ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
साक्षरतेसाठी अनोखं ‘फोन उठाओ इंडिया को पढाओ’ अभियान

साक्षरतेसाठी अनोखं ‘फोन उठाओ इंडिया को पढाओ’ अभियान

आपण कितीही नाही म्हटलं तरी इंग्रजी ही भाषा आजकाल सगळीकडे गरजेची आहे. इंग्रजीतून संभाषण आले म्हणजे विद्यार्थ्यांचे अर्धे टेन्शन दूर होते. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी भाषेच्या क्लासेसना पाठवतात. पण हे झालं सामान्य वर्गातील मुलांबद्दल. वंचित वर्गातील मुलांनी याबाबत काय करावं? नुकत्याच 8 सप्टेंबरला झालेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने एका केशतेलाच्या कंपनीने आगळेवेगळे ‘फोन उठाओ इंडिया को पढाओ’ अभियान सुरु केले आहे.

Instagram

शिक्षण हा प्रगतीचा पाया असतो, हाच विचार डोळ्यांसमोर ठेऊन मॅरिको निहार शांती आमला ब्रँड हा सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. वंचित वर्गातील मुलांना इंग्रजी संभाषणाची मूलभूत कौशल्ये आत्मसात करता यावीत यासाठी त्यांचा शहरांमधील स्वयंसेवकांसोबत फोन कॉल्समार्फत संपर्क साधून देणे हे या अभियानाचे मुख्य उद्धिष्ट आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. दर आठवड्याला फक्त १० मिनिटे फोनवर बोलून एखाद्या गरीब मुलाला इंग्रजी संभाषणाच्या सरावात तुम्ही मदत करू शकता.

ADVERTISEMENT

सर्वांना मिळावे इंग्रजीचे धडे

गेली पाच वर्षे या केशतेल ब्रँडतर्फे अजून एक असाच उपक्रम राबविला जात आहे. ज्यामध्ये मुलांना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने, आयव्हीआरवर आधारित प्रशिक्षण मॉड्युल्सवर इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षणही मोफत आहे. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावांमधील जवळपास तीन लाखांहून जास्त मुलांच्या जीवनात बदल घडून सकारात्मकता दिसत आहे. परंतु फक्त एवढंच पुरेसं नाही हे लक्षात घेऊन भाषा आत्मसात करण्यासाठी भाषेतील संभाषणाचा सराव केला जाणेही आवश्यक असते. आज शहरात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांची सामाजिक कार्यात मदत करण्याची इच्छा आहे. पण व्यस्त दिनक्रमामुळे त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही, त्यामुळे तशी संधी मिळत नाही. ही एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन ‘फोन उठाओ इंडिया को पढाओ’ हे आगळेवेगळे अभियान सुरु केले गेले आहे. यामध्ये शहरातील सुशिक्षित लोकांना गरीब मुलांसोबत जोडण्यात येते. तंत्रज्ञानाचा माध्यम म्हणून वापर करत शहरातील स्वयंसेवक या मुलांना इंग्रजी संभाषणाचा सराव देतील. अशाप्रकारे मुलांचे इंग्रजी शिक्षण यशस्वी होण्यात मदत मिळेल.

एक नवा प्रयत्न

Instagram

मुलांच्या शैक्षणिक यशामध्ये सुधारणा घडून यावी यासाठी ही कंपनी सतत प्रयत्नशील आहे. या उपक्रमातून मुलांना इंग्रजी भाषेचे शिक्षण कधीही, कुठेही घेता येईल अशी सोय उपलब्ध करण्यात आली आहे. फोन उठाओ इंडिया को पढाओ हा याचा पुढचा टप्पा आहे. मुले आजवर जे काही शिकली आहेत त्याचा सराव त्यांना करता यावा यासाठी फोन संभाषण हा सोपा मार्ग या अनोख्या उपक्रमात वापरण्यात आला आहे. त्याचबरोबरीने या उपक्रमातून शहरातील समाजसेवेसाठी इच्छुक व्यक्तींना या मुलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात योगदान देण्याची संधी देण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून घडलेले शिक्षित, तडफदार युवा भारत निर्माण करू शकतील.

ADVERTISEMENT

सेलिब्रिटीजही घेणार भाग

या वर्षाच्या सुरुवातीला लखनौमध्ये एक चाचणी उपक्रमही राबविण्यात आला होता. त्यावेळी महिन्याभरात 2000 पेक्षा जास्त मुलांनी इंग्रजी भाषेच्या सरावात भाग घेतला. आजवर शहरांमधील स्वयंसेवकांनी 55000 मिनिटांच्या फोन कॉल्समध्ये गरजू मुलांकडून इंग्रजी संभाषणाचा सराव करून घेतला आहे. चाचणी उपक्रमाला मिळालेल्या यशापासून प्रेरणा घेऊन संपूर्ण देशभरात या उपक्रमाचा प्रसार करण्यात आला आहे. तसंच या उपक्रमात अनेक सेलिब्रिटीजनहीही सहभागी होण्याचे आवाहन कंपनीच्या ब्रँड अबँसिडर करून करण्यात आले आहे. स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून दर आठवड्याला फोनवर दहा मिनिटे देण्याचे देखील आवाहन त्यांनी केले आहे. या उपक्रमाची सुरुवात केली जात असताना एका एफएमवर रेडिओ कॅम्पेनही चालवण्यात आले. त्याचबरोबरीने  सोशल मीडिया पार्टनर्समार्फत हा संदेश सर्वत्र पसरवला गेला.

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

16 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT