अलीकडच्या काळात महिलांमध्ये PCOS ची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. PCOS, ज्याला पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम देखील म्हणतात, ही एक आरोग्य समस्या आहे ज्यामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीशी निगडित व प्रजनन समस्या उद्भवतात. असे दिसून आले आहे की ही आरोग्य समस्या भारतातील 5 पैकी 1 महिलांमध्ये आहे. इतकेच नव्हे तर यामुळे महिलांमध्ये अतिरिक्त प्रमाणात वजन वाढणे, केस गळणे, मुरुम येणे, मासिक पाळी अनियमित येणे या आणि आरोग्याशी निगडित अशा अनेक शारीरिक व मानसिक समस्या उद्भवतात. या सर्व समस्या महिलांच्या आयुष्यात आधीच असलेल्या समस्यांमध्ये आणखी भर घालतात. PCOS पूर्णपणे बरा तर होऊ शकत नाही पण मधुमेहाप्रमाणे आपण तो योग्य आहार व व्यायामाने कंट्रोल करू शकतो. या समस्येचा सामना करण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घेणे फायदेशीर ठरू शकते. तर आज या लेखात जाणून घ्या असे काही सप्लिमेंट्सबद्दल जे तुम्हाला PCOS मुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यात मदत करतील.
पोषक तत्वांनी युक्त अन्न खायला हवे
PCOS ही खरोखरच एक गंभीर आरोग्य स्थिती आहे परंतु जर तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेतली तर त्यामुळे होणारा त्रास कमी होतो. जेव्हा तुम्ही सर्व आवश्यक पोषक तत्वांनी युक्त असा समतोल आहार घेता, तेव्हा त्यामुळे हार्मोन्स संतुलित होतात आणि तुमची अंतर्गत प्रणाली योग्यरित्या कार्य करू शकते. आपल्याला वाटते की आपल्याला आपल्या अन्नातून सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतात, परंतु जर ही पोषक तत्वे तुमच्या आहारातून मिळत नसतील तर तुम्ही तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यासाठी सप्लिमेंट्स घेऊ शकता.
क्रोमियम
क्रोमियम हे एक अतिशय महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जे साखर आणि चरबीच्या मेटॅबॉलिजमसाठी आवश्यक आहे. हे रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते. या पोषक तत्वाचे दैनिक सेवन सुमारे 50 ते 200 मिलीग्राम पर्यंत असावे. क्रोमियमची एक समस्या अशी आहे की ते पदार्थांमध्ये क्वचितच आढळते, पण ब्रोकोली आणि नट्समधून काही प्रमाणात क्रोमियम मिळते.
ओमेगा-थ्री
ओमेगा-थ्री हे आवश्यक फॅटी ऍसिड आहे, जे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटशी संबंधित आहे. ओमेगा-थ्री फॅटी ऍसिडचे नियमित सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत मिळते तसेच शरीरावर जर सूज असेल तर ती कमी होण्यास देखील मदत होते. PCOS मध्ये ओमेगा- थ्री हे ग्लुकोजचे मेटाबॉलिजम वाढवण्यास आणि लेप्टिन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे भूक तर नियंत्रित राहतेच पण वजन कमी होण्यासही मदत होते., फिश ऑइल, फॅटी फिश, फ्लेक्ससीड ऑइल आणि अक्रोड यातून आपल्याला ओमेगा थ्री मिळू शकते.
Inositol किंवा myo-inositol
Inositol ज्याला myo-inositol म्हणूनही ओळखले जाते, हा अनेक वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळणारा जीवनसत्वासारखा पदार्थ आहे. हे प्रयोगशाळेत देखील तयार केले जाऊ शकते. हा व्हिटॅमिनसदृश पदार्थ नैसर्गिकरीत्या कॅन्टालूप, लिंबूवर्गीय फळे, बीन्स, हातसडीचा तांदूळ, कॉर्न आणि तीळ आणि गव्हाच्या कोंड्यामध्ये आढळतो. हे सप्लिमेंट मेटाबॉलिक आणि मूड डिसऑर्डरसारख्या विविध त्रासांसाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला PCOS ची समस्या असेल तर Inositol ओव्हरीजचेही कार्य सुधारते आणि मासिक पाळीची समस्या कमी करते. त्यामुळे स्त्रीला गर्भधारणा होण्यात मदत मिळते.
N-acetyl cysteine (NAC)
Acetylcysteine, ज्याला N-acetylcysteine असेही म्हणतात, हे अमीनो ऍसिड सिस्टीनचे पूरक रूप आहे, जे शरीराद्वारे अँटिऑक्सिडंट्स तयार करण्यासाठी वापरले जाते. हे प्रजनन क्षमता सुधारण्यास आणि PCOS ग्रस्त महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास मदत करते.कडधान्ये, मसूर, पालक, केळी, सॅल्मन आणि ट्यूना यामध्ये हे पोषक तत्व आढळते. पण याचे सप्लिमेंट्स देखील उपलब्ध आहेत.
तुम्ही नैसर्गिक आहारातून हे पोषक घटक मिळवू शकता किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणे सुरु करू शकता.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक