ADVERTISEMENT
home / सौंदर्य
लग्नानंतर चेहऱ्यावर तेज येण्यासाठी सोप्या टिप्स

लग्नानंतर चेहऱ्यावर तेज येण्यासाठी सोप्या टिप्स

 

 

प्रत्येक नवरीला वाटत असतं की लग्नात तिचं रूप खुलून यावं. कारण लग्नसोहळ्यातील प्रत्येक विधीमध्ये सर्वांच्या नजरा नवरीवर खिळलेल्या असतात. लग्नात आनंद आणि उत्साहामुळे नववधूच्या चेहऱ्यावर एक तेज निर्माण होत असतं. मात्र लग्नातील विधी आणि इतर दगदग यामुळे तिला थकवा जाणवू लागतो आणि लग्नानंतर अचानक चेहऱ्यावरील तेज कमी होतं. लग्नसोहळ्यात नवरानवरीला आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ज्यामुळे शारीरिक थकवा चेहऱ्यावर दिसू शकतो. यासाठीच नवरीने या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. ज्यामुळे लग्नानंतरही ती कायम सुंदर आणि उत्साही दिसेल.

instagram

ADVERTISEMENT

लग्नानंतर चेहऱ्यावरील तेज कायम राहण्यासाठी सोप्या टिप्स

 

जर तुमचं लग्न ठरलं असेल आणि तुम्ही लग्नाच्या  तयारीला लागला असाल तर लग्नसोहळ्यानंतर कायम उत्साही दिसण्यासाठी या टिप्स फॉलो करा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचे तेज कायम टिकेल.

  • लग्नानंतर रात्री घरी गेल्यावर चेहऱ्यावरील मेकअप व्यवस्थित काढा. चेहरा, मान आणि पाठीवरील मेकअप काढण्यासाठी चांगले क्लिंझर, मेकअप रिमूव्हर आणि कॉटन पॅडचा वापर करा.
  • मेकअप काढण्याचं साहित्य जवळ नसेल तर कच्च्या दूधानेही तुम्ही तुमचा मेकअप काढू शकता. मात्र लक्षात ठेवा कितीही कंटाळा आला तरी मेकअप तसाच ठेवून मुळीच झोपू नका.
  • लग्नकार्याच्या दिवशी भरपूर पाणी प्या, ज्यामुळे तुमचे डिहायड्रेशन होणार नाही. कारण लग्नकार्यात जरी तुमचे जेवण व्यवस्थित झाले नाही अथवा तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तरी दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा टवटवीत दिसेल.
  • शक्य असल्यास रात्री घरी गेल्यावर गरम पाण्यात मीठ टाकून त्यात पाय टाकून थोडावेळ बसा. कारण  दिवसभर हायहिल्स घालून उभं राहिल्यामुळे तुमच्या पायाच्या टाचा आणि पोटऱ्या दुखू लागतात. शारीरिक थकवा दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर दिसू लागेल यासाठी हा उपाय करणं उत्तम ठरेल.
  • तुमच्यासोबत तुमचा मेकअप बॉक्स सतत असू द्या. कारण दुसऱ्या दिवशी लग्नातील इतर विधींसाठी जर तुम्हाला स्वतःच पटकन तयार व्हावं लागलं तर तुमचा मेकअप स्वतःच करू शकाल.
  • मेकअप किटमध्ये टिश्यू पेपर, क्लिंझर, मेकअप रिमूव्हर, बेसिक मेकअपचे साहित्य, फेश वॉश, नॅपकीन, लिपस्टिक, मॉईच्सराईझर, बॉबी  पिन्स, हेअर पिन्स असेल याची  काळजी घ्या.
  • लग्नानंतर काही दिवस गडद आणि आकर्षक रंगसंगतीचे कपडे अथवा साड्या नेसा ज्यामुळे तुमचे रूप नेहमीच खुललेले दिसेल.
  • लग्नानंतर काही दिवस तुमच्या सौभाग्याची लक्षणे असलेले दागिने आणि इतर साहित्य वापरा. जसं की, मंगळसूत्र, टिकली, जोडवी, सिंदूर, बांगड्या ज्यामुळे तुम्ही नवीन नवरी आहात हे पटकन जाणवेल.
  • लिपस्टिक लावताना ती तुमच्या साडी, ड्रेसला मॅचिंग लावा. ज्यामुळे तुमचे रुप नेहमीच आकर्षक दिसेल. 
  • काही दिवस डोळ्यांना काजळ, आयलायनर, मस्कारा लावण्यास विसरू नका. ज्यामुळे तुमचे डोळे आकर्षक आणि तेजस्वी दिसतील. 
  • साडी, ड्रेस आणि मेकअपप्रमाणेच केसांच्या स्टाईलकडे व्यवस्थित लक्ष द्या.
  • जर तुमचे  केस छोटे असतील तर मोकळे सोडण्यास काहीच हरकत नाही मात्र मोठे असतील तर सैल वेणी, अंबाडा अशा हेअरस्टाईल करा ज्यामुळे तुम्ही थोड्या मॅच्युअर्ड वाटाल. 
  • चेहऱ्यावर डाग अथवा व्रण असतील तर लग्नानंतर काही दिवस कन्सिलर आणि फाऊंडेशनचा वापर करा. ज्यामुळे लग्नानंतर केल्या जाणाऱ्या एखाद्या विधीसाठी तुम्ही पटकन छान दिसाल.
  • वागण्याबोलण्यात आणि दिसण्यात सहजता ठेवा,  उगाचच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे तुम्हाला अवघडल्यासारखं वाटेल ज्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागेल.
  • सकाळी व्यायाम करणं शक्य नसेल तर कमीत कमी प्राणायम आणि मेडिटेशन करा ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

अधिक वाचा –

लग्नात सुंदर दिसण्यासाठी सर्व नववधूंनी फॉलो कराव्यात या हेल्थ टिप्स

ADVERTISEMENT

असं करा कमी खर्चात आणि लक्षात राहील असं लग्न (How To Plan A Simple Wedding In Marathi)

लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहायचं आहे, मग या गोष्टी ठेवा लक्षात

17 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT