चांगले आरोग्य हे चांगल्या आयुष्याचे चिन्ह असते. आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण चांगल्या गोष्टींचा आहारात समावेश करतो. इतकेच नाही तर चांगल्या सवयी देखील लावतो. गेल्या काही वर्षांपासून अनेक आजारांशी अनेकांनी सामना केला आहे. कोरोनाची लक्षणे जाणून घेत त्या आजाराशी दोन हात केले आहे. आजारांशी दोन हात करताना आजारातून बरे होण्यासाठीची प्रेरणादेखील हवी असते. अशावेळी (Health Slogans And Quotes In Marathi) हे नक्कीच कामी येतात. तुम्हाला हेल्दी ठेवण्यासाठी आणि तुमचे आयुष्य चांगले करण्यासाठी आम्ही खास आरोग्यविषयक सुविचार शोधून काढले आहेत ते पुढीलप्रमाणे.
Table of Contents
- Health Slogans In Marathi For Students | विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक घोषवाक्य
- Marathi Slogans On Health For Family | कुटुंबासाठी आरोग्यावरील घोषवाक्य
- Slogans On Health In Marathi For Public | जनतेसाठी आरोग्यविषयक घोषवाक्य
- Health Quotes In Marathi | आरोग्यविषयक सुविचार
- Mental Health Slogans In Marathi | मानसिक आरोग्य घोषवाक्य
Health Slogans In Marathi For Students | विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक घोषवाक्य
खास विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक घोषवाक्य पाठवण्याचा विचार करत असाल आणि त्यांच्या आरोग्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावे असे वाटत असेल तर तुम्ही हे काही (Health Slogans In Marathi For Students) तुम्ही पाठवू शकता.
- तुमच्या मार्कशीटपेक्षाही महत्वाचे आहे ते म्हणजे
तुमच्या आरोग्याची मार्कशीट…त्यामुळे आरोग्य जपा. - निगा राखा आरोग्याची, आयुष्य मिळेल चांगले.
- इतरांना बरे करण्यापूर्वी
तुम्ही बरे राहा, म्हणजे आयुष्य चांगले राहील.
- विचार निरोगी ठेवा,
आरोग्य निरोगी राहील. - स्वच्छ सुंदर परिसर
तरच राहील आयुष्य निरंतर.
Marathi Slogans On Health For Family | कुटुंबासाठी आरोग्यावरील घोषवाक्य
कुटुंबासाठी आरोग्यावरील घोषवाक्ये (Marathi Slogans On Health For Family) पाठवून तुम्हाला तुमचे आणि जवळच्या व्यक्तींचे आयुष्य अधिक सुखकर करता येईल.
- धरुन आरोग्याची साथ
कुटुंबाचे करुया रक्षण
आरोग्यविषयक योग्य सल्ला घेऊन
राहू तंदुरुस्त आपण - संपत्तीचा बँक बॅलन्स महत्वाचा नाही
तर आरोग्याचा बँक बॅलन्स चांगला असला
तर आयुष्याला आपल्या अर्थ आहे - प्रथिनयुक्त आहाराने करा आयुष्य सुखाचे
तरच तुम्हाला मिळेल आयुष्य तुमच्या आवडीचे
- कायम व्यस्त राहण्यासाठी भरपूर काम करा,
आयुष्यात सुखात राहण्यासाठी चांगला पैसा कमवा
आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी भरपूर व्यायाम करा. - खा पदार्थ तुमच्या आवडीचे पण राखा तुमचे आरोग्य चांगले
खाण्यापेक्षा जंकफूड तुमच्यासाठी निवडा घरचे जेवण चांगले
Slogans On Health In Marathi For Public | जनतेसाठी आरोग्यविषयक घोषवाक्य
जनतेसाठी तुम्हाला चांगला आरोग्यविषयक सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही जनतेसाठी आरोग्यविषयक घोषवाक्य (Slogans On Health In Marathi For Public) पाठवू शकता.
- पैशांचा लाभ जर आरोग्याला नाही
तर त्याचा काहीही उपयोग नाही,
त्यामुळे भरपूर कमवा आणि आयुष्य अधिक सुखाचे करा - उत्तम आरोग्याला नसते कशाचीही तोड
म्हणून आरोग्यावर द्या विशेष भर - कशाला वाया घालवता तुमचे आयुष्य
चांगले आरोग्यासाठी द्या स्वत: कडे लक्ष
- कशाला वाया घालवता तुमचे आयुष्य
चांगले आरोग्यासाठी द्या स्वत: कडे लक्ष - वय वाढले तरी दिसाल तुम्ही चिरतरुण
जर ठेवाल तुमच्या शरीराकडे लक्ष - माणसाचे सगळ्यात महत्वाचे धन असते ते म्हणजे आरोग्य
आरोग्याशिवाय बाकी सगळे आहे व्यर्थ
Health Quotes In Marathi | आरोग्यविषयक सुविचार
आरोग्यविषयक असा चांगला सल्ला तुम्हाला द्यायचा असेल तर (Health Quotes In Marathi) देखील तुम्ही पाठवू शकता.
- उत्तम आरोग्य आणि आळस या पैकी एकाची निवड करा
आणि तुमच्या आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा - आपल्या चांगल्या आरोग्याची पडते समोरच्यावर छाप
त्यामुळे आहार-विहाराने ठेवा स्वत:ला ताजेतवाने नेहमी
- चांगला आहार, चांगले आरोग्य
ठेवते तुम्हाला आयुष्यासाठी ताजेतजावे - पैसा येतो जाते पण आरोग्य पुन्हा येत नाही,
त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या आणि प्रकृती जपा - मैदानी खेळाने मुलांना बनवा चपळ
त्यांनाही कळू द्या त्यांच्या आरोग्याचे महत्व
Mental Health Slogans In Marathi | मानसिक आरोग्य घोषवाक्य
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खास मानसिक आरोग्य घोषवाक्य (Mental Health Slogans In Marathi) ही देखील आम्ही शोधून काढली आहेत. या शिवाय मलेरिया ची लक्षणे देखील जाणून घ्या
- सगळया निर्णयाचा मानसिक ताण घेण्यापेक्षा
आहे त्या गोष्टीला सामोरे जा,
मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळेल - कशाला करायला हवी चिंता
मानसिक आरोग्य चांगले असेल तर नाही कसली चिंता - नको त्या विचारांनी होऊ नका त्रस्त
त्यामुळे होते आयुष्य उगाचच उद्धवस्त - विचारांनी येणारी मरगळ झटकून करा आयुष्य वेगळे
कशाला हवे नको ते विचार जे करेल तुमचे जीवन उद्धवस्त
- मानसिक आरोग्य असते आपल्या हातात,
फक्त असू द्या तुमच्या विचारांना आणि आरोग्याला तुमची साथ
आता ही घोषवाक्ये लक्षात ठेवून आणि इतरांना पाठवून तुमचे आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी नक्कीच ती एकमेकांना पाठवा.