थंडी असो किंवा नको… साधारण नोव्हेंबर महिना सुरु झाला की, बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे विंटर जॅकेट्स दिसू लागतात. फार थंडी नसली तरी हे विंटर जॅकेट प्रत्येकालाच त्याच्या वॉर्डरोबमध्ये असावे असे वाटतात. यंदा तुम्हीही विंटर जॅकेट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला विंटर जॅकेट्समधील नवे ट्रेंड्स माहीत हवेत. आज जाणून घेऊया विंटर जॅकेट्सच्या या ट्रेंडविषयी
विंटर जॅकेट्सची अशी करा स्टाईल
तुमच्यासाठी पॉकेट फ्रेंडली जॅकेट
विंटर जॅकेटचे हे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का? (Types Of Winter Jackets)
विंटर जकेट्सध्येही वेग वेगळे प्रकार आहेत. तुम्हाला फॅशनेबल राहायचे असेल तर तुम्हाला या विंटर जकेट्सचे प्रकार माहीत हवेत. हे प्रकार कळल्यानंतर तुम्हाला कोणते विंटर जॅकेट तुमच्यासाठी निवडायचे हे कळेल.
क्रॉप पफर जॅकेट (Crop Puffer Jacket)
credits: Instagram
थंडीमध्ये सर्वात ट्रेंडी असे हे पफर जॅकेट खूप आरामदायक आणि उबदार आहे. पूर्वी स्कीइंगसाठी वापरले जाणारे हे जॅकेट आता जिथे खूप कडाक्याची थंडी असते अशा ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरते. या थंडीमध्ये तुमचे नेहमीचे काळे जॅकेट आणि लोकप्रिय होत चाललेली रंगीत जॅकेट आलटून पालटून घालत राहा. काळ्या रंगाची जॅकेट्स ही केव्हाही उत्तमच असतात आणि अशी जॅकेट्स थोडा घरगुती आणि औपचारिक लुक देतात तर इतर सर्व ठिकाणी रंगीत जॅकेट घालता येतात.
Bralette म्हणजे काय माहीत आहे का? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
फर कोट्स (Fur Coats)
credits:Instagram
तुम्हाला थोडे रिच विंटर जॅकेट हवे असेल तर तुम्ही फर जॅकेट्सची निवड करु शकता. फर जॅकेट्स तुम्हाला रोजच्या रोज घालता येऊ शकत नाही. कारण या जॅकेट्सवर जरासे पाणी पडले तरी देखील हे जॅकेट लगेच ओले होतात. पण असे असले तरी हे जॅकेट दिसायला फारच सुंदर दिसते. त्यामुळे तुम्ही एखादे फर कोट्स वापरुन पाहायला काहीच हरकत नाही. यामध्येही तुम्हाला वेगवेगळे प्रकार,रंग मिळू शकतील. असे जॅकेट तुम्हाला थोडे पार्टी लुक देतात.
डेनिम जॅकेट (Denim Jacket)
credits: Instagram
जीन्समध्ये येणारे जॅकेट्स वर्षभरही वापरता येतात. पण जर तुमच्याकडे अशा प्रकारचे जॅकेट वॉर्डरोबमध्ये नसेल तर मग तुम्ही डेनिम जॅकेट्स नक्कीच वापरुन पाहायला हवे. हे जॅकेट पॉकेट फ्रेंडली तर असतात. शिवाय यांना मेनटेन करण्याचा फार व्याप नसतो. ऑफिसपासून ते एखाद्या पिकनिकपर्यंत अगदी कोणत्याही कपड्यांच्या प्रकारावर हे जॅकेट अगदी हमखास घालता येतात. त्यामुळे तुम्ही जर काहीतरी जास्त वेळ टिकेल आणि चांगले दिसेल असे जॅकेट निवडत असाल तर तुम्ही डेनिम जॅकेट वापरायला काहीच हरकत नाही.
वाचा – श्रगसोबत अशी करा स्टाईल
शॉर्ट टेडी जॅकेट (Short Teddy Jacket)
credits:Instagram
आता नावावरुनच तुम्हाला कळलं असेल की, हे जॅकेट टेडीसारखे गुबगुबीत असणार. हे जॅकेट पूर्णपणे कापडाचे असते. उबदार असल्यामुळे हे जॅकेट अनेकांना आवडते. यात सुंदर रंग सुद्धा मिळतात. तुम्हाला थंडीपासून स्वत:चे संरक्षण करताना स्टायलिश दिसायचे असेल तर मग तुम्ही शॉर्ट टेडी जकेट नक्कीच घालून पाहू शकता. अशा प्रकारचे जॅकेट्स जास्तीत जास्त कॅज्युअल वेअरवर तुम्हाला घालता येऊ शकतात. या मध्येच तुम्हाला लांब जॅकेटसुद्धा मिळतात.
