ADVERTISEMENT
home / Acne
मेडिफेशियल’ आहे तुमच्या चेहऱ्यासाठी आहे फायदेशीर, नक्की ट्राय करा

मेडिफेशियल’ आहे तुमच्या चेहऱ्यासाठी आहे फायदेशीर, नक्की ट्राय करा

स्वच्छ, नितळ त्वचा सगळ्यांनाच हवी असते. चांगली त्वचा मिळवण्यासाठी आपण सगळेच बरेच प्रयोग करतो . महिन्यातून एकदा फेशिअल करतो. आठवड्यातून एकदा स्क्रब करतो. रोज दिवसातून दोन वेळा तरी फेसवॉस करतो. ही काळजी घेऊनही जर तुमच्या  त्वचेवर फरक पडत नसेल तर तुम्हाला एक्सपर्टची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या स्किनट्रिटमेंटची माहिती देणार आहोत ती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवर कोणताही दुष्परीणाम होणार नाही. तर तुम्हाला त्यामुळे नितळ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा अगदी हमखास मिळेल. एक्सपर्ट्सच्या निदर्शनाखाली ही ट्रिटमेंट तुम्हाला दिली जाते. त्याला ‘मेडिफेशियल’ असे म्हटले जाते. त्वचेसाठी मेडिफेशियल करणे किती फायदेशीर आहे ते आज आपण जाणून घेऊया.

सणासुदीसाठी असे करा झटपट फेशियल आणि मिळवा ग्लो

मेडिफेशियल म्हणजे काय?

असे केले जाते मेडिफेशियल

Instagram

ADVERTISEMENT

फेशियलप्रमाणेच मेडिफेशियल केले जाते. याची प्रक्रियाही साधारणपणे सारखीच असते. पण यामध्ये तुमच्या चेहऱ्याला कोणतीही दुखापत केली जात नाही. म्हणजे फेशियल प्रमाणे फक्त ब्लॅक हेड्स काढून तुमचा चेहरा स्वच्छ करणे हे उद्दिष्टय नसते. तर तुमच्या चेहऱ्याच्या आतपर्यंत जाऊन तुमची त्वचा स्वच्छ करणे हा या मागचा उद्देश्य असतो. त्यामुळे तुम्हाला मशीनच्या साहाय्याने मसाज केला जातो. शिवाय यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारानुसार तुमच्यावर मशीनचा प्रयोग केला जातो. आता मशीनचा प्रयोग म्हणजे घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. या मशीनचा वापर केल्यामुळे तुम्हाला अधिक आरामही मिळतो. इतर कोणत्याही पार्लर फेशियलप्रमाणे यामध्येही वेगवेगळे प्रकार असतात. ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करु शकता.

फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट ‘Skin treatments’

असे केले जाते मेडिफेशियल

मेडिफेशियल असे केले जाते

Instagram

ADVERTISEMENT

जर तुम्ही एखाद्या खास समारंभासाठी तयार होण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला मेडिफेशियल करायचे असेल तर सगळ्यात आधी ज्या क्लिनिकची तुम्ही निवड करता तिथे तुम्ही कधीही ट्रिटमेंट घेतली नसेल तर तुमची त्वचा आणि त्याचा प्रकार आणि तुम्ही गरज डॉक्टरांना जाणून घेणे गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या त्वचेचा प्रकार आधी पाहिला जातो.

  • तुमच्या त्वचेनुसार तुम्ही फेशियल निवडल्यानंतर तुम्हाला फेशियल रुममध्ये नेले जाते. जिथे तुम्हाला काही खास कपडे दिले जातात.
  • सगळ्यात आधी तुमचा चेहरा क्लिन्झ आणि स्क्रब केला जातो. अत्यंत हलक्या हाताने हे स्क्रब केले जाते.
  • त्यानंतर तुम्ही निवडलेल्या ट्रिटमेंटच्या मशीन वापरल्या जातात. उदा. पिंपल्स, अँटी एजिंग, ग्लो अशा वेगवेगळ्या मशीन चा वापर केला जातो.
  • तुमच्या चेहऱ्याला रिलॅक्स करण्याचे काम केले जाते.
  • सगळ्यात शेवटी यामध्ये तुमच्या  चेहऱ्याला फेसपॅक लावला जातो. या सगळ्या गोष्टी अत्यंत शांतपणे केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला साधारण 1 तास अगदी सहज लागतो.
  • या मेडिफेशियलचा खर्च साधारणपणे 2 हजाराच्या पुढे असतो.

आता जर तुम्ही फेशियल करण्याचा विचार करत असाल तर या मेडिफेशियलचा विचार नक्की करा.

चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय, करा हे घरगुती उपाय (Home Remedies For Acne Scars In Marathi)

03 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT