिवसातून दोन वेळा हा काढा प्यायल्यास, तुमची पोटातील जळजळ बंद होईल
- सुरकुत्या, ब्लॅकहेड्स, मुरूमं, कोरडेपणा अशा त्वचेच्या समस्या असतील तर तुम्ही मेथीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा आणि साधारण 20 मिनिट्सनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या त्वचेच्या समस्या निघून जातील
- डिलिव्हरीनंतर महिलांना मेथीचा लाडू खाण्यास सांगितले जाते. यामुळे गरोदरपणानंतर शरीर मजबूत राहाते आणि शरीरामध्ये ऊर्जा राहते आणि कमतरता जाणवत नाही. ज्या महिला आपल्या मुलांना दूध पाजतात त्यांच्यासाठी मेथीची पानं ही खूपच फायदेशीर ठरतात. मेथीमुळे कॅल्शियम अधिक मिळतं. तसंच शरीरात दूधही जास्त तयार होतं आणि बाळालाही त्याचा फायदा होतो
मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे
मीठ (Salt)
Shutterstock
मीठ खरं तर जेवणात जास्त खाऊ नये असं म्हणतात. ते खरं आहे. पण मीठाचे अनेक फायदेही आहेत. विशेषतः घसादुखीवर मीठ खूपच चांगले औषध आहे.
फायदे आणि वापर
- गळ्यात खवखव असेल आणि घसा दुखत असेल तर तुम्ही गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करा त्याचा फायदा होतो. घशाची खवखव थांबते
- त्याशिवाय आंघोळ करत असल्यावर त्या पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्यास आलेला थकवा पळून जातो
कॉफी (Coffee)
Shutterstock
कॉफी हा खरं तर एनर्जीचा स्रोत मानला जातो. कॉफीमुळे ऊर्जा मिळते हे खरं असलं तरी काही गोष्टींवर कॉफी औषधासारखे काम करते. विशेषतः डोकं दुखत असल्यास, स्ट्रॉंग कॉफी चांगलीच परिणामकारक ठरते.
फायदे आणि वापर
- कॉफीमधील कॅफेन हे शरीरातील सूज वाढवणाऱ्या रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते
डोकदुखीवरील त्वरीत इलाज - जुलाब होत असल्यास, कोणत्याही पेनकिलर्स घेण्यापेक्षा कोरड्या कॉफीतून जायफळ घालून घेतले अथवा दुधाच्या कॉफीतूनही जायफळ घालून घेतल्यास, तुमचा त्रास त्वरीत थांबतो
चेहरा उजळवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत कॉफीचे आहेत फायदे
पेपरमिंट (Peppermint)
Shutterstock
बहुगुणी पुदिन्याचा (Peppermint) वापर केल्यास असंख्य आजारांतून तुम्हाला झटपट आराम मिळण्यास मदत होते. पुदिन्याला (पेपरमिंट) आयुर्वेदातही विशेष असं महत्त्व आहे. पुदिन्याची पाने आकारानं जरी लहान असली तर त्यातील विविध गुणधर्म आरोग्य आणि सौंदर्यवर्धक अशी आहेत.
फायदे आणि वापर
- तीव्र डोकेदुखीचा त्रास असल्यास पेपरमिंट ऑईलचा वापर करावा. संशोधनानुसार पेपरमिंट ऑईलमुळे डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. या तेलाच्या औषधी गुणांना अॅलोपॅथिक औषधांइतकंच प्रभावी मानलं जातं
- एका विशिष्ट प्रकारच्या संसर्गामुळे नाकाच्या आतील भागाला सूज येते. यामुळे तीव्र स्वरूपात दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो. सायनस आजारापासून सुटका मिळवण्यासाठी पुदिन्याचं तेल फायदेशीर ठरेल. कोमट पाण्यात काही थेंब तेल घेऊन नाकात सोडल्यास श्वास घेताना येणारे अडथळे दूर होतात. ज्यामुळे श्वास घेण्यास पूर्वीच्या तुलनेत कमी त्रोस होतो.
लवंग (Clove)
Shutterstock
लवंग हे तसं बघितलं तर बऱ्याच आजारांवर उपयुक्त ठरते. लवंग नेहमी घरात ठेवावी असंही म्हटलं जातं. केवळ पदार्थांमध्येच नाही तर औषध म्हणून लवंगेचा वापर करता येतो.
