Advertisement

भविष्य

ऑगस्टमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्य जाणून घ्या

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jul 30, 2021
ऑगस्टमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्य जाणून घ्या

प्रत्येक माणसाच्या जन्माची वेळ, काळ सर्वच वेगळं असतं. प्रत्येक महिन्यात आणि दिवसाला जन्म घेतलेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि आचार वेगळे असतात. यावरूनच त्याचं वैशिष्ट्य, आवड, निवड, चांगुलपणा अथवा वाईटपणा ठरतो. ऑगस्ट महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती या अतिशय शांत स्वभावाच्या असतात. प्रत्येक कामात या व्यक्ती इमानदार असतात आणि आपल्या आसपासच्या व्यक्तींकडूनही ते अशाच प्रकारची आशाही करतात. ऑगस्टमध्ये जन्माला येणाऱ्या व्यक्तींचा स्वामी हा सूर्य असतो. यांची रास सिंह असते. तुमच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस ऑगस्टमध्ये असेल तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्याआधी समजून घ्या कसा आहे त्यांचा स्वभाव.

जाणून घ्या ऑगस्टमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींबाबत माहिती –

1 – या व्यक्तींना प्रत्येकवेळी स्वत:ची प्रशंसा ऐकायला खूप आवडतं. तसंच बऱ्याचदा या व्यक्ती मोठ्या मोठ्या बाता करण्यामध्येही पुढे असतात.

2 – आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं या व्यक्तींना खूपच चांगलं जमतं. त्यामुळे या व्यक्ती मनाने नाही तर नेहमी डोक्याने निर्णय घेतात. या व्यक्तींच्या जीवनामध्ये खूपच चढउतार असतात. पण आयुष्यामध्ये या व्यक्ती हार मानत नाहीत. प्रत्येक संकटावर मात करत या व्यक्ती त्यातून बाहेर पडतात.

3 – सूर्य या राशीचा स्वामी असल्याने या व्यक्तींमध्ये लीडरशीप क्वालिटी असते. त्यामुळे प्रत्येक कामात या व्यक्ती पुढे असतात. कदाचित त्यामुळेच इतर लोकांवर या व्यक्तींचा प्रभाव जास्त प्रमाणात पडतो. सतत याच व्यक्ती कामासाठी पुढे दिसल्याने इतर लोक यांच्याकडे आकर्षिक होतात.

4 – आपल्या विश्वासासाठी उभं राहण या व्यक्तींना माहीत असतं. पण इतर व्यक्तींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांना आवडत नाही. चांगलं काम करण्यासाठी जर या व्यक्तींची प्रशंसा झाली नाही किंवा यांना आवडत असलेल्या व्यक्तींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर या व्यक्ती कमकुवत होतात. त्यांना नेहमी सर्वांकडून वाहवा मिळवण्याची सवय असते.

5 – या व्यक्ती दिसायला सुंदर असतात यामध्ये काहीच दुमत नाही. पण या व्यक्ती मनमोकळ्या नसतात. त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्या दिसण्याचा अथवा आपल्या कोणत्याही गोष्टीचा गर्व तर नाही ना असा गैरसमज इतर व्यक्तींचा होण्याची शक्यता असते. पण या व्यक्ती मितभाषी असल्यामुळे तसं वाटू शकतं.

6 – प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती बऱ्याचदा बेजबाबदार असतात. त्यामुळेच एकाच व्यक्तीबरोबर या व्यक्ती फार कमी वेळ टिकतात. तसं तर या व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबाबत यांना अभिमान असतो. तो अभिमान तेव्हा अधिक वाढतो जेव्हा त्यांचा जोडीदार नेहमी त्यांना साथ द्यायला तयार राहतो.

7 – या व्यक्तींना स्वत:वर कोणाचाही दबाव चालत नाही. आपल्या मनाच्या मर्जीप्रमाणे वागणं या व्यक्तींना आवडतं. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे या व्यक्तींकडून काम करवून घेऊ शकत नाही. त्यांना वाटलं तरच या व्यक्ती ते काम करतात. याच स्वभावामुळे बऱ्याचदा चांगलं होत असलं तरीही नुकसान होण्याची शक्यता असते.

8 – या व्यक्ती स्वत:च स्वत:ला धैर्य देत असतात. आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे हे या व्यक्ती स्वत:च ठरवतात आणि त्याचप्रमाणे वागतात. या व्यक्ती कोणाच्या हाताखाली सहसा काम करू शकत नाहीत. तर स्वत: बॉस म्हणून काम करणं यांना आवडतं.

9 – ऑगस्टमध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती या प्रतिभाशाली असून मनी माईंडेडदेखील असतात. अशा व्यक्ती सहसा तुम्हाला उद्योगजगत, इंजिनिअर, टिचर अथवा कलाकार म्हणून कार्यरत दिसून येतात.

10 – पैशांच्या बाबतीत या व्यक्ती अतिशय भाग्यशाली असतात. या व्यक्तींना नेहमीच कुटुंबाचा पाठिंबा मिळतो. पण या व्यक्ती खर्चिक नसून कंजूष असतात.

भाग्यशाली क्रमांक – 2, 4, 9, 10, 34

भाग्यशाली रंग – सोनेरी, पांढरा आणि लाल

भाग्यशाली दिवस – शुक्रवार आणि रविवार

भाग्यशाली खडा – माणिक, पुष्कराज (गुरू)

ऑगस्टमध्ये जन्म झालेल्या प्रसिद्ध व्यक्ती –

काजोल, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मदर टेरेसा, द ग्रेट खली, रणदीप हुडा, श्रीदेवी, किशोर कुमार, सुनिधी चौहान, अरविंद केजरीवाल

हेदेखील वाचा

जाणून घ्या मे महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात कशा

एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या

जाणून घ्या जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात तरी कशा