रॅप कोट्स (Wrap Coat)
credits: Instagram
जर तुम्हाला ऑफिससाठी काहीतरी वेगळे घालायचे असेल जे तुमच्या फॉर्मल ड्रेसवरही चांगले दिसतील. तर तुम्ही रॅप कोट्स नक्कीच वापरुन पाहायला हवे. रॅप कोट्स कॉटन, सॉफ्ट लेदर, सूट मटेरिअलमध्ये देखील मिळतात. हे थोडे जाड असल्यामुळे तुम्हाला थंडी तर वाजत नाहीत. पण हे जॅकेट एकदम स्टायलिश दिसता. लांब असल्यामुळे तुम्हाला यामध्ये फॉर्मल ड्रेस किंवा पँटस असे घालता येते.
वाचा – स्वेटर आणि स्वेटशर्ट दरम्यान फरक
वेलवेट जॅकेट (Velvet Jacket)
credits: Instagram
पार्टीसाठी वेलवेट जॅकेट हे एकदम बेस्ट आहेत. वायब्रंट रंगामध्ये मिळणारे वेलवेट जॅकेट तुमच्या वॉर्डरोबमधील फार जागा घेत नाही. ( तुम्ही कोणत्या प्रकारचे वेलवेट निवडता त्या नुसार) सॉफ्ट मटेरिअलमधील वेलवेट दिसायला फारच सुंदर दिसते. तुमच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी वेलवेट जॅकेट हे असायलाच हवे. तुम्हाला ऑफिससाठी ही अशाप्रकारचे जॅकेट वापरता येऊ शकते.
बॉम्बर जॅकेट (Bomber Jacket)
credits: Instagram
सध्या या प्रकारात मिळणाऱ्या पातळ जॅकेटची फारच चलती आहे. हे जॅकेट् फारच कॅज्युअल असतात. तुम्हाला यामध्ये क्रॉप आणि लाँग असे दोन्ही प्रकार मिळू शकतील. बॉम्बर जॅकेट पातळ किंवा जाड असले तरी ते कोणत्याही फॉर्मल वेअरवर तुम्हाला घालता येत नाही. कारण अनेकदा यांचे रंग फार वायब्रंट असतात. अशा प्रकारचे जॅकेट तुम्हाला छान पार्टीसाठी घालता येतील. जाड प्रकारातील जॅकेट तुम्ही अगदी बिनधास्त ट्रेकला घालू शकता.
वाचा – बूटांची स्टाईल करुन दिसा हटके.. तुम्ही ट्राय केलेत का हे प्रकार
विंटर जॅकेट्सची अशी करा स्टाईल (Winter Jackets Style Tips)
आता इतके सगळे विंटर जॅकेट पाहिल्यानंतर तुम्हाला स्टायलिंग संदर्भात प्रश्न पडला असेल तर तुम्हाला या स्टायलिंग टिप्स नक्कीच कामी येतील.
1. जॅकेटची फिटींग (Jacket Fitting)
जॅकेट हे कधीही टाईट घेऊ नका. कारण जर तुम्हाला जॅकेट जास्त वेळ घालायचे असेल तर तुम्हाला ते थोडे सैल म्हणजे कम्फर्टेबल फिटींगसारखे निवडायचे आहे.तरच ते जॅकेट तुम्हाला चांगले दिसतील.
2. रंगाची निवड (Color Selection)
फॉर्मल कपड्यांवर कधीच फॅन्सी किंवा गडद रंगाचे जॅकेट निवडू शकता. कारण ते चांगले दिसत नाहीत. गडद रंग अजिबात चांगला दिसत नाही. त्यामुळे तुम्ही रंगाची निवड करताना थोडा विचार करा.
3. जॅकेटची निवड (Jacket Selecion)
जर तुम्हाला कॅज्युअल लुकसाठी जॅकेट हवे असेल तर तुम्ही पफर किंवा बॉम्बर जॅकेट निवडू शकता. तुम्हाला तुमच्या कामाच्या स्वरुपानुसारही जॅकेटची निवड करणे फार महत्वाचे असते.
4. अॅसेसरीज करा कमी (Use Less Accessories)
जॅकेट घातल्यानंतर तुम्हाला फार काही अॅसेसरीज घालायची गरज नसते. कारण जॅकेटवर कधीच अॅसेसरीज चांगल्या दिसत नाही. त्यामुळे तुम्ही कमीत कमी अॅसेसरीज घाला.
5. कशावर घालता येतील जॅकेट (Jacket According To Dress Type)
जर तुम्ही लाँग जॅकेट घालणार असाल तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये ड्रेस किंवा टाईड पँटस घालता येतील . जर तुम्ही शॉर्ट जॅकेट घालणार असाल तर तुम्हाला ते शॉर्ट स्कर्ट किंवा पँटवर घालता येतील.
तुमच्यासाठी पॉकेट फ्रेंडली जॅकेट (Trendy Winter Jackets In Marathi)
आता तुम्ही जर पॉकेट फ्रेंडली जॅकेट पाहणार असाल तर तुम्ही या काही जॅकेट्सची निवड नक्कीच करु शकता.