फायदे आणि वापर
- डोकं दुखत असल्यास, लवंग दाताखाली धरल्यास, डोकेदुखी कमी होते
- दातातून कळा येत असल्यास अथवा दातामध्ये कीड असल्यास, लवंग अतिशय फायदेशीर ठरते. त्वरीत परिणामासाठी लवंग दाताखाली धरणे हा सोपा उपाय आहे
- सूज आल्यास, लवंगेची वाफ दिली जाते. कोणत्याही पेनकिलर्स गोळ्यांपेक्षा हा उपयुक्त उपाय आहे
दातदुखीसाठी घरगुती उपाय, मिनिटात मिळेल आराम (Tips To Get Rid Of Toothache In Marathi)
चेरी (cherry)
Shutterstock
चेरीमध्ये विटामिन ए, बी, सी आणि बिटा केराटिन, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह ही तत्व जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे चेरी हे नैसर्गिक आणि आरोग्यासाठी खूपच लाभदायक फळ आहे.
फायदे आणि वापर
- चेरीमध्ये 75 टक्के पाणी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. चेरी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे राहाते
- कॅल्शियम आणि विटामिन सी चे प्रमाण अधिक असल्याने हाडांना चांगली मजबूती मिळते
- भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिड्ंटस असल्याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते
- विटामिन ए चं प्रमाण अधिक असल्याने डोळ्यांच्या विकारांवर उत्तम. डोळ्याच्या तेजामध्ये वाढ होण्यास फायदेशीर
सोयाबिन (Soy beans)
Shutterstock
सोयाबीनमध्ये आयसोफ्लेवोन्स नावाचे रयासन आढळते. यामुळे शरीरातील विशेषतः महिलांच्या शरीरातील हाडांची मजबूती चांगली होते. त्यामुळे नियमित याचा जेवणामध्ये समावेश करून घ्यायला हवा.
फायदे आणि वापर
- मानसिक आजारावर अत्यंत प्रभावकारी ठरते. मानसिक आजार असल्यास याचा आहारामध्ये समावेश नक्की करावा
- उच्च रक्तदाब असल्यास, पेनकिलर्स घेण्यापेक्षा सोयाबीन खा. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते
- सोयाबीनपासून बनलेले ताक प्यायल्यास पोटाचे विकार त्वरीत बरे होतात
चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर, आहारात करा सोयाबीन तेलाचा वापर
दही (Plain yogurt)
Shutterstock
दह्यामध्ये प्रथिने, खनिजे आणि जास्त प्रमाणात जीवनसत्वं आढळतात. तसंच दुधाच्या तुलनेत दही हे लवकर पचते. दह्याने शरीराला फायदे मिळतात.
फायदे आणि वापर
- रोज एक वाटी दही खाल्ल्यास अपचनाचा त्रास कमी होतो. त्याशिवाय बद्धकोष्ठता असल्यास, त्रास होणे कमी होते
- दह्यामध्ये विटामिन सी आणि डी असते ज्यामुळे हाडांना आणि दातांना अधिक मजबूती आणि बळकटी मिळते. त्यामुळे दातदुखीचा त्रास बळावत नाही
- तोंड आल्यास, हमखास दह्याने ते बरे होते. त्यासाठी कोणत्याही प्रकारची पेनकिलर्स घेण्याची गरज भासत नाही. दह्याच्या थंडाव्याने पटकन उष्णता जाऊन तोंड बरे होते
प्रशोत्तरे (FAQs)
1. नैसर्गिक पेनकिलर्स वापरून काही नुकसान होते का?
पेनकिलर्सच्या गोळ्या घेण्यापेक्षा कधीही नैसर्गिक पेनकिलर्स घेणे उत्तम. कारण त्याने कोणतेही नुकसान होत नाही आणि मुळात या गोष्टी कशा वापरायच्या आणि किती प्रमाणात त्याचा वापर करायचा हे ठरलेले असते. त्याचे फायदेही नमूद असतात.
2. नैसर्गिक पेनकिलर्समधून नक्की फायदा मिळतो का?
हो नैसर्गिक पेनकिलर्स घेतल्याने नक्कीच फायदा मिळतो. इतकंच नाही तर तुम्हाला उगीचच गोळ्या खाण्याचा त्रासही घ्यावा लागत नाही.
3. औषधांपेक्षा नैसर्गिक पेनकिलर्स जास्त परिणामकारक असतात का?
नैसर्गिक पेनकिलर्सचा परिणाम लगेच होतो. औषधांचा बऱ्याचदा फायदाही होत नाही. पण हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार अवलंबून आहे. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता.
4. सर्वात जास्त परिणामकारक असे नैसर्गिक पेनकिलर्स कोणते?
अशा अनेक नैसर्गिक पेनकिलर्स आहेत ज्या जास्त परिणामकारक आहेत. आजार कोणता आहे त्यावर अवलंबून आहे. कोणत्याही नैसर्गिक पेनकिलर्सची अशी नावं घेता येणार नाहीत.
5. यकृतासाठी हळद नुकसानकारक आहे का?
हळद ही यकृतासाठी अर्थात किडनीसाठी लाभदायक आहे. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा चुकीचा आहे. त्यामुळे अति वापर न करता योग्य प्रमाणात औषध म्हणूनच वापरावी.