प्रेम… या जगातली सर्वात सुंदर गोष्ट. इतिहासात आजवर ज्यांनी ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलंसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो किंवा हीर रांझा, रोमिओ ज्युलिएट असोत किंवा सोनी महिवाल.. प्रेम ही जगातली एक सुंदर भाषा आहे. ज्याने ही भाषा शिकली त्यालाच ती उमगते आणि एका नवीन, स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. असंच एक अस्सल मराठमोळं प्रेमी युगुल आहे मल्हार मायडी. ही जोडी इभ्रत नावाच्या प्रेमकथेतून रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. डॉल्फिन सिनेक्राफ्ट या बॅनरखाली श्रुती वसंत दांडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण रमेश क्षीरसागर यांनी इभ्रतच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा असे प्रमुख कलाकार दिसणार आहेत.
(वाचा : अर्जुन कपूरनंच गर्लफ्रेंड मलायका अरोराला केलं ट्रोल, म्हणाला…)
या चित्रपटाला बबन अडगळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिलं असून चित्रपटाचे डीओपी भारत पार्थसारथी असणार आहेत. इभ्रतची कथा अण्णाभाऊ साठे यांची आहे. तर तिकीटबारीवर तुफान गाजलेल्या रेडू आणि टकाटक या चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांनी ‘इभ्रत’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या चित्रपटाला सुबोध नारकर यांनी संकलित केलं असून अनिल वाथ यांनी या चित्रपटाचं कला दिग्दर्शन केलं आहे. नरेंद्र पंडीत यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तरल आणि प्रेमाची गोष्ट सांगणारा इभ्रत 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
(वाचा :‘बह्मास्त्र’च्या सेटवरील आलिया-रणबीरचा ‘हा’ फोटो व्हायरल)
हळव्या प्रेमाचा ‘रॉमकॉम’
दरम्यान, मराठी चित्रपटांची प्रेक्षकांसाठी चांगलीच मेजवानी आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हळव्या प्रेमाची गोष्ट सांगणारा रॉम कॉम हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. नात्याची हळुवार कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एक मुलगा आणि मुलगी यांच्यात फुलत जाणारं प्रेमाचं नातं अशी या चित्रपटाची हलकी फुलकी कथा आहे. रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
(वाचा : रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर दिसणार या ‘सुपरहिरो’च्या भूमिकेत)
27 डिसेंबर प्रदर्शित होणार सिनेमा
ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्मस् यांनी रॉमकॉम या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते, सुशील शर्मा सहनिर्माते आहेत. संदीप बाळकृष्ण बांगर, सुनील दिगंबर वाळुंज फिल्म प्रस्तुत करणार आहेत. गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवांजन फिल्म्स हे डिस्ट्रिब्युटर्स आहेत. चित्रपटात विजय गिते आणि मधुरा वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, छाया कदम, अंतरा पाटील, श्वेता नाईक, स्वाती पानसरे, फकिरा वाघ,दिलीप वाघ,शोभा दांडगे, सिद्धेश्वरा, हरी कोकरे, शाम भालेराव आणि असित रेडीज अशी दमदार स्टारकास्ट आहे. राॅमकाॅम येत्या 27 डिसेंबरला पुन्हां एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालेला आहे.
हे देखील वाचा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.