1. Floral Print Hooded Pockets Vintage Oversize Coats
माहिती: जर तुम्हाला लांब आणि कलरफुल जॅकेट हवे असेल तर तुम्ही हे जॅकेट नक्कीच निवडू शकता.
किंमत: Rs 1499. इथे करा खरेदी.
2. Athena Women White Solid Cropped Denim Jacket
माहिती: डेनिम या प्रकारात मिळणारे हे जॅकेट तुम्हाला फॉर्मल किंवा अन्य कोणत्याही वेअरवर घालता येऊ शकते. त्यामुळे तुम्ही याचा वापर करु शकता
किंमत: Rs 1099. इथे करा खरेदी.
3. Cazibe Women’s Quilted Jacket
माहिती: पफर प्रकारातील जॅकेट तुम्हाला हायकींग किंवा ट्रेकिंगच्यावेळी वापरता येईल यात तुम्हाला थंडी वाजणार नाही.
किंमत: Rs 1299. इथे करा खरेदी.
4. Double-Breasted Trench Coat With Belt
माहिती: तुम्हाला फॉर्मलवेअरवर काहीतरी घालायचे असेल तर तुम्ही अशाप्रकारचे जॅकेट निवडू शकता.
किंमत: Rs 2499. इथे करा खरेदी.
वाचा – ओव्हरसाईज टी-शर्टने असा करा स्टायलिश लुक
5. Women Navy Blue Solid Velvet Finish Tail
माहिती: तुम्हाला पार्टीवेअर काहीतरी हवे असेल तर तुम्ही अशाप्रकारचे जॅकेट घेऊ शकता.
किंमत: Rs 3149. इथे करा खरेदी
6. Full Sleeve Solid Women Jacket
माहिती: पफर जॅकेटमध्ये तुम्ही काही वेगळा पर्याय बघत असाल तर तुम्हाला हे जॅकेट घ्यायला हरकत नाही. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे पर्यायही मिळतील.
किंमत: Rs 1034. इथे करा खरेदी.
7. Full Sleeve Solid Women Jacket
माहिती: जर तुम्ही लाँग जॅकेट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे जॅकेट नक्कीच घेता येईल.
किंमत: Rs 1980. इथे करा खरेदी.
8. Sleeveless Solid Women Jacket
माहिती: जर तुम्हाला स्लिव्हलेसमधील काही पर्याय हवा असेल तर तुम्ही अशाप्रकारचे जॅकेटसुद्धा नक्की ट्राय करु शकता.
किंमत: Rs 945. इथे करा खरेदी.
9. Full Sleeve Printed Women Jacket
माहिती: फुल स्लिव्हजमधील हा आणखी एक पर्याय असून यामध्ये मागे हूड ही देण्यात आले आहे.
किंमत: Rs 1799. इथे करा खरेदी.
10.Full Sleeve Striped Women’s Jacket
माहिती: पातळ पण काहीतरी उबदार काहीतरी हवे असेल तर तुम्ही असे फ्रेश रंग निवडू शकता.
किंमत: Rs 841. इथे करा खरेदी.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
थंडीसाठी बेस्ट कोट कोणता?
तुम्ही कुठे राहता ? तुमच्या येथे थंडी किती असते ? या सगळ्याचा विचार करुन तुम्ही थंडीसाठी जॅकेटची निवड करायला हवी. जर तुम्ही अशा ठिकाणी राहता जेथे थंडी फार कमी आहे तर तुम्हाला डेनिम जॅकेट घ्यायला हरकत नाही. ज्या ठिकाणी बर्फ असेल अशांनी लेदर किंवा पफर मटेरिअलमध्ये जॅकेट घ्यायला हरकत नाही
बॉम्बर जॅकेटमुळे जाड दिसायला होते का?
बॉम्बर जॅकेट थोडेसे फुगीर असल्यामुळे तुम्हाला थोडे गुबगुबीत असल्यासारखे दिसते. जर तुम्हाला हे जॅकेट घातल्यानंतर जाड असल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही हे विंटर जॅकेट निवडू नका. कारण हे जॅकेट घातल्यानंतर तुम्ही 1 ते 2 साईज मोठे दिसता. त्यापेक्षा तुम्ही उबदार आणि पातळ जॅकेट निवडा. आता यामध्येच तुम्हाला पातळ झीपर जॅकेटही मिळते त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचे बॉम्बर जॅकेट निवडता त्यावरही काही गोष्टी अवलंबून आहे.
पफर जॅकेट पावसात घालता येते का?
काही पफर जॅकेट हे सिंथेटीक मटेरिअलमध्ये असतात. म्हणजे त्याचा आतला भाग हा पाण्यात भिजणारा नसतो. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही करु शकता. पण जर तुमच्या पफर जकेटचा आतला भाग हा वेलवेट किंवा फरसारखा किंवा कपड्याचा असेल तर मात्र तुम्हाला जास्त पावसात असे जॅकेट घालता येणार नाही. त्यामुळे तुमचे पफर जॅकेट नेमके कसे आहे ते तपासून घ्या.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.