अंडाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याविषयी असलेल्या जनजागृतीचा अभाव, उशीराने होणारे निदान आणि उपचारांमुळे हे प्रमाण भारतात वेगाने वाढत आहेत. डॉक्टरांच्या शिफारशीनुसार 35 पेक्षा जास्त महिलांनी सीए-125 रक्त चाचणी आणि ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड करुन घ्यावे. ओटीपोटात दुखणे, सूज येणे किंवा वारंवार लघवी होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळा. कर्करोगाचे लवकरात लवकर निदान होणे हे रुग्णांमधील मृत्यूचा दर कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
अधिक वाचा – स्तनाच्या कर्करोगाशी लढण्यासाठी ब्रेस्ट कन्झर्विंग शस्त्रक्रिया पर्याय
सामान्यपणे आढळू लागला आहे हा कर्करोग
अंडाशयाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये तिसरा सर्वात सामान्यपणे आढळणारा कर्करोग आहे आणि सामान्यतः 55-64 वयोगटात हा कर्करोग दिसून येतो. हा जगातील 8 वा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि भारतात सर्व कर्करोगाच्या मृत्यूंपैकी 3.34% मृत्यू हे अंडाशयाच्या कर्करोगामुळे होतात. भारतातील प्रत्येक 1,00,000 महिलांमध्ये 0.9-8.4 च्या घटना या अंडाशयाच्या कर्करोगाचे आढळून येतात. अंडाशयाचा कर्करोग म्हणजे एक घातक ट्यूमर, किंवा स्त्रीचे अंडाशय, आणि ओटीपोटाच्या अवयवांमध्ये आणि एखाद्याच्या उदर आणि फुफ्फुसातदेखील पसरतो. त्याचे जोखीम घटक म्हणजे गर्भधारणा न होणे, कमी वयात मासिक पाळी सुरू होणे, उशीरा होणारी रजोनिवृत्ती, पहिल्या गर्भधारणेचे उशीरा वय 35 वर्षांपेक्षा जास्त असणे, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, तंबाखू, धूम्रपान आणि कौटुंबिक इतिहास इत्यादी आहेत.
अधिक वाचा – जाणून घ्या रक्ताचा कर्करोग, लक्षणे (Symptoms Of Blood Cancer In Marathi)
निदान होते शेवटच्या टप्प्यात
पुण्यातील अपोलो क्लिनीकच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. दीप्ती कुर्मी म्हणाल्या की, बहुतेक प्रकरणांचे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा शेवटच्या टप्प्यात होते आणि त्यामध्ये जगण्याचा दर 28% (5 वर्षांमध्ये) असतो. सुरूवातीच्या टप्प्यातील केवळ 15% प्रकरणांचे निदान करण्यात येत आहे. वेळेवर महिला उपचारासाठी येत नसल्याने निदानास उशीर झाल्यास उपचार करणं अवघडं होतं. अंडाशयाच्या कर्करोगाचं वेळीच निदान झाल्यास रूग्णाचा जीव वाचवणे शक्य होते. जगण्याचा दर हा 94% आहे.
तर पुण्यातील अपोलो डायग्नोस्टिक, सल्लागार पॅथॉलॉजिस्ट डॉ. कीर्ती प्रकाश कोटला म्हणाले की, अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी निश्चित तपासणी तंत्र नाही. एक नियमित तपासणी ज्यात ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड (TVUS) आणि सीए 125 रक्त चाचणी समाविष्ट आहे. या तपासणीद्वारे कर्करोगाचे निदान करता येते. ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंडची निवड करून, त्यातील ध्वनी लहरी गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशय तपासण्यास मदत करतात. अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी आणि बायोप्सीसह पेल्विक परीक्षा देखील उपयुक्त ठरू शकते. अचानक वजन कमी होणं, थकवा येणं आणि आतड्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होणं, अशी लक्षणं दिल्यास तातडीने सीए 125 सारख्या रक्त चाचण्या करून घ्याव्यात. कारण, अंडाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार करणं शक्य आहे.
अंडाशयाच्या कर्करोगाचा उपचार हा कर्करोगाचा टप्पा, ट्यूमरचा आकार आणि स्थानावर अवलंबून असेल आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये तो भिन्न असू शकतो. अंडाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी, दररोज व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा आणि स्तनदा मातांनी बाळाला स्तनपान करा. वेळीच तुम्ही आपल्या शरीराची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे वेळीच या सगळ्याची तपासणी होणे आणि आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
अधिक वाचा –तोंडाचा कर्करोग लक्षणे व उपाय (Mouth Cancer Symptoms In Marathi)
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक