ADVERTISEMENT
home / आरोग्य
प्रोटीन पावडरचे अति सेवन

प्रोटीन पावडरचे सेवन ठरु शकते आरोग्यास हानिकारक

 जीम किंवा वर्कआऊट करणाऱ्यांच्या रुटीनमध्ये काही खास पदार्थांचा समावेश होतो. हेल्दी डाएट हा त्यांच्या रोजच्या रुटीनचा भाग आहे. त्यामध्ये मुख्यत्वाने खूप जण शरीरातील प्रोटीनची (Protein Powder) कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रोटीन पावडरचे सेवन करतात. महिला आणि पुरुष या दोघेही प्रोटीन पावडरचा त्यांच्या डाएटमध्ये समावेश करु शकतात. पण एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा आरोग्यासाठी अनेक बाधा आणू शकतो. तुम्हीही प्रोटीन पावडरचे सेवन सतत करत असाल त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया प्रोटीन पावडरचे हे सेवन आरोग्यासाठी हानिकारक कसे ठरु शकते ते

प्रोटीन पावडर का दिली जाते?

प्रोटीन पावडर ही शरीरातील कमतरता भरुन काढण्यासठी दिली जाते. आपल्या शरीराला काही घटक आवश्यक असतात. आपल्या खाण्यातून हे घटक पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणूनच प्रोटीन पावडरचे सेवन करण्यास सांगितले जाते. प्रोटीन पावडर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळते. त्यामध्ये पाणी अथवा दूध घातले जाते. इतकेच नाही तर काही जण याची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये फळे देखील घालतात. पण प्रोटीन पावडर किती काळासाठी खायला हवी.हे देखील माहीत असायला हवे. कारण कधीतरी शरीराला आवश्यक असलेल्या घटकांची पूर्तता होऊ शकते. त्यानंतरही जर आपण प्रोटीन पावडर खात राहिलो तर त्याचा त्रास आपल्याला होणे अगदीच साहजिक आहे. 

प्रोटीन पावडर आरोग्यास हानिकारक

प्रोटीनचा ग्लास

प्रोटीन पावडर वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असते. त्याचे नेमके कोणते तोटे होतात ते आता जाणून घेऊया 

  1. प्रोटीन पावडरचे सेवन केल्यामुळे त्यात असलेले हार्मोन्स आणि बायोएक्टिव्ह एजंट असतात. ज्याच्या अति सेवनामुळे तुमच्या त्वचेखाली असलेले सीबमचे प्रमाण वाढते. सीबम वाढले की, त्यामुळे त्वचेवर मोठेमोठे पिंपल्स येऊ शकतात. 
  2. शरीराला नैसर्गित न्युट्रिशनची गरज असते. आपण जेवत असलेल्या अन्नातून आपल्याला जे न्युट्रिशन मिळते ते कमी असले तरी ते शरीराचे संतुलन राखण्यास मदत करते. पण प्रोटीन पावडरच्या सेवनामुळे हे संतुलन बिघडू शकते. 
  3. प्रोटीन पावडरच्या सततच्या सेवनामुळे पोटाचे आरोग्य देखील बिघडू शकते. यामध्ये मिल्क पावडर आणि अन्य काही एन्झाईम्स असतात. जे पोटाचे आरोग्य बिघडवू शकते. 
  4. व्यायाम केल्यानंतर प्रोटीन पावडर शरीराची झालेली झीज भरुन काढण्यासाठी केली जाते. व्यायाम केल्यानंतर प्रोटीन पावडरचे सेवन केले जाते. प्रोटीन पावडरमध्ये असलेली साखर ही शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवू शकते. ज्यांना डाएबिटीज आहे त्यांनी प्रोटीन पावडरचे सेवन करताना थोडी काळजी घ्यायला हवी. 
  5. प्रोटीनमध्ये असे काही घटक असतात. ज्यामध्ये अनेक विषारी पदार्थ असतात. ज्यामुळे जुलाब, ताप,बद्धकोष्ठता असा त्रास वाढू शकतो. 


जर तुम्ही रोज वर्कआऊट करत असाल किंवा जीम करत असाल तर त्यानंतर प्रोटीन पावडरचे सेवन करताना थोडी काळजी घ्या.

ADVERTISEMENT
26 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT