कोरोना काळातही (Coronavirus) लग्नसमारंभ अगदी कुटुंबाच्या उपस्थितीत सुरू आहेत. सध्या खूप मुहूर्त असल्याने लग्न मात्र कुठेही थांबलेले नाही. पण याची सर्वात मोठी अडचण येत आहे ती नवरीला. लग्न हा आपला आयुष्यभराचा आठवणींचा ठेवा असतो. यावेळी प्रत्येक नवरीला अत्यंत सुंदर दिसायचे असते. पण सध्या कोरोना काळात पार्लरमध्ये जाऊन आपल्या चेहऱ्यावर ट्रिटमेंट घेणं काही शक्य नाही. त्यामुळे नवरीसाठी मात्र ही एक समस्याच झाली आहे. आपल्या प्री ब्रायडल लुकसाठी (pre bridal look) आता टेन्शन घेऊ लागल्या आहेत. तुमच्यापैकी जर कोणी कोरोना काळात लग्न करत असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या घरगुती टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेला पार्लरप्रमाणे लुक देऊ शकता. त्वचेवर अधिक चमक आणू शकता. त्यासाठी आता तुम्हाला पार्लरवर अवलंबून राहायची गरज भासणार नाही.
चमकदार त्वचा (Glowing Skin)
लग्नात आपली त्वचा चमकदार दिसेल का नाही हा सर्वात मोठा प्रश्न नवरीला असतो. आपल्या लग्नात सर्वात सुंदर आपणच दिसायला हवं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. तुम्हालादेखील चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही लग्नाच्या आधी एक महिन्यापासून दुधाध्ये केशर घालून नियमित प्यायला सुरूवात करा. केशराच्या दुधामुळे चेहरा स्वच्छ राहतो आणि चेहऱ्यावर चमक येते.
डार्क सर्कल (Dark Circle)
Shutterstock
काही महिलांना डोळ्याखाली डार्क सर्कल अर्थात काळी वर्तुळं आलेली दिसून येतात. कामाच्या टेन्शनमुळे बऱ्याच जणींना हा त्रास उद्भवतो. विशेषतः लग्नाच्या गडबडीचा ताण अधिक आला तर ही समस्या होतेच. पण ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही रोज काकडीच्या तुकड्यांचा वापर करा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतोच आणि डोळ्यांखाली काकडीचा रस लावा आणि मसाज करा. यामुळे डोळ्यांखालील काळेपणाही निघून जातो. तुम्हाला लग्नाच्या दिवशी उत्तम चमक चेहऱ्यावर आणि डोळ्याखालीही मिळते.
लग्न ठरलंय तर त्वचेची घ्या आधीपासूनच काळजी (Pre wedding skin care)
घरगुती हेअर मास्क (Homemade Hair Mask)
Shutterstock
प्री ब्रायडल लुकमध्ये केवळ चेहराच नाही तर केसांचीही काळजी घ्यावी लागते. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हेअरमास्कचा वापर करू शकता. हेअर मास्क तयार करण्यसाठी तुम्ही अंड्याचा पिवळा भाग घ्या. केसांना साधारण पाऊण तास हा पिवळा भाग लाऊन ठेवा. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवा. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता. यामुळे केसांना अधिक चमक येते आणि केस घनदाट होण्यास मदत मिळते.
5 मेकअप उत्पादने जे घेतात तुमच्या त्वचेची काळजी, वापरणे योग्य
शरीराला मसाज (Body Massage)
Shutterstock
लग्नाची कामं नाही म्हटली तरी करावीच लागतात. त्यामुळे शरीराला थकवा येणं साहजिक आहे. लग्नापूर्वी बरेच रितीरिवाज करण्याचीही आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे शरीराला थकवा येऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी मोहरीचं तेल अथवा नारळ्याच्या तेलाने शरीराचा तुम्ही नियमित मसाज करा. मसाज केल्याने रक्तप्रवाह योग्य राहातो आणि शरीरावर एक चमक दिसून येते.
ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय
हेल्दी डाएट आणि योग्य झोप (Healthy diet and sleep)
Shutterstock
लग्नात सुंदर दिसण्यासाठी किमान सहा महिने आधीपासूनच आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे. तेलकट, तूपकट पदार्थ टाळून अत्यंत हेल्दी अशा डाएटकडे लक्ष देऊन व्यवस्थित फॉलो करायला हवे. तसंच चमकदार त्वचेसाठी दिवसातून 8 तास झोप घेणे हे अनिवार्य आहे. झोप व्यवस्थित झाली तर त्वचा उत्तम राहण्यास मदत मिळते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक