ADVERTISEMENT
home / Care
organic harvest

ऑर्गेनिक ब्रँड्स जे तुमच्या किट्समध्ये असायलचा हवेत

नैसर्गिक स्किनकेअर उत्पादने ही नैसर्गिक घटकांपासून बनवली जातात. त्यांच्यात त्वचेसाठी आवश्यक असलेले पोषक घटक असतात. खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल, फळांचे अर्क,पेपरमिंट, शिया बटर इत्यादी नैसर्गिक पदार्थांपासून बनविलेल्या उत्पादनांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात, ते आपल्या त्वचेचे नुकसान करत नाहीत. 

गेली अनेक दशके केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधने व हायजिन प्रॉडक्ट्स  वापरल्यामुळे आपल्या त्वचेवर गंभीर परिणाम झालेत. पण आता मात्र जवळजवळ सर्वांनाच नैसर्गिक गोष्टींचे महत्व पटू लागले आहे. आपल्या शरीरात आणि त्वचेवरही हानिकारक हार्श केमिकल्स न लावण्याची प्रत्येक जण काळजी घेतो. म्हणूनक सर्वच लोक आता ऑरगॅनिक  फळे,भाज्या, धान्ये अगदी अंगाचा साबण , शॅम्पू सुद्धा ऑरगॅनिक असावा याचा आग्रह धरू लागले आहेत. 

एकविसाव्या शतकातील या नवीन दशकात ऑरगॅनिक स्किनकेअर हा नवा ब्युटी ट्रेंड आहे. अर्थात हे ट्रेंडिंग आहे किंवा सेलिब्रिटी त्यांची जाहिरात करत आहेत म्हणून नव्हे, तर ऑरगॅनिक उत्पादने सर्व प्रकारे आपल्यासाठी अधिक चांगली आहेत. त्यामुळे आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले राहते. ते वापरण्यास अगदी सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल देखील असतात. ऑरगॅनिक स्किनकेअर उत्पादने कोणत्याही रासायनिक घटकांशिवाय अगदी नैसर्गिक घटकांपासून बनविली जातात. त्यामध्ये वापरलेले घटक हे सेंद्रिय पद्धतीने तयार केले जातात आणि त्यात जेनेटिकली बदललेले साहित्य, कृत्रिम पदार्थ किंवा रसायने वापरली जात नाहीत. म्हणूनच हे ऑरगॅनिक ब्रॅण्ड्स तुमच्या स्किनकेअर किट मध्ये असायलाच हवेत. 

ऑरगॅनिक हार्वेस्ट ऍक्ने कंट्रोल फेस वॉश 

ADVERTISEMENT

प्रदूषण, ताण, पचनाचे विकार किंवा हॉर्मोनल असुंतलन यामुळे ऍक्ने किंवा पिम्पल्सचा त्रास होत असेल तर तुमच्यासाठी ऑरगॅनिक हार्वेस्टचे ऍक्ने कंट्रोल फेस वॉश अगदी योग्य आहे. यातील नैसर्गिक औषधी घटक मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाशी लढा देतात आणि त्वचा स्वच्छ आणि डागमुक्त करतात. या फेसवॉशमध्ये कडुलिंब व टी ट्री ऑइल असे औषधी घटक आहेत.

सेंट बॉटॅनिका फ्रेश वर्बेना बॉडी वॉश विथ शिया अँड व्हिटॅमिन ई 

 सेंट बॉटॅनिकाचे फ्रेश व्हर्बेना बॉडी वॉश हे शिया आणि व्हिटॅमिन ई सह बनवण्यात आले आहे. यामुळे अंघोळीनंतर तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि तुमची त्वचाही टवटवीत होईल. या बॉडी वॉशमध्ये शिया बटर आणि व्हिटॅमिन ई चे सर्व पोषक घटक आहेत. फ्रेश व्हर्बेना बॉडी वॉशचे त्वचेवर अवशेष उरत नाही. ते  आपल्या त्वचेवरील सर्व धूळ व घाण काढून टाकते. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही तर हायड्रेटेड राहील. याचा मंद सुगंध अंघोळीनंतर अनेक तास दरवळत राहील.

ऑरगॅनिक हार्वेस्ट हॅपी लिप्स

ADVERTISEMENT

ऑरगॅनिक हार्वेस्ट हॅपी लिप्स हे एक प्रमाणित सेंद्रिय उत्पादन आहे. हे वनस्पतीजन्य घटकांपासून बनवले जाते. यामध्ये प्लांट ऑईल्स आहेत जे कोरड्या ओठांचे पोषण आणि मॉइश्चरायझेशन करण्यास मदत करतात.  हे PABA आणि Paraben फ्री लीप बाम ओठांना मऊ आणि हायड्रेटेड ठेवते.

सिरोना अँटी हेअर फॉल शॅम्पू

सिरोना अँटी हेअर फॉल शॅम्पू  पारंपारिक भारतीय औषधी वनस्पतींचा अर्क वापरून तयार केला आहे. यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते.हा सौम्यपणाने परंतु खोलवर स्कॅल्प स्वच्छ करतो. यातील भृंगराज वनस्पतीचा अर्क केस गळती रोखण्यासाठी मुक्त रॅडिकल्सशी लढतो व कडुलिंब केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी केसांची मुळे मजबूत करतो. तसेच तुळशीचा अर्क स्कॅल्पमध्ये रक्ताभिसरण वाढवतो. 

ऑरगॅनिक कुंकुमादी क्रीम 

ADVERTISEMENT

ऑरगॅनिक कुंकुमादी क्रीम हे केशर आणि 4 समृद्ध तेलांपासून एका अद्वितीय फॉर्म्युलेशनसह तयार केले आहे. हे क्रीम त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. त्वचेवरील काळे डाग, मुरुमांचे व्रण, सुरकुत्या आणि पुरळ बरे करण्यासाठी हे क्रीम प्रभावी आहे. तसेच हे त्वचेचा पोत सुधारण्यास देखील मदत करते.

ऑरगॅनिक व्हिटॅमिन सी फेशियल किट 

ऑरगॅनिक हार्वेस्ट व्हिटॅमिन सी फेशियल किट मध्ये तुम्हाला फेस क्लीन्सर, स्क्रब, मसाज जेल, मसाज क्रीम आणि फेस सीरमचे मिळेल. हे किट घेतले की तुम्हाला घरबसल्याच आरामात संपूर्ण  फेशियल करता येईल आणि तुमची त्वचा टवटवीत होईल. ही उत्पादने त्वचेसाठी कोमल आहेत.

ही नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली उत्पादने वापरल्यास त्वचेला पोषण मिळेल आणि साईड इफेक्टची भीती राहणार नाही. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा ह्या ‘5’ स्कीन केअर प्रोडक्ट्सशिवाय अपूर्ण आहे तुमचं ब्युटी रुटीन

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

18 